पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी… नागपुर महानगरपालिका मध्ये (Nagpur NMC) (Nagpur Municipal Corporation) Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 पदभरती… आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
नागपुर महानगरपालिका मध्ये (Nagpur NMC) (Nagpur Municipal Corporation) Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 (Nagpur Mahanagarpalika Job 2024) Nagpur Mahanagarpalika Career 2024 (Nagpur NMC Recruitment 2024) (Nagpur Mahanagarpalika Vacancy 2024) (Nagpur NMC Bharti 2024) (Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024) कनिष्ठ अभियंता / नर्स परीचारीका / वृक्ष अधिकारी / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाच्या रिक्त पदाची पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून महापालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 26 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 15 जानेवारी, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 15 जानेवारी, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 26.12.2024 ते 15.01.2025.
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 15.01.2025.
- 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
- 📝 मुलाखत चाचणी /कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – नागपूर महापालिका कार्यक्षेत्र.
एकूण – 245 पदे- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 36 |
2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 03 |
3 | नर्स परीचारीका | 52 |
4 | वृक्ष अधिकारी | 04 |
5 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 150 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात नमूद दिनांक 15.01.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
- संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
|
2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) |
|
3 | नर्स परीचारीका |
|
4 | वृक्ष अधिकारी |
|
5 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 15.01.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- अराखीव उमेदवारांसाठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे असावे.
- दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे
- खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
- प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
परीक्षा शुल्क (फी)- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.1000/-
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. साठी – रु.900/-
- माजी सैनिक उमेदवार साठी परीक्षा शुल्क लागु राहणार नाही.
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 Salary
अ.क्र. | पदांचे नांव | वेतनश्रेणी |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | S-14: 38600-122800 |
2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | S-14: 38600-122800 |
3 | नर्स परीचारीका | S-13: 35400-112400 |
4 | वृक्ष अधिकारी | S-13: 35400-112400 |
5 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | S-8: 25500-81100 |
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया: – Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 apply online
- नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन खाते (User Registration) उघडणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहील.
- प्रस्तुत परीक्षेसाठीचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील.
- इच्छुक व पात्र उमेदवाराला वेब आधारित (Web based) ऑनलाईन अर्ज नागपुर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विहीत कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराने आपला वैध ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नोंदविणे आवश्यक आहे तसेच सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत येथ असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता “New User Registration” यावर Click करून नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करून “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in ID व Password ई-मेल आयडी द्वारे प्राप्त होईल तद्वंतर सदर Log-in IID व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याचो प्रक्रीया सुरू करता येईल.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी. उमेदवाराने सदर अर्जात स्वतः बाबतची माहिती अचूक रितीने भरावी. तसेच विहीत आकारातील स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड करावी, आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर व आवश्यक ते शुल्क योग्य पध्तीने भरल्यानंतर अर्ज स्वीकृत होईल. एकदा शुल्क भरणा केल्यानंतर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही व त्याचाबतच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.
- ऑनलाईन अर्ज सादर करणेबाबत तसेच उमेदवारांसाठी इतर संबंधीत सविस्तर सूचना अर्ज नागपुर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- Online अर्ज सादर करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- अर्जाव्दारे चुकोची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारास सदर परीक्षेसाठी व यापुढील सर्व निवडीकरिता अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज सादर करतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत्तः चे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, किंवा बँक पासबुक यापैकी किमान कोणतेही एक फोटो असलेले मूळ ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- कोणताही उमेदवार हा संबंधित परोक्षतर्गत सेवासाठी विहित करण्यात आलेलो अर्हता किंवा पात्रता धारण करीत असल्यास, कोणतीही एक किया त्यापेक्षा अधिक संवर्ग परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकेल. मात्र अशा प्रत्येक परीक्षेसाठी त्याने परीक्षा शुल्क स्वतंत्र भरणा करणे आवश्यक आहे. मात्र एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक Online अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- Candidates who want to apply for Multiple posts can “Submit & Pay” the fees for Single Application First & then can click “+” “Apply Post” Section to apply for other posts using same Registration Number.
- संवर्गनिहाय परीक्षेसाठी अर्ज करणान्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन, आवश्यकता असल्यास अशी परीक्षा एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल. एकापेक्षा अधिक सत्र असल्यास प्रत्येक सत्रासाठी अभ्यासक्रमावर आधारीत वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल.
- परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त Online पध्दतीनेच करावयाचा आहे. यात नमूद केल्याप्रमाणे Online पध्दती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने भरणा केलेले परीक्षा शुल्क हे विचारात घेतले जाणार नाही व असा उमेदवार हा परीक्षेसाठी पात्र असणार नाही.
- परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाईन पध्दतीने कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यु.पी.आय अथवा नेटर्वकिंगद्वारे करता येईल.
- परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश या कार्यालयाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित आल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार होऊन अर्ज Successfully Submit झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरुन आणि/अथवा खात्यातून लॉगआऊट होऊ नये.
- परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किवा कसे, याची स्थिती (Status) लगेच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची व अर्ज Successfully Submit झाल्याची खात्री करणेबायलची जबाबदारी उमेदवाराची आहे.
- परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या/अधिसूचनेच्या अनुषंगाने विहीत दिनांकापूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारीची या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही.
- उमेदवाराने एका पेक्षा अधिक सेवा अथवा परीक्षेसाठी अर्ज कलेला असल्यास विहित केल्याप्रमाणे प्रत्येक परीक्षा अथवा सेवेसाठी त्याने स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणा करणे आवश्यक आहे.
निवडीची पद्धत – Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
- परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.
- नियुक्तीच्या पात्रतेसाठी उमेदवारांना चाचणी परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील, तथापि, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आधिकरष्टया दुर्बल घटक / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50 टक्के ऐवजी 45टक्के गुण मिळविण्याची अट राहील.
- लेखी परीक्षेत मागासवर्गीय उमेदवारांना 45 टक्के पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्यास जाहिरातीत नमूद केलेली पदे रिक्त राहत असली तरीही कोणत्याही परिस्थिती किमान पात्र गुणांची टक्केवारी (45%) पेक्षा कमी केली जाणार नाही आणि अराखीव उमेदवारांसाठी 50टक्के पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार उपलब्ध न आल्यास जाहिरातीत नमूद केलेली पटे रिक्त राहत असली तरीही कोणत्याही परिस्थिती किमान पात्र गुणांची टक्केवारी (50%) पेक्षा कमी केलो जाणार नाही, तसेच याबाबत कोणतेही निवेदन प्राप्त झाल्यास त्यावर विचार केला जाणार नाही. सदरील निवेदने कोणतीही कार्यवाही न करता परस्पर दप्तरदाखल करण्यात येतील.
- गट-क पदांकरीता 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
- सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 02 (दोन) गुण ठेवण्यात येतील.
- गट-क संवर्गातील पदांकरीता परीक्षेचा कालावधी 02.00 (दोन) तासाचा राहील.
- संवर्ग क्र.1 ते 5 या सर्व पदांकरीता मौखिक (मुलाखती) परीक्षा घेण्यात येणार नाहीत.
- अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास किंवा रिक्त राहील्यास कनिष्ठ पदावरील उमेदवारास रिक्त होणाऱ्या पदावर हक्क सांगता येणार नाही किवा श्रेणीवाढ करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही. यावाबतची निवेदने प्राप्त झाल्यास कोणतीही कार्यवाही न करता परम्पर दप्तरदाखल करण्यात येतील.
- प्रत्येक संवर्गाकरीता वेगवेगळ्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील तसेच Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.
- ज्या पदांकरिता प्रचलित नियमानुसार विभागीय/व्यावसायिक परीक्षा विहीत केली असेल अथवा आवश्यक असेल तेथे त्यासंबंधी केलेल्या नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा आवश्यक राहील.
- परोक्षासाठी विहित केलेला अभ्यासक्रम तसेच, परीक्षेची रचना व सर्वसाधारण सूचना अर्ज नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षा केंद्र निवडः- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- परीक्षासाठी केंद्राच्या उपलब्धतेनुसार उमेदवारास परीक्षा केंद्र व परीक्षा दिनांक तसेच परीक्षा सत्र प्रवेशपत्राव्दारे नेमून देण्यात येईल, याबाबत नागपुर म.न.पाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय तिम मानण्यात येईल,
- वरीलप्रमाणे परोक्षा केंद्र निवडोची प्रक्रिया, उमेदवाराने अर्जामध्ये दिलेले पर्याय व उपलब्ध परीक्षा केंद्र या आधारे करण्यात येईल. तीनही पसंतीक्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायापैकी कोणत्याही कारणांमुळे एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास इतर उपलब्ध परीक्षा केंद्रापैकी परीक्षा केंद्र नेमून देण्यात येईल. याबाबत आयुक्त, महानगरपालिका, नागपूर यांचे निर्णय अंतिम राहील.
- नेमून देण्यात आलेले परीक्षा केंद्र / परीक्षा दिनांक किंवा परीक्षा सत्रात बदल करण्याची कोणतीही विनंती मान्य करण्यात येणार नाही, तसेच त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार विचारात घेण्यात येणार नाही.
- नेमून देण्यात आलेले कोणतेही परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही तर त्या परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची व्यवस्था जवळच्या दुसऱ्या परीक्षा केंद्रावर करण्यात येईल, असा बदल केल्यास, त्याबाबतची सूचना Email किवा SMS व्दारे तसेच संकेतस्थळावरील सूचनेव्दारे संबंधितांना दिली जाईल.
- विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रिये करीता विचार केला जाणार नाही, यासंदर्भात या कार्यालयाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सूचनांमधील संबंधित तरतुदीचे अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहिल.
प्रवेशपत्राबाबत :- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- प्रस्तुत परीक्षेपूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या दिनांकानंतर उमेदवाराचे प्रवेशपत्र उमेदवाराच्या प्रोफाईलद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशपत्रात नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
- प्रवेशपत्रात दिलेल्या सूचना प्रमाणे उमेदवाराने Online परीक्षा अर्ज भरताना जे छायाचित्र अपलोड केलेले असेल असे छायाचित्र प्रवेशपत्रावर चिकटवून ते परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर https://nmenagpur.gov.in उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे अंदाजे 10 दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, किंवा बैंक पासबूक, यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
- फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मूळ पुरावा व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाण पत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.
- नागपुर महानगरपालिकेद्वारे परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधीत परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशव्दारावरच ठेवावे लागेल, अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबधीत उमेदवारांची राहील. या संदर्भात कोणत्याही नुकसानीस म.न.पा./परीक्षा घेणारी संस्था किवा शाळा / महाविद्यालय व्यवस्थापन जवाबदार असणार नाही.
- सदर उपरोक्त नमूद प्रक्रीयेच्या अनुषंगाने या जाहिराच्या तरतुदीत काही विसंगती/ संदिग्धता असल्यास त्याबाबत आयुक्त, महानगरपालिका, नागपूर यांचे निर्णय अंतिम राहील.
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- अर्ज करतेवेळी अपलोड केलेल्या दस्ताऐवजांची पडताळणी ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र करतांना करण्यात येणार नसून अर्जदाराने अर्ज करतेवेळी भरलेली माहिती व अपलोड केलेले दस्तऐवज खरे आहेत असे गृहीत धरून लेखी परीक्षेसाठी अनुज्ञेय ठरविले जाईल. तथापी लेखी परीक्षेसाठी अनुज्ञेय ठरवले याचा अर्थ त्याची पात्रता विहीत कागदपत्रे व निकषांची तपासणी करून ठरवली आहे, असे समजता येणार नाही.
- आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक प्रमाणपत्रे / कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील.
- लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या दस्तऐवजाच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतोल, सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील, त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास किंवा विहीत पात्रतेचे निकष पूर्ण करित नसल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- उक्त सर्व पदांसाठी अर्ज फक्त नागपूर महानगरपालिकेचे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज नागपूर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ:- https:// www.nmcnagpur.gov.in वरून करता येईल.
- अर्ज सादर करण्याच्या सूचना नागपूर महानगरपालिकेचे https:// www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- नागपूर महानगरपालिका येथे अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन स्वरुपात विविध संवर्गाकरिता नमूद आवश्यक परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन स्वरुपात फी चा भरणी केल्यानंतर अर्ज “Your Application is Successfully Submitted” असा मॅसेज येईलपर्यंत उमेदवारांना लॉग आऊट करू नये. अर्ज Successfully Submit झाल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील.
- पात्रता/आरक्षणा संदर्भात अर्जामध्ये निर्विवादपणे दावा केलेला असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये प्रत्येक दाव्याच्या पुष्टयार्थ आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्याशिवाय पात्रता/आरक्षणाचा दावा ग्राहय समजला जाणार नाही.
- अर्जदाराने त्याचे पात्रते संदर्भातील सर्व आवश्यक दस्ताऐवज / प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचे वेळो उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी/राहीवासी असावा आणि महाराष्ट्रात 15 वर्ष अधिवास (Domicile) करीत असल्याचावत त्याने सक्षम प्रधिकरणाचे किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्यायावत जन्मदाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परिक्षेची प्रवेशपत्रे, परिक्षेचे वेळापत्रक, बैठकव्यवस्था, कागदपत्रे, पडताळणीसाठी पात्र अमेदवारांची यादी, निवेदने, तात्पुरती निवड व अतिरिक्त सूची, अंतिम निवड व अतिरिक्त सूची व इतर सर्व सूचना हया वेळोवेळी नागपुर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील त्याबाबत उमेदवारांसोबत पत्रव्यवहार अथवा वेगळयाने संपर्क केला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी भरतीप्रक्रीया पूर्ण होईपर्यन्त वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात, संकेतस्थाळावरील सूचना पाहिल्या नाही या कारणास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांला नियमित तत्वावर नियुक्ती नंतर नागपूर महानगरपालिका सेवा विनियम लागु होतील.
- निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अंनियो 1005/ सेवा-4 दिनाक 31.10.2005 नुसार नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजेच परिभाषिक अंशदान निवृनी योजना (Defined Contribution Pension Scheme-DCPS) लागू राहील.
- शासन निर्णय क्र संकीर्ण/2007/पडताळणी नवी-26 दि. 21.11.2007अन्वये निवड झालेल्या उमेदवाराविरुध्द कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही अथवा सिध्द झालेली नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबधीत पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्याची/तीची सदर पदावर नेमणूक केली जाईल.
- महाराष्ट्र शासनाकडीत आदेश क्र. एस. आर. व्ही. 2000/प्र.क्र. 17/2000/2012 दि.01.07.2005 नुसार लहान कुटुबांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.
- नमूद पदावर अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीपूर्वी उमेदवाराची नागपूर महानगरपालिकेचे रुग्णालय यांच्याकडून वैद्यकिय तपासणी केली जाईल व त्यामध्ये वैद्यकिय दृष्ट्या पात्र झाल्यानंतर नियुक्ती दिली जाईल. उमेदवारांनी नौकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल.
- नियुक्तीसाठी पात्र असणा-या उमेदवारानी विहित केलेली इतर बंधपत्र/प्रतिज्ञापत्र/वचनपत्र/करारपत्र इत्यादी विशिष्ठ स्वरुपात भरुन दिल्याशिवाय महापालिका सेवेत रुजू करुन घेतले जाणार नाहीत.
- निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवारांची निवड झाल्यावर किंवा नियुक्ती दिल्यानंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांचे अर्जात व ऑनलाईन परिक्षेचे वेळी दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी निवड, नियुक्ती कोणत्याही टप्यावर रह करण्यात येईल. याबाबत कोणताही पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
- महापालिकेने निश्चित केलेल्या दिनांकास व ठिकाणी पात्र उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- सरळसेवा भरती प्रक्रियेत अर्ज सादर केल्यापासून निवड प्रक्रिया संपेपर्यन्तच्या काळात घडणारे बदल उदा. निलंबन, दंड, फौजदारी खटला, शिस्तभंग विषयक अथवा तत्सम कारवाई इत्यादो, वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर घडून आलेले बदल न कळविल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- नागपूर महानगरपालिकेने वेळावेळी घेतलेले निर्णय संबंधीतावर बंधनकारक असतील.
- जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर राजकीय किंवा इतर प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
- मध्यस्त/ठग/नागपुर माहानगरपालिकेच्या संबंध असल्याचे भासविणा-या व्यक्ती यांच्या गैरमार्गान नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे.
अर्ज सादर करणेसाठी मदत (HELP DESK)- Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे, प्रवेशपत्र डाउनलोड करणे यासंबंधी किवा इतर अडचणी संबंधात उमेदवार मदतकक्षाशी (Help Desk) टोल फ्री क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करू शकतात. यासाठी (HELP DESK) दूरध्वनी क्रमांक यावर (+91-7996108777) (NMC HELPINE NO-9175414380) सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10.00 वाजता ते 06.00 वाजता संध्याकाळी या कालावधीत संपर्क साधून उमेदवार मदत प्राप्त करून येऊ शकतात.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक दिनांक 15.01.2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.