Join Whatsapp Group

Join Telegram Group

NMMC Bharti 2025 नवी मुंबई महानगरपालिका मध्ये या पदांची पदभरती…जाणुन घ्या संपुर्ण माहिती…

नोकरीची सुवर्णसंधी… नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) (NMMC Bharti 2025) मध्ये पदभरती…जाणून घ्या संपुर्ण माहिती…

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) NMMC Bharti 2025 (NMMC Recruitment 2025) (NMMC Vacancy 2025) (NMMC Job 2025) (NMMC Career 2025) मध्ये विविध संवर्गाच्या रिक्त विविध 620 जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून NMMC नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 28 मार्च, 2025 पासून ते दिनांक 11 मे, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 11 मे, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

NMMC Bharti 2025
NMMC Bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - NMMC Bharti 2025
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 28.03.2025 ते 11.05.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 11.05.2025
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- संकेतस्थळावर स्वतंत्र्यरीत्या प्रसिध्द करण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – नवी मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात

 एकूण –620 पदे NMMC Bharti 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 बायोमेडिकल इंजिनिअर 01
2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35
3 कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) 06
4 उद्यान अधीक्षक 01
5 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 01
6 वैद्यकीय समाजसेवक 15
7 डेंटल हायजिनिस्ट 03
8 स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) 131
9 डायलिसिस तंत्रज्ञ 04
10 सांख्यिकी सहाय्यक 03
11 इसीजी तंत्रज्ञ 08
12 सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) 05
13 आहार तंत्रज्ञ 01
14 नेत्र चिकित्सा सहाय्यक 01
15 औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी 12
16 आरोग्य सहाय्यक (महिला) 12
17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 06
18 पशुधन पर्यवेक्षक 02
19 सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) 38
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) 51
21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15
22 सहाय्यक ग्रंथपाल 08
23 वायरमन (Wireman) 02
24 ध्वनीचालक 01
25 उद्यान सहाय्यक 04
26 लिपिक-टंकलेखक 135
27 लेखा लिपिक 58
28 शवविच्छेदन मदतनीस 04
29 कक्षसेविका/आया 28
30 कक्षसेविक (वॉर्डबॉय) 29

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- Qualification for NMMC Bharti 2025

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात नमुद दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरीक असावा.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 बायोमेडिकल इंजिनिअर
  • बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी
  • 02 वर्षे अनुभव
2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
3 कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
  • बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी
  • 02 वर्षे अनुभव
4 उद्यान अधीक्षक
  • B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
5 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
  • पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा
  • 03 वर्षे अनुभव
6 वैद्यकीय समाजसेवक
  • समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW
  • 02 वर्षे अनुभव
7 डेंटल हायजिनिस्ट
  • 12वी उत्तीर्ण
  • दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.
  • 02 वर्षे अनुभव
8 स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)
  • BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM
  • 02 वर्षे अनुभव
9 डायलिसिस तंत्रज्ञ
  • B.Sc /DMLT
  • डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण
  • 02 वर्षे अनुभव
10 सांख्यिकी सहाय्यक
  • सांख्यिकी पदवी
  • 02 वर्षे अनुभव
11 इसीजी तंत्रज्ञ
  • भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
  • ECG टेक्निशियन कोर्स
  • 02 वर्षे अनुभव
12 सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
  • शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी
  • 02 वर्षे अनुभव
13 आहार तंत्रज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा
  • न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी
  • 02 वर्षे अनुभव
14 नेत्र चिकित्सा सहाय्यक
  • 12वी उत्तीर्ण
  • ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
15 औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी
  • B.Pharma
  • 02 वर्षे अनुभव
16 आरोग्य सहाय्यक (महिला)
  • 12वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
  • 12वी उत्तीर्ण
  • ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)
  • 02 वर्षे अनुभव
18 पशुधन पर्यवेक्षक
  • 12वी उत्तीर्ण
  • पशुसंवर्धन डिप्लोमा
  • 02 वर्षे अनुभव
19 सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)
  • 10वी उत्तीर्ण
  • ANM
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
  • 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक
  • 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
22 सहाय्यक ग्रंथपाल
  • ग्रंथालय पदवी (B.Lib.)
23 वायरमन (Wireman)
  • 12वी उत्तीर्ण
  • NCVT (तारतंत्री-Wireman)
24 ध्वनीचालक
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (Radio/TV/Mechanical)
25 उद्यान सहाय्यक
  • B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
26 लिपिक-टंकलेखक
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
27 लेखा लिपिक
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
28 शवविच्छेदन मदतनीस
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
29 कक्षसेविका/आया
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
30 कक्षसेविक (वॉर्डबॉय)
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- NMMC Bharti 2025 age limit

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 11.05.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय असावे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 43 वर्षे वय असावे
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे.
  • अंशकालीन पदवीधर/पदविकाधारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे राहील.
  • दिव्यांग कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
  • प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच भुकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.

परीक्षा शुल्क (फी)- NMMC Bharti 2025 Application Fee

  • खुलाप्रवर्गासाठी परीक्षा शुल्क –1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 900/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – NMMC Bharti 2025 Salary
पदाचे नाव Pay Scale (Rs.)
बायोमेडिकल इंजिनिअर S-15  : 41800-132300
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) S-14  : 38600-122800
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) S-14  : 38600-122800
उद्यान अधीक्षक S-14  : 38600-122800
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी S-14  : 38600-122800
वैद्यकीय समाजसेवक S-14  : 38600-122800
डेंटल हायजिनिस्ट S-13  : 35400-112400
स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) S-13  : 35400-112400
डायलिसिस तंत्रज्ञ S-13  : 35400-112400
सांख्यिकी सहाय्यक S-13  : 35400-112400
इसीजी तंत्रज्ञ S-13  : 35400-112400
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) S-13  : 35400-112400
आहार तंत्रज्ञ S-10  : 29200-92300
नेत्र चिकित्सा सहाय्यक S-10  : 29200-92300
औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी S-10  : 29200-92300
आरोग्य सहाय्यक (महिला) S-10  : 29200-92300
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक S-8  : 25500-81100
पशुधन पर्यवेक्षक S-8  : 25500-81100
सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) S-8  : 25500-81100
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) S-8  : 25500-81100
शस्त्रक्रियागृह सहाय्यक S-7  : 21700-69100
सहाय्यक ग्रंथपाल S-7  : 21700-69100
वायरमन (Wireman) S-6  : 19900-63200
ध्वनीचालक S-6  : 19900-63200
उद्यान सहाय्यक S-6  : 19900-63200
लिपिक-टंकलेखक S-6  : 19900-63200
लेखा लिपिक S-6  : 19900-63200
शवविच्छेदन मदतनीस S-1  : 1500-47600
कक्षसेविका/आया S-1  : 1500-47600
कक्षसेविक (वॉर्डबॉय) S-1  : 1500-47600

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना- NMMC Bharti 2025
  • परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल.
  • संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द केली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
  • उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापुर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहीत अर्हता/अर्टीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • अराखीव (खुला) पर्याकरिता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा (मागासवर्ग उमेदवारांसह) विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
  • संबंधित पदाच्या/परीक्षेच्या जाहिरात/अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
  • अर्ज सादर केलेल्या उमेदवारास प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी संबंधित पदाची आवश्यक शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांस निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा.
  • महिला उमदेवारांनी त्यांच्या नावामध्ये काही बदल असल्यास (लग्नापुर्वीच नाव व लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे जसे विवाह नोंदणी दाखला, राजपत्र सादर करणे अनिवार्य राहिल.
  • पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्यचे लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र /वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्राचा / संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार मुळ शैक्षणिक / इतर कागदपत्रांची संबंधीत शैक्षणिक विद्यापीठ / संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
  • वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग/क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव पात्रता व ज्या दिव्यांग उमेदवारास मदतनीस घ्यावयाचा आहे इत्यादी बाबत न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे/निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास, संबंधीत दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  • ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय/समाज कल्याण/आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा सैनिक बोर्ड/अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे. अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणांतर्गत येणा-या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता/अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
  • अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यापुर्वी पुर्ण केलेला असावा.
  • प्राप्त अर्जाच्या संख्येचा विचार करुन निवड प्रक्रियेचे स्वरुप ठरविण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त व मा. निवड समिती यांना राहील.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) वा अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या / पत्त्याच्या दोन भागांमध्ये एक स्पेसने जागा सोडावी.
  • एस.एस.सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रांवरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील विहीत प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी.
  • उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमुद केलेले विहीत शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी भाषेचे विहीत गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र तसेच मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिका-याने दिलेले जात प्रमाणत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आणि अ.जा.व अ.ज.प्रवर्ग वगळता अन्य सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र, इत्यादी सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती, तसेच उमेदवाराची समांतर आरक्षणांतर्गत निवड झाली असल्यास, शासन निर्णयानुसार विहीत प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती सादर करणे आवश्यक असेल.
  • संबंधित पदाच्या / परीक्षेच्या जाहिरात / सूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अबलोकन करुनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
  • सदरची परीक्षा स्थगित करणे, राह करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.

NMMC Bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक11.05.2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment