Join Whatsapp Group

Join Telegram Group

mukhasevika bharti 2024 मुख्यसेविका, गट-क या संवर्गाच्या एकुण 102 जागांची पदभरती

महिला व बाल विकास विभाग (एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत) mukhasevika bharti 2024 मुख्यसेविका, गट-क या संवर्गाच्या एकुण 102 जागांची पदभरती.

mukhasevika bharti 2024 महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत मुख्यसेविका, गट-क या संवर्गातील सरळसेवा मार्फत एकूण  102 जागाची पदभरती करीता फक्त पात्र महिला उमेदवारांकडून महिला व बाल विकासाच्या www.icds.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 14 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 03 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 03 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा.

mukhasevika bharti 2024
mukhasevika bharti 2024

 

एकूण – 102 पदे – mukhasevika bharti 2024

अ.क्र. पदांचे नांव वेतनश्रेणी पदे
1 मुख्यसेविका, गट-क S-13: 35400-112400 102

शैक्षणिक अर्हता व अनुभव- mukhasevika bharti 2024

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र महिला उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 14.10.2004 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मुख्यसेविका, गट-क या पदासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच त्यांचेकडे महाराष्ट्र राज्याचे आधिवासाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 मुख्यसेविका, गट-क  मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेले

वयोमर्यादा- mukhasevika bharti 2024

  • किमान वय 18 वर्षे व कमाल अमागास वर्ग साठी 38 वर्षे व मागासवर्गासाठी 43 वर्षे.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे
  • खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादेतून सुट देण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क (फी)- mukhasevika bharti 2024

  • खुला प्रवर्ग- रु.1000/-
  • मागास प्रवर्ग- रु.900/-
  • माजी सैनिकांना परीक्षा शुक्ल (फि) आकारली जाणार नाही.

टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

Important link
जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
परीक्षेचे स्वरूप येथे क्लिक करा
मुख्यसेविका, गट-क  या पदाच्या कर्तव्य व जबाबदा-या येथे क्लिक करा

 

ऑनलाईन परीक्षा सुचना – mukhasevika bharti 2024

  • सदर पदासाठी महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर (Computer Based Test) ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा दिनांक बाबतीची माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
  • परीक्षेच्यावेळी उमेदवारांना नेमुण दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षावेळेच्या 01 तास 30 मिनिटे अगोदर उपस्थितीची जबाबदारी उमेदवारांची राहील.
  • सदर पदासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • परीक्षा हि ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल,
  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची असेल , प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण देण्यात येणार आहे.
  • मुख्यसेविका, गट-क या पदाकरिता मौखिक परिक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.
  • परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून अंतिम शिफारस / निवडसूची तयार केली जाईल.
mukhasevika bharti 2024
mukhasevika bharti 2024

 

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

सर्वसाधारण सुचना:-

  • अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  • मुख्यसेविका, गट-क या पदासाठी फक्त एकच अर्ज सादर करता येणार आहे
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ www.icds.gov.in असा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.icds.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी पध्दतीने दिनांक 14 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 03 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
  • ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकाल www.icds.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा केंद्र बदला बाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  • मुख्यसेविका, गट-क या पदावरील नियुक्ती हि महाराष्ट्र राज्यात कोठेही नियुक्ती व बदलीस पात्र राहील.
  • मुख्यसेविका, गट-क या पदावर निवड झालेल्या महिला उमेदवारांना पायाभुत व उजळणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण करणे आवश्यक आहे.
  • परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या प्रोफाईल व्दारे परिक्षेपूची सर्व साधारणपणे 10 दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परिक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमूद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाच्दारे कळविण्यांत येईल, याबाबतची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक आठवडा अगोदर प्रसिध्द करण्यात येईल
  • परीक्षेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराण्यासह निवड समितीच्या संकेतस्थावरील अधिकृत ई-मेल वर संपर्क साधावा.
  • परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पैनकार्ड किया फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्जिग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

Leave a Comment