नोकरीची सुवर्णसंधी… ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय नागरी आराेग्य अभियान अंतर्गत (Thane Municipal Corporation) (TMC) TMC Recruitment 2024 पदभरती… आजच अर्ज करा…!!! जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
ठाणे महानगरपालिके मध्ये राष्ट्रीय नागरी आयोग्य अभियान अंतर्गत (Thane Municipal Corporation) (TMC) TMC Job 2024 (TMC Recruitment 2024) TMC Career 2024 (Thane Muncipal Corporation Recruitment 2024) (TMC Vacancy 2024) (Thane Municipal Job 2024) (TMC Bharti 2024) विविध संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून महापालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 04 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 20 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 17 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 - TMC Recruitment 2024
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 04.12.2024 ते 20.12.2024.
- 📃ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 20.12.2024.
- 📃मुलाखतीचा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📝 कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – ठाणे महानगरपालिका क्षेत्र.
एकूण – 42 पदे- TMC Recruitment 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | वैद्यकीय अधिकारी | 20 |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 19 |
3 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
4 | प्रोग्राम असिस्टंट -QA | 01 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- TMC Recruitment 2024 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात दिनांक 20.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | वैद्यकीय अधिकारी |
|
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
|
3 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक |
|
4 | प्रोग्राम असिस्टंट -QA |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗Important link🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍
( गुगल फॉर्म लिंक ) |
👉 येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- TMC Recruitment 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरातीच्या शेवटच्या दिनांक 20.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- पद क्र. 01 साठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 69 वर्षे असावे.
- पद क्र. 02 साठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 64 वर्षे असावे.
- पद क्र. 03 व 04 साठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असावे.
- मागासवर्गा साठी 05 वर्षे सुट.
परीक्षा शुल्क (फी)- TMC Recruitment 2024
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता- रु. 150/-
- राखील प्रवर्गातील (मागासवर्ग) उमेदवारांकरीता- 100/-
- धनादेश (DD) – INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY THANE या नावाने काढावा.
- फक्त युनियन बॅकेचा धनादेश (DD) जोडणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही बॅकेचे DD स्वीकारले जाणार नाही.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – TMC Recruitment 2024 Salary
अ.क्र. | पदांचे नांव | प्रतिमहा मानधन |
1 | वैद्यकीय अधिकारी | Rs. 60000/- |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 17000/- |
3 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | Rs. 32000/- |
4 |
प्रोग्राम असिस्टंट -QA | Rs. 18000/- |
- ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छूक उमेदवारांडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-400602 येथे दि. 04.12.2024 ते 20.12.2024 पर्यंत अर्ज सादर करावे.
अर्ज भरण्या बाबतच्या सूचना-TMC Recruitment 2024
- सर्व उमेदवारांनी वर नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक
- शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
- जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
- अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.
- अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी, एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- गुगल फॉर्म परीपुर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.
- पुर्ण भरलेल्या गुगल फॉमची स्वसाक्षांकित प्रत खाली दिल्यानुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- 400602 येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. टपालाने / कुरीयरने सादर
- करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगलफॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- शैक्षणिक अर्हतेबाबतच्या सविस्तर व अचूक तपशील नोंद करावा.
- अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिराती मध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.
- अर्ज भरत असताना अंतिम वर्षात मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे.
- अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमुद असल्यास संबधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये संबंधित संस्थेकडून प्रमाणित करून घ्यावे.
- उमेदवारांनी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल.
- पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या मूळ गुणपत्रिका सादर न केल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल.
- पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता/पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
अनुभव- TMC Recruitment 2024
- MBBS अर्हता धारकांस शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये, त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही.
- इतर पदासाठी केवळ शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचाच विचार निवड प्रकियेत करण्यात येईल. खाजगी, स्वयंसेवी संस्था, बाहय यंत्रणाव्दारे कार्यरत पदावर कामाचा अनुभवाचा विचार करणेत येणार नाही. समकक्ष कामाचा अनुभव ग्राहय धरणेत येईल, तसेच अनुभव प्रमाणपत्र सादर करताना संस्थेचे लेटर हेड, जावक क्र. व अनुभव कालावधीचा स्वयंस्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे. नसल्यास अनुभव प्रमाणपत्र ग्राहय धरणेत येणार नाही. नियुक्तीच्या आदेशाच्या आधारे गुण दिले जाणार नाहीत.
- अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा. सदर कालावधी अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल.
उमेदवारांचा फोटो व स्वाक्षरी- TMC Recruitment 2024
- उमेदवाराने गुगल फॉर्म वर फोटोकरीता राखीव जागेवर त्याचे अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिकटवावा. फोटो स्टेपल करू नये,
- राखीव जागेत स्वाक्षरी करावी.
निवड प्रक्रिया –TMC Recruitment 2024
- सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार/गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकार मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.उमेदवारांनी गुणवत्तेनुसार/गुणांकन पध्दतीसाठी जाहिरातीची PDF चे अवलोकन करावे.
- उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि.17.03.2023 रोजीच्या पत्रानुसार निकष लावून 1:3 व 1:5 उमेदवारांची निवड गुणांकन पध्दतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/पदविका परीक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.
- मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांचे जा. क्र राआसोमं/मनुष्यबळ पदभरती/10670-11016/2023 दि. 27.04.2023 रोजीचे पत्राद्वारे प्राप्त सुचनांनुसार गुणांकन पद्धतीने पात्र उमेदवारांची करण्यात येईल.
- गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येणार असून त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश Mail द्वारे टपालाद्वारे निर्गमित करण्यात येतील.
- गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणान्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही.
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना –TMC Recruitment 2024
- सदर पदभरती प्रक्रिये बाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी “http://www.thanecity.gov.in “संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
- जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
- जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत मुळ कागदपत्रासह नियुक्तीचे ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये व मुळ कागदपत्रांमध्ये पडताळणीच्या वेळीस तफावत आढळल्यास तसेच उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करणेत येईल, अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
- फॉर्म भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म सोबत खालील कागदपत्रे क्र. 1 ते 14 जोडण्यात यावीत. वैद्यकीय अधिकारी, या पदासाठी संकेत स्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- 400602 (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) या पत्त्यावर दि.04.12.2024 ते दि.20.12.2024 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. विहित मुदतीत टपालाने, कुरीअरने अर्ज स्विकारले जातील.
- पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
- वयाचा पुरावा
- पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
- गुणपत्रिका
- कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
- शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
- जात/वैधता प्रमाणपत्र
- आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- आधारकार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
- अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
- वाहन चालविण्याचा परवाना
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
- फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
- युनियन बँकेचा Demand Draft
- अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.
- जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना राहतील.
- सदर जाहिरात ठाणे महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, सदरहू भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकते नुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत.
टीप.- TMC Recruitment 2024
- काही अपरिहार्य कारणास्तव गूगल फॉर्म लिकमध्ये बिघाड आल्यास वर दिलेल्या ऑफलाईन जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात उमेदवाराने अर्ज सादर करावा. अर्ज भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत जाहिरातीतील मध्ये नमूद केलेली 1 ते 14 कागदपत्रे जोडण्यात यावीत व ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- 400602 (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) या पत्त्यावर विहित मुदतीत टपालाने, कुरीअरने सकाळी 11.00 ते सायं 5.00 या वेळेत सादर करावीत.
- गुगल फार्मचा अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे. सदर लिफाफयावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे. महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- वैद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखतीचा दिनांक http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर, 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.