Join Whatsapp Group

Join Telegram Group

ZP WARDHA NHM Recruitment 2024 जिल्हा परीषद वर्धा मध्ये (ZP Wardha) पदभरती.

नोकरीची सुवर्णसंधी… जिल्हा परीषद वर्धा मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (Zilla Parishad Wardha) (ZP Wardha NHM) ZP Wardha NHM Recruitment 2024 पदभरती… आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!

जिल्हा परीषद वर्धा मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (Zilla Parishad Wardha) (ZP Wardha NHM) ZP Wardha NHM Job 2024  (ZP Wardha NHM Recruitment 2024) ZP Wardha NHM Career 2024 (ZP Wardha Recruitment 2024) (ZP Wardha NHM Vacancy 2024) (ZP Wardha Job 2024) (ZP Wardha NHM Bharti 2024) विविध संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा परीषदेच्या  www.zpwardha.in या अधिकृत संकेतस्थळावर  प्रसिध्द जाहिरातीनूसार फक्त ऑफलाईन पध्दतीने दिनांक 09 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 17 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 17 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

ZP WARDHA NHM Recruitment 2024
ZP WARDHA NHM Recruitment 2024

📌 महत्वाचे दिनांक📌 ZP WARDHA NHM Recruitment 2024
  • 💻 ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 09.12.2024 ते 17.12.2024.
  • 📃 ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 17.12.2024.
  • 📃मुलाखती/ कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – जिल्हा परीषद कार्यक्षेत्र.

एकूण – 43 पदे- ZP WARDHA NHM Recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 Nephrologists  01
2 Cardiologist  01
3 ENT Surgeon  01
4 Psychiatric  01
5 Radiologist  01
6 Anesthetist  01
7 Physician Consultant Medicine (MO)  01
8 Medical Officer (MBBS)  05
9 Medical Officer (Part Time)  02
10 District Program Manager  01
11 Quality Assurance Coordinator  01
12 IPHS Coordinator (Biomedical Engineer)  01
13 Entomologist  07
14 Public Health Specialist  03
15 Public Health Manager  01
16 RBSK MO  02
17 Audiologist Cum Speech Therapist  01
18 Audiologist  01
19 Counsellor  01
20 Optometrist  01
21 Rehabilitation Worker  01
22 PMW (Para Medical Worker)  02
23 Block M&E  01
24 Dialysis Technician  01
25 Pharmacist  02
26 BCM  01

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- ZP WARDHA NHM Recruitment 2024 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात दिनांक 17.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 Nephrologists
  •  DNB, Nepro
2 Cardiologist
  •  DM Cardiologist
3 ENT Surgeon
  •  MBBS, MS, (ENT)
4 Psychiatric
  •  MD Psychiatry/DPM/DNB
5 Radiologist
  •  MD Radiology/DMRD
6 Anesthetist
  •  MD Anesthetist /DA/DNB
7 Physician Consultant Medicine (MO)
  •  MD Medicine/DNB
8 Medical Officer (MBBS)
  •  MBBS
9 Medical Officer (Part Time)
  •  MBBS
10 District Program Manager
  •  Any Medical Graduate with (MPH/MHA /MBA/ in Health)
11 Quality Assurance Coordinator
  •  Any Medical Graduate with (MPH/MHA/MBA/ in Health)
12 IPHS Coordinator (Biomedical Engineer)
  •  Graduation in Biomedical Engineer
13 Entomologist
  •  M.Sc. Zoology With 5 Years Experience.
14 Public Health Specialist
  •  Any medical Graduate (MPH, MHA, MBA) in Health
15 Public Health Manager
  •  Any medical Graduate (MPH, MHA, MBA) in Health.
16 RBSK MO
  •  BAMS
17 Audiologist Cum Speech Therapist
  •  Bachelor in Audiologist and Speech Language Pathology Course.
18 Audiologist
  •  Bachelor in Audiologist and Speech Language Pathology Course.
19 Counsellor
  •  Master in Social Worker (MSW)
20 Optometrist
  •  Bachelor in Optometry
21 Rehabilitation Worker
  •  Diploma in Multi Rehabilitation Worker or Community Based Rehabilitation Worker
22 PMW (Para Medical Worker)
  •  12th Passed + PMW Certificate
23 Block M&E
  •  B.Sc. in Statistics or Mathematics, MSCIT
24 Dialysis Technician
  •  12th Passed with Science and Diploma / Certificate Course in Dialysis Technology
25 Pharmacist
  •  B.Pharm / D.Pharm
26 BCM
  •  Any Graduation, With MS-CIT, Typing Skill Marathi-30 Per Min, & English 40 Word Per Min

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗Important link🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑफलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

 


वयोमर्यादा- ZP WARDHA NHM Recruitment 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरातीच्या शेवटच्या दिनांक 17.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असावे.

परीक्षा शुल्क (फी)- ZP WARDHA NHM Recruitment 2024

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता- रु. 150/-
  • राखील प्रवर्गातील (मागासवर्ग) उमेदवारांकरीता- रु. 100/-
  • धनादेश (DD) – District Integrated Health & Family Welfare Society, Wardha या नावाने काढावा.
  • कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅकेचा धनादेश (DD) जोडणे आवश्यक आहे. धनादेश (DD) च्या मागे उमेदवारांने स्वत:चे नाव लिहीणे आवश्यक आहे.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – ZP WARDHA NHM Recruitment 2024 Salary
अ.क्र. पदांचे नांव प्रतिमहा मानधन
1 Nephrologists  Rs. 1,25,000/-
2 Cardiologist  Rs. 1,25,000/-
3 ENT Surgeon  Rs. 75,000/-
4 Psychiatric  Rs. 75,000/-
5 Radiologist  Rs. 75,000/-
6 Anesthetist  Rs. 75,000/-
7 Physician Consultant Medicine (MO)  Rs. 75,000/-
8 Medical Officer (MBBS)  Rs. 60,000/-
9 Medical Officer (Part Time)  Rs. 30,000/-
10 District Program Manager  Rs. 35,000/-
11 Quality Assurance Coordinator  Rs. 35,000/-
12 IPHS Coordinator (Biomedical Engineer)  Rs. 25,000/-
13 Entomologist  Rs. 40,000/-
14 Public Health Specialist  Rs. 35,000/-
15 Public Health Manager  Rs. 32,000/-
16 RBSK MO  Rs. 28,000/-
17 Audiologist Cum Speech Therapist  Rs. 25,000/-
18 Audiologist  Rs. 25,000/-
19 Counsellor  Rs. 20,000/-
20 Optometrist  Rs. 20,000/-
21 Rehabilitation Worker  Rs. 20,000/-
22 PMW (Para Medical Worker)  Rs. 17,000/-
23 Block M&E  Rs. 18,000/-
24 Dialysis Technician  Rs. 17,000/-
25 Pharmacist  Rs. 17,000/-
26 BCM  Rs. 18,000/-

ZP WARDHA NHM Recruitment 2024

वरील प्रमाणे मंजुर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रति व छायांकित केलेल्या साक्षंकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजुर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 09.12.2024 पासुन ते दि. 17.12.2024 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन ते 05.00 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच दि. 17.12.2024 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


अर्ज स्विकारण्याचे ठिकाणZP WARDHA NHM Recruitment 2024
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा – 442001

अटी व शर्ती :- ZP WARDHA NHM Recruitment 2024
  • सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनाक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णय अनुसरुन अर्ज करण्याच्या अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय 18 वर्षे पेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा 38 पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फोजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. अशा आशयाचे चरित्र्याचे प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधित सादर करणे बंधनकारक राहील.
  • उपरोक्त पदांकरिता पात्र उमेदवारानी अर्जा सोबत “District Integrated Health & family Welfare Society, Wardha”, या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी रु. 150/- व मागासवर्गीया साठी रु 100/- चा (ना परतावा) राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश जोडावा.
  • तसेच धनादेशाच्या मागे स्वतःचे नाव  हस्ताक्षरात लिहावे.
  • जाहीरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसुन सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचे हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु राहणार नाहीत. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
  • उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन नियुक्ती 11 महिने 29 दिवसा साठी असेल. सदर कंत्राटी पदांकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. तसेच पुढील पुर्ननियुक्ती (11 महिने 29 दिवस या कालावधीकरिता) आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधारीत असेल.
  • जाहीरातीत नमुद वय अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राहय धरले जाईल तसेच शैक्षणिक अर्हता, अनुभव व नोंदणी प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राहय धरले जाईल.
  • सविस्तर जाहीरात, पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, निवड/प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहीती/सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद वर्धा जिल्ह्याच्या www.zpwardha.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल, याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या ठिकाणी भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय आरोग्य अभियान कालमर्यादित राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.
  • सदर पदाकरिता प्रतिक्षा यादी ही पुढिल १२ महिण्या करिता मंजुर राहील तसेच भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास नविन भरती प्रक्रिया न करता प्रतिक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती आदेश दिले जातील.
  • पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. कामाचा अनुभव हा शासकीय/निमशासकीय/एनएचएम चा ग्राह्य धरण्यात येईल.
  • केंद्र / राज्य शासनाने संबधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल व याबाबत कुठलीही तक्रार ऐकुण घेण्यात येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादीतील गुणानुक्रमांकाच्या आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल. याबाबत उमेदवारांना कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रु.100/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल. तसेच नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 7 दिवसांमध्ये रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचा नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
  • अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी नोंदवावा. तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता प्यावी. सदर पदांकरिता अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
  • राखीव संवर्गातुन अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना त्या संवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र (Cast/validiny Certificate) जोडणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही व अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभ घेता येणार नाही.
  • मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधुन सादर केला असल्यास त्याबाबत चे कागद पत्र सोबत जोडण्यात यावे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. EWS प्रवर्गामध्ये अर्ज करण्याऱ्या उमेदवारानी EWS (Economically Weaker Section) जातीचे प्रमाणपत्र अर्जासोवत सादर करावे. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिराती मध्ये नमुद सर्व पदांना तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशनचे नुतनीकरण प्रमाणपत्र/कौन्सिलचे रजिस्ट्रेशनासाठी अर्ज सादर केल्याबाबतची पावती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील तसेच कौन्सीलकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालु कालावधीतील असावी. तथापी अवैद्य प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना भरतीप्रक्रीयेतुन अपात्र ठरविले जाईल.
  • अर्ज सादर करणे किंवा मुलाखती करीता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता व इतर भत्ता देय राहणार नाही.
  • दोनपेक्षा अधिक हयात मुले असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी पदावर यापुढे निवड करण्यात येणार नाही. या करिता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जा सोबत दिलेल्या नमुन्यानुसार सादर करावे.
  • जाहीरातीमधील पदांच्या संख्येत तसेच सामाजिक आरक्षणामध्ये कमी-जास्त बदल व पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो. अटी व शर्तीमध्ये बदल करणे व पदभरती स्थगित करणे / रद्द करणे यांबाबतचे सर्व अधिकार हे कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोनत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा, यांचेकडे राखुन ठेवण्यात आलेले आहे.
  • ज्या उमेदवारांना ग्रेड सिस्टीम CGPA/SGPA नुसार गुण मिळालेले आहेत त्यांनी अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी तसेच त्यांच्या विद्यापिठानुसार टक्केवारी काढण्याचे सुत्र अर्जामध्ये नमूद करावेत. सदर माहिती न दिल्यास गुण दिले जाणार नाहीत.
  • अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचूकपणे नमुद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमुद न करता गुणांची टक्केवारी नमुद करणे आवश्यक आहे. अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमुद असल्यास संबंधित संस्थेकडुन त्याचे गुणांमध्ये रुपांतर करुन ते प्रमाणित करुन घ्यावे व त्याची स्वसाक्षांकित प्रत सादर करावी. तत्सम स्वरुपात कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे गुण देय राहणार नाही व त्या करिता निवड समिती जबाबदार राहनार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणताही आक्षेप असल्यास यांचे निवारण करण्याचा अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा, यांना राहतील,
  • अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही,
  • उपरोक्त पदांकरिता निवड प्रकिया ही अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करुन खालील प्रपत्रा प्रमाने गुण देवून निवड करण्यात येईल. निवड समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील
  • नियुक्ती आदेश देण्यापुर्वी अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्राची सर्व मुळ (Original) कागदपत्र निवड समिती मार्फत पडताळणी करून सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीची आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
  • जाहिरातीमध्ये नमूद गुणांकन पध्दती उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता लागू आहे. गुणांकन पध्दतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
  • निवड प्रक्रिया एकूण 100 गुणांची राहिल,
  • एकूण पदांच्या 50 प्रतिक्षा गादी ठेवण्यात येईल,
  • सदरील गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्ग निहाया गुणाकंन यादी (Merit) तयार करण्यात येईल त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल.
  • ज्या पदांकरीता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्या पदांकरीता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापुर्वी त्याची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात यईल.
  • वरील दोन्ही पध्दतीनुसार नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांना रुजू करुन घेण्यापूर्वी सर्व आवश्यक मुळ प्रमाणपत्रे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे यांची तपासणी व खात्री करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राहील.
  • निवडीसाठी शिफारस अथवा दबाव आणल्यास उमेदवार अपात्र ठरविला जाईल.
  • अर्जासोबत 1) वयाचा पुरावा 2) सामाजिक आरक्षणानुसार जातीचा पुरावा 3) पदवी/पदविका प्रमाणपत्र 4) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका 5) शासकिय/निमशासकिय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र 6) संगणक व टायपिंग बाबतचे प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे स्वसाक्षांकित (Self Attested) करुन सादर करावीत, अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी,
  • अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय 18 वर्षा पेक्षा कमी असावे व कमाल वयोमर्यादे पेक्षा जास्ता नसावे. (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) अर्जदार हा शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजादारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

खालील प्रमाणे उणिवा असलेले अर्ज अपात्र करण्यात येतील :- ZP WARDHA NHM Recruitment 2024

  • विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • खुल्या प्रवर्गा साठी 150/- रु चा DDव राखीव प्रवर्गा साठी 100/- रु DD लावणे गरजेचे आहे. जर उमेदवारांनी नमूद केलेले प्रवर्ग निहाय सादर केले नाही तर अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज सादर करताना जातीचा प्रमाणपत्र (Cat Certificate) लावणे गरजेचे आहे. अथवा आपला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • ज्या उमेदवारांनी अर्जा सोबत जोडलेले दस्तावेज व Mark sheet अस्पष्ट आढळल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.

ZP WARDHA NHM Recruitment 2024
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 डिसेंबर, 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Leave a Comment