Join Whatsapp Group

Join Telegram Group

Nagpur Court Peon bharti 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ मध्ये या पदाची पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ (Bombay High Court) (Nagpur Court Peon bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!! जाणुन घ्या संपूर्ण माहिती…!!

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ मध्ये (Bombay High Court) Nagpur Court Peon bharti 2025 (Nagpur Court Peon Recruitment 2025) Nagpur Court Peon Career 2025 (Nagpur Court Peon Job 2025) (Nagpur Court Peon Vacancy 2025) (Nagpur Court Job 2025) (Nagpur Court bhrti 2025)  (Nagpur Court Recruitment 2025)  शिपाई  या पदाच्या एकुण 45 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून मुंबई उच्च न्यायालय च्या https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 18 फेब्रुवारी, 2025 पासून ते 04 मार्च, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 04 मार्च, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

Nagpur Court Peon bharti 2025
Nagpur Court Peon bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - Nagpur Court Peon bharti 2025
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 18.02.2025 ते 04.03.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 04.03.2025
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
  • 📌मुलाखत/ कागदपत्रे पडताळणी दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ कार्यक्षेत्र

एकूण – 45 पदे- Nagpur Court Peon bharti 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 शिपाई 45

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- Nagpur Court Peon bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 18.02.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी उमेदवार महाराष्ट्राचा नागरीक असावा.
  • मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
अ.क्र. पदांचे नांव

शैक्षणिक अर्हता

1 शिपाई
  • किमान 7 वी उत्तीर्ण.

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐  👉 येथे क्लिक करा
Self-Declaration (Form – A) 👉 येथे क्लिक करा
Character Certificate 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Nagpur Court Peon bharti 2025 age

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 18.02.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • अराखीव उमेदवारांसाठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे असावे.
  • न्यायालयातील/ शासकीय कर्मचारी साठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल मर्यादा नाही.

परीक्षा शुल्क (फी)- Nagpur Court Peon bharti 2025 fee

  • नोंदणी फी (Registration Fee) – रु.50/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – Nagpur Court Peon bharti 2025 Salary

अ.क्र. पदांचे नाव वेतनश्रेणी
1 शिपाई S: 03 – Rs. 16,600 – 52,400/-

पात्र उमेदवारीकरीताच्या अटी :- Nagpur Court Peon bharti 2025
  • उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे)
  • उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
  • उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी युपी.एस.सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याव्दारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडप्रक्रीयेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे.
  • उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
  • महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, 2005 नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
  • उमेदवार सद्यःस्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास, त्याने तिने विद्यमान कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यावी आणि ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे अशा उमेदवाराने नागपूर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करावे,

उमेदवारांची अल्पसूची :- Nagpur Court Peon bharti 2025
  • जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार, उमेदवारावी शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसुची (Shortlist) तयार करण्यात येईल, तसेच, शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखातीसाठी अल्पसुची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर, यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः- Nagpur Court Peon bharti 2025
  • अर्ज सादर करताना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरील सुचनाय काटेकोरपणे पालन करुनच अर्ज सादर करावा.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
  • पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटव्दारे दिनांक 18/02/2025 ते दिनांक 04/03/2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 18/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता उघडेल आणि दिनांक 04/03/2025 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता बंद होईल.
  • उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करुनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करुन ठेवावा सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोष्टाने पाठवू नयेत. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट साईज चा फोटो (3.5 सें.मी X 4.5 सें.मी) व स्वतःची स्वाक्षरी (3 सें.मी X 2.5 सें.मी) स्कॅन करुन 40 KB पेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पध्दतीने दोन स्वतंत्र फाईल्स .jpg /.jpeg format मध्ये करुन ऑनलाईन अर्जात दर्शविलेल्या ठिकाणी फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • टिप: फोटो व स्वाक्षरी अपलोड झाल्याची खात्री करावी. अर्जावर दुसऱ्याचा फोटो /स्वाक्षरी असल्यास उमेदवारास निवडीच्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
  • उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.
  • उमेदवाराने https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वर क्लिक करुन Recruitment मध्ये Peon च्या Apply Online पर्यायावर क्लिक करावे तद्‌नंतर, SBICollect व्दारे ऑनलाईन फी भरावी, तद्‌नंतर SBICollect Reference Number प्राप्त होईल त्याचा वापर करून ऑनलाईन फॉर्म भरावा.
  • उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरुन झाल्यावर सर्वात शेवटी I Agree बटणावर क्लिक करुन अर्ज प्रस्तुत (Submit) करावा.
  • उमेदवाराने स्वतःच्या माहितीस्तव जो फॉर्म भरलेला आहे. त्याची प्रत Print Application मध्ये जाऊन Registration ID No. टाकून Print काढून स्वतःकडे जतन करून ठेवावी.
  • ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण जाहिरातीतील नमुद शैक्षणिक पात्रता व इतर बाबीची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्विकारला जाईल.

ऑनलाईन नोंदणी शुल्क- Nagpur Court Peon bharti 2025
  • उमेदवाराला अर्ज करतांना नोंदणी शुल्क रु. 50/- (रूपये पन्नास मात्र) ‘SBICollect’ व्दारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क हे नापरतावा आहे. त्यासाठी उमेदवारांनी ‘User Manual’ मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे
  • अर्ज स्विकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणी शुल्क खात्यात जमा झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल.
  • ‘SBICollect’ सुविधेव्दारे तयार केलेले नियम, अटी व शर्तीची कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाच्या, नामपूर खंडपीठ प्रशासनाची नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील या बाबत कोणत्याही स्वरुपाची चौकशी दाव्याची दखल घेतली जाणार नाही.

स्वालील कागदपत्रांच्या मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणी साठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात :-Nagpur Court Peon bharti 2025
  1. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/ एस.एस.सी वे बोर्ड प्रमाणपत्र) (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/Board Certificate of SSC)
  2.  शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे गुणपत्रक (7वी, 10वी, 12वी, इत्यादि)
  3. शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे प्रमाणपत्र (7वी, 10वी, 12वी, इत्यादि)
  4. जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारीत्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र, प्रतिष्ठीत व्यक्तीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमुद असावा (जाहीरातीसोबत “नमुना ब” नुसार)
  5. तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी)
  6. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  7. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
  8. लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र (जाहिरातीसोबत “नमुना अ” नुसार)
  9. उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील,
  10. उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.
  11. संबंधीत इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह
  12. न्यायालय प्रशासनाने मागणी केलेले इतर कोणतेही दस्तऐवज

परिक्षेचे स्वरूपः- Nagpur Court Peon bharti 2025
  • आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सुची प्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.

(१) चाळणी लेखी परीक्षा- 30 गुण (उत्तीर्ण गुण किमान 15) लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. (objective type multiple choice questions) परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असुन प्रत्येक प्रश्नास 01 गुण असेल. प्रश्नपत्रीकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील.

(२) शारीरिक दक्षमता, विशेष अर्हता चाचणी- 10 गुण

(3) तोंडी मुलाखत- 10 गुण

  • निवड प्रक्रियेचे एकुण गुण – 50
  • चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल व शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल
  • उमेदवारांची निवड ही उक्त नमुद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.
  • परीक्षेसाठी उमेदवाराना प्रवेश प्रमाणपत्र ई-मेल द्वारे पाठविण्यात येईल. उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे सक्तीचे आहे. प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • अल्पसुवीत पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल, यासाठी उमेदवारांने संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना- Nagpur Court Peon bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी उमेदवाराने पदासंबंधीची संपूर्ण जाहिरात वाचावी ऑनलाईन अर्ज हा इंग्रजी भाषेत भरणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी उमेदवाराने स्वतःचा अद्यावत पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी स्वतंत्र स्कॅन करुन 40 KB पेक्षा जास्त साईज होणार नाही अशी -jpg/.jpeg format मध्ये दोन वेगवेगळ्या फाईल्स तयार ठेवाव्यात.
  • ऑनलाईन अर्जातील संपूर्ण माहिती अचुक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे.
  • उमेदवाराने माहिती भरताना संपूर्ण नावाचे (Spelling) त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार अचुक नमुद करावे.
  • उमेदवाराने पत्रव्यवहाराचा अचुक पत्ता व पिनकोडसहीत द्यावा अर्धवट पत्ता देऊ नये.
  • उमेदवाराने उपयोगात असलेलाच ईमेल, मोबाईल क्रमांक द्यावा.
  • उमेदवाराने आपली जन्मतारीख शैक्षणिक कागदपत्रे अथवा जन्म प्रमाणपत्राप्रमाणे अचुक लिहावी.
  • उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी.
  • उमेदवारास ज्या भाषांचे ज्ञान आहे त्यांची नोंद करावी.
  • उमेदवाराने त्याला ओळखत असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तीकडून चांगली वर्तणूक व चारित्र्याबाबतचा दाखला प्राप्त करावा आणि अर्ज भरतांना सदरील व्यक्तीची माहिती अर्जात नमूद करावी. सदरील दाखला हा जाहिरात प्रसिध्दिनंतरच्या तारखेचा असावा. सदरील प्रतिष्ठित व्यक्ती ही उमेदवाराची जवळची नातेवाईक मित्र नसावी.
  • उमेदवारास असलेल्या अपत्यांविषयीची योग्य ती माहिती सदरील स्कान्यात भरावी. विवाहित उमेदवारास आज रोजी अपत्य नसेल तर त्याने स्कान्यात “0” (शुन्य) अशी माहिती भरावी
  • ज्या-ज्या शैक्षणिक प्रमाणपत्रांवर CGPA / SGPA or grade देण्यात येते. तेथे प्राप्त शैक्षणिक पात्रतेबाबत संबंधीत बोर्ड विद्यापीठ संस्थेच्या निकषांनुसार सर्व शैक्षणिक वर्षाच्या सत्रांच्या एकूण गुण व अर्जदारास मिळालेले एकुण गुण, शैक्षणिक पात्रतेच्या संबंधीत स्कान्यात नमुद करावेत
  • उमेदवाराविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला असल्यास किंवा पुर्वी एखा‌द्या प्रकरणात फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी खरी माहिती दडवून ठेवल्यास उमेदवार नियुक्तीस अपात्र ठरेल. नियुक्तीनंतर सदर माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास उमेदवारास कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरीवरुन कमी केले जाईल
  • उमेदवाराने अर्जात योग्य त्या ठिकाणी, 40 केबी पेक्षा कमी आकार असलेल्या स्वतःच्या स्कॅन फोटोची आणि स्कॅन स्वाक्षरी jpg / jpeg format मधील फाईल Upload करावी.
  • अर्ज Submit करण्यापूर्वी उमेदवाराने भरलेला अर्ज बरोबर आहे याची खात्री करावी, Declaration चे वाचन करावे व नंतरच I Agree या बटणावर Click करावे अर्ज Submit झाल्यावर उमेदवारास अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज Submit झाल्यानंतर येणारा Registration ID Number उमेदवाराने नमुद करून घ्यावा आणि Print Application हा पर्याय Select करून ऑनलाईन अर्जाची Print out काढावी.

Nagpur Court Peon bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 04 मार्च, 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment