भारतीय लघु उद्योग विकास बैंक (सिडबी) मध्ये sidbi bank job 2024 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड B या पदाच्या एकुण 72 जागांची पदभरती.
भारतीय लघु उद्योग विकास बैंक (सिडबी) sidbi bank job 2024 मध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड A आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड B या पदाच्या एकुण 72 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून भारतीय लघु उद्योग विकास बैंक (सिडबी) च्या www.sidbi.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 08 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 02 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 2 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

एकूण – 72 पदे how many vacancy in sidbi bank job 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) | 50 |
2 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) | 10 |
3 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) | 06 |
4 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) | 06 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Education Qualification of sidbi bank job 2024
- सदर वरील दोन्ही पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 08.11.2004 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील दोन्ही पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) | पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM तसेच 02 वर्षे अनुभव |
2 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) | कोणत्याही शाखेतील पदवी -60% गुणांसह किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी – 55% गुणांसह तसेच 05 वर्षे अनुभव |
3 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) | विधी पदवी – 50% गुणांसह तसेच 05 वर्षे अनुभव |
4 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) | इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) – 60% गुणांसह तसेच 05 वर्षे अनुभव |
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठी कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- sidbi bank job 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 08.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- पद क्रमांक 01 साठी किमान 21वर्षे ते कमाल वय 30वर्षे
- पद क्रमांक 02 ते 04 साठी किमान 25वर्षे ते कमाल वय 33वर्षे
- (SC-ST-माजी सैनिक साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट)
परीक्षा शुल्क (फी)- sidbi bank job 2024
- अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.1100/-
- SC/ST / PwBD साठी – 175/-
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

- टप्पा 1 (Phase I) – For all Gr’s परीक्षा पध्दती – 👉 येथे क्लिक करा
- टप्पा 2 (Phase II) – Manager Gr A/Manager Gr B परीक्षा पध्दती – 👉 येथे क्लिक करा
- टप्पा 2 (Phase II)Manager Gr B (Legal) परीक्षा पध्दती – 👉 येथे क्लिक करा
- टप्पा 2 (Phase II)Manager Gr B (IT) परीक्षा पध्दती – 👉 येथे क्लिक करा
- अंदाजित वेळापत्रक (Tentative Schedule for Exams) – 👉 येथे क्लिक करा
निवड/ परीक्षा पध्दती
- वरील दोन्ही पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे दोन टप्पयात ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
- निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यात प्रक्रियेचा समावेश असेल- पहिला टप्पा ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा ऑनलाइन परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत
- परीक्षा महाराष्ट्र राज्यासाठी फक्त मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर जिल्हयाच्या/ मुख्यालयी घेण्यात येईल.
- परीक्षेच्या हॉलतिकिटावर नमूद केलेली रिपोर्टिंग वेळ चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वीची आहे.
- टप्पा 1 (Phase I) च्या 200 गुणांची 200 प्रश्नांची परीक्षा असेल. ऑनलाईन परीक्षेसाठीचा कालावधी परीक्षा 1 तास 30 मिनिटांची आहे प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षेच्या प्रत्येक विषयात किमान गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि किमान एकूण गुण देखील विचारात घेतले जाणार आहेत.
- टप्पा 2 (Phase II) ची परीक्षा हि पेपर I हा 75 गुणांचा व पेपर II हा 100 गुणांच्या स्वरूपाची असेल. परीक्षेसाठीचा सर्व एकुण कालावधी 3 तास 30 मिनिटांची आहे. प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन परीक्षेच्या प्रत्येक विषयात किमान गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि किमान एकूण गुण देखील विचारात घेतले जाणार आहेत.
- टप्पा 3 (Phase III) ची परीक्षा हि म्हणेज वैक्यतीक मुलाखत असेल, मुलाखती हि 100 गुणांची असेल.
- SIDBI ने निश्चित केलेल्या किमान कट-ऑफ गुणांच्या आधारे टप्पा 1 च्या ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना टप्पा 2 च्या मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. SIDBI ने निश्चित केलेल्या किमान कट-ऑफ गुणांवर आधारित टप्पा 2 परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुख्य परीक्षेतील ऑनलाइन परीक्षेत तसेच मुलाखतीत प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- उमेदवारांना परीक्षेचे दिनांक तसेच मुलाखती साठीचे दिनांक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर कळविले जाईल.
अर्ज कसा करावा- how to apply for sidbi bank job 2024
- उमेदवारांनी प्रथम बँकेच्या www.sidbi.in/en/careers वेबसाइटवर जाऊन त्यानंतरच्या ऑन-लाइन अर्ज उघडण्यासाठी “अप्लाय ऑनलाइन” या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवार पाहिजे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. तात्पुरती नोंदणी क्रमांक दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस आणि पासवर्डही पाठवला जाईल.
- उमेदवार एकाच वेळी अर्ज भरण्यास असमर्थ असल्यास, प्रविष्ट केलेला डेटा जतन करू शकतो. “सेव्ह आणि नेक्स्ट” टॅब निवडावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना “सेव्ह आणि नेक्स्ट” वापरावा. ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्याची आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरा आणि पडताळणी करा, कारण त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यांनतर “पूर्ण नोंदणी” वर क्लिक करा.
- उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे.
- प्रमाणपत्रे / मार्कशीट / ओळख पुरावा यात कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
- तुम्ही भरलेला तुमचा तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढील बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
- उमेदवार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
- “पूर्ण नोंदणी” करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
- आवश्यक असल्यास तपशील बदला आणि छायाचित्राची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच “पूर्ण नोंदणी”वर क्लिक करा,अपलोड केलेले स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे आणि तुम्ही भरलेले इतर सर्व तपशील बरोबर आहेत कि नाही ते तपासा.
- “पेमेंट” टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
- ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट झाला असेल.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर, 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.