दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये MSC bank job 2024 विविध पदाच्या एकुण 75 जागांची पदभरती. (मुदतवाढ)
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये MSC bank job 2024 कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी) तसेच सहायक (ट्रेनी) या पदाच्या एकूण 75 जागाची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक च्या www.mscbank.com या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 19 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 08 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 08 नोव्हेंबर, 202423 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा. (मुदतवाढ)
एकूण – 75 पदे MSC bank job 2024
अ.क्र.
पदांचे नांव
पदे
1
कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी)
25
2
सहायक (ट्रेनी)
50
शैक्षणिक अर्हता व अनुभव- MSC bank job 2024
अ.क्र.
पदांचे नांव
शैक्षणिक अर्हता
1
कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी)
मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले, तसेच 2 वर्षाचा अनुभव
2
सहायक (ट्रेनी)
मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले,
मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि
इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट
एम.एस.सी.आय.टी संगणक
सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वरील दोन्ही पदांसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अर्ज कसा करावा- how to apply online form of MSC bank
उमेदवारांनी प्रथम कंपनीच्या mscbank.com/career या वेबसाइटवर जाऊन त्यानंतरच्या “अप्लाय ऑनलाईन” वर जाऊन पृष्ठावर क्लिक करावे.
अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवार पाहिजे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. तात्पुरती नोंदणी क्रमांक दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस आणि पासवर्डही पाठवला जाईल.
उमेदवार एकाच वेळी अर्ज भरण्यास असमर्थ असल्यास, प्रविष्ट केलेला डेटा जतन करू शकतो. “सेव्ह आणि नेक्स्ट” टॅब निवडावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना “सेव्ह आणि नेक्स्ट” वापरावा. ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्याची आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरा आणि पडताळणी करा, कारण त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांनतर “पूर्ण नोंदणी” वर क्लिक करा.
उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे. प्रमाणपत्रे / मार्कशीट / ओळख पुरावा यात कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
तुम्ही भरलेला तुमचा तपशील “सत्यापित करा” आणि “जतन करा “आणि पुढील बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
उमेदवार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
“पूर्ण नोंदणी” करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
आवश्यक असल्यास तपशील बदला आणि छायाचित्राची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच “पूर्ण नोंदणी वर क्लिक करा,अपलोड केलेले स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे आणि तुम्ही भरलेले इतर सर्व तपशील बरोबर आहेत कि नाही ते तपासा.
“पेमेंट” टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट झाला असेल.
निवड/ परीक्षा पध्दती-
उमेदवाराने फक्त एका पदासाठी अर्ज करावा.
अर्जाची फी बँकेकडे ऑनलाइन पद्धतीने जमा केल्यावरच अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असे मानले जाईल.
उमेदवारांनी तपशील आणि अपडेटसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mscbank.com/careers नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांना कोणताही वैयक्तिक संवाद पाठविला जाणार नाही.
वरील कनिष्ठ अधिकारी (ट्रेनी) या पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे इंग्रजी भाषेत असलेली 2 तासाची परीक्षा – 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल.
उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान 50% म्हणजेच 100 गुण मिळविणे आवश्यक आहे.
किमान गुणांच्या आधारवर उमेदवारांना मुलाखती साठी बोलविण्यात येईल.
ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत मध्यील गुणांच्या आधारावर अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
वरील सहायक (ट्रेनी) या पदांसाठी पुर्व तसेच मुख्य अशा दोन प्रकारात परीक्षा घेण्यात येईल.
पुर्व परीक्षा हि फक्त Qualifying असेल, सदर परीक्षा संगणक प्रणालीव्दारे इंग्रजी भाषेत असलेली 1 तासाची परीक्षा – 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल.
उमेदवारांनी ऑनलाईन पुर्व परीक्षेत किमान 50% म्हणजेच 50 गुण मिळविणे आवश्यक आहे.
किमान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलविण्यात येईल.
मुख्य परीक्षा हि संगणक प्रणालीव्दारे इंग्रजी भाषेत असलेली 2.30 तासाची परीक्षा – 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल.
उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत किमान 50% म्हणजेच 100 गुण मिळविणे आवश्यक आहे.
ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
दोन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर केंद्रावर या जिल्हयाच्या/ मुख्यालयी घेण्यात येईल. उमेदवाराला इतर कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार MSC बँकेकडे आहे. वैयक्तिक मुलाखत मुंबई येथे होणार आहे.
उमेदवारांना परीक्षेचे दिनांक तसेच मुलाखती साठीचे दिनांक अधिकृत संकेतस्थळावर कळविले जाईल.
ऑनलाइन परीक्षेसाठी स्थळ/तारीख बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.