Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC Group C 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 साठी एकूण  1333 पदांच्या भरती

MPSC Group C 2024 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

MPSC Group C 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  MPSC Group C 2024 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 साठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभांगातर्गत संवर्गातील एकूण  1333 पदांच्या भरतीकरीता अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 04 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर कृपया माहितासाठी जाहिरात पहा.

MPSC Group C combine exam 2024
MPSC Group C 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  MPSC Group C 2024 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 साठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभांगातर्गत संवर्गातील एकूण  1333 पदांच्या भरतीकरीता अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 04 नोव्हेंबर 2024 आहे. सदर जाहिरातीसाठी 100 गुणांची संयुक्त पूर्व परीक्षा तसेच 400 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी- 

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी  दिनांक – 14 ऑक्टोबर, 2024 ते दिनांक 04 नोव्हेंबर, 2024
  • ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक 04 नोव्हेंबर, 2024
  • भारतीय स्टेट बॅकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक –  दिनांक 06 नोव्हेंबर, 2024
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक –  दिनांक 07 नोव्हेंबर, 2024

एकुण जागा- 1333 पदे- MPSC Group C 2024

अ.क्र. संवर्ग विभाग एकुण पद
1 लिपिक टंकलेखक मंत्रालयीन विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 786
2 कर सहायक वित्त विभाग 482
3 तांत्रिक सहायक वित्त विभाग 09
4 उद्योग निरिक्षक उद्योग उर्जा व कामगार विभाग 39
5 बेलिफ व लिपिक विधी व न्याय विभाग 17
एकुण 1333 पदे

 

प्रस्तुत परीक्षेमधुन शासनास भरावयाच्या विविध कार्यालयातील संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परीशिष्ट – एक मध्ये नमुद  केले आहे.

वेतनश्रेणी-

1 लिपिक टंकलेखक S-6 : 19900-63200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
2 कर सहायक S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
3 तांत्रिक सहायक S-10 : 29200-92300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
4 उद्योग निरिक्षक S-13 : 35400-112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
5 बेलिफ व लिपिक S-6 : 19900-63200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

 

शैक्षणिक पात्रता- Educational Qualification for MPSC Group C Exam

1 लिपिक टंकलेखक

कर सहायक

तांत्रिक सहायक

बेलिफ व लिपिक

मान्यता प्राप्ता विद्यापिठ पदवी किंवा

महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता

2 उद्योग निरिक्षक
  1. विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापिठाची पदवी  किंवा
  2. सांविधिक विद्यापिठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी  मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तूविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरीक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका
3 मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
4 कर सहायक-  मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (मराठी व इंग्रजी टंकलेखन दोन्ही आवश्यक.)

बेलिफ व लिपिक/ लिपिक-टंकलेखक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (मराठी व इंग्रजी टंकलेखन दोन्ही पैकी एक आवश्यक.)

संगणक टंकलेखन अर्हता-  बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट (लागु असेल त्याप्रमाणे) समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार्ह आहे.

 

Important link

जाहिरात (Notification) पहा
ऑनलाईन अर्ज पहा
परीक्षा योजना पहा
अभ्यासक्रम पहा

 

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

टंकलेखन कौशल्य चाचणी- MPSC Group C 2024

  •  कर सहायक, बेलिफ व लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदभरतीसाठी  विहित टंकलेखक कौशल्य चाचणी अनिवार्य आहे.
  •  बेलिफ व लिपिक , लिपिक – टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारीत स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
  •  कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी/ पात्र ठरणे आवश्यक राहील.
  •  टंकलेखन कौशल्य चाचणी हि केवळ अर्हताकारी/ पात्रता स्वरूपाची असेल.
  • बेलिफ व लिपिक/ लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुंकपग्रस्त, व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानूसार टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही.

आयोगाच्या सर्वसाधारण सुचना-

  • अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

Leave a Comment