Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC Group B 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 साठी एकूण 480 पदांच्या भरती

MPSC Group B 2024

MPSC Group B 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Group B 2024 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 साठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभांगातर्गत संवर्गातील एकूण 480 पदांच्या भरतीकरीता अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 04 नोव्हेंबर 2024 06 जानेवारी, 2025 आहे. सविस्तर कृपया माहितासाठी जाहिरात पहा.

MPSC Group B combine exam 2024
MPSC Group B 2024
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक 14 ऑक्टोबर, 2024 ते दिनांक 04 नोव्हेंबर, 2024 06 जानेवारी, 2025
  • ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक 04 नोव्हेंबर, 2024 06 जानेवारी, 2025
  • भारतीय स्टेट बॅकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – दिनांक 06 नोव्हेंबर, 2024 08 जानेवारी, 2025
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक –  दिनांक 07 नोव्हेंबर, 2024 09 जानेवारी, 2025

एकुण जागा- 480 पदे- MPSC Group B 2024

अ.क्र. संवर्ग विभाग एकुण पद
1 सहायक कक्ष अधिकारी  (ASO) विविध मंत्रालयीन प्रशासकीय  विभाग 55
2 राज्य कर निरिक्षक (STI) वित्त विभाग 209
3 पोलिस उप निरिक्षक (PSI) गृह विभाग  216

 

वेतनश्रेणी-MPSC Group B 2024

1 सहायक कक्ष अधिकारी  (ASO) S-14: 38600-122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
2 राज्य कर निरिक्षक (STI)
3 पोलिस उप निरिक्षक (PSI)

 

शैक्षणिक पात्रता-  Educational Qualification

सहायक कक्ष अधिकारी

राज्य कर निरिक्षक

पोलिस उप निरिक्षक

मान्यता प्राप्ता विद्यापिठ पदवी किंवा

महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता

 

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे

 

  • सदर जाहिरातीसाठी 100 गुणांची संयुक्त पूर्व परीक्षा तसेच 400 गुणांची मुख्य परीक्षा होणार आहे.
  • पोलिस उपनिरिक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल
  • शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी स्वरूपाचे असून एकुण गुणांपैकी किमान 60 टक्के गुण म्हणजेच 60 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहील. शारिरीक चाचणीमध्ये किमान 60 टक्के गुण धारण करणा-या उमेदवारांकरीता 40 गुणांची मुलाखत घेण्यात येईल.

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता शारीरिक चाचणी व मुलाखत:-

1. शारिरीक पात्रता-  Physical Qualification.

संवर्ग पुरुषांसाठी / स्वत:ची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरीता महिलांसाठी / स्वत:ची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरीता
पोलिस उप निरिक्षक (1) उंची – 165 सें. मी. (अनवाणी)   (कमीत कमी)

(2) छाती – न फुगविता 79 से.मी.  फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक

उंची –  157 सें.मी. (अनवाणी)

(कमीत कमी)

 

2. शारीरिक चाचणीचा तपशील:- 

पुरुषांसाठी / स्वत:ची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरीता महिलांसाठी / स्वत:ची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरीता
(1) धावणे (800 मीटर )  – कमाल गुण – 50 (1) धावणे (400 मीटर )  – कमाल गुण – 50
(2) पुल अप्स  – कमाल गुण – 20 (2) लांब उडी – कमाल गुण – 30
(3) गोळाफेक-वजन-7.260 कि.ग्रॅ. – कमाल गुण – 15 (3) गोळाफेक-वजन-4 कि.ग्रॅ.- कमाल गुण – 20
(4) लांब उडी  – कमाल गुण – 15

 

3. मुलाखत:-

(1) शारीरीक चाचणीच्या निकालाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. 

(2) पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता मुलाखत 40 गुणांची असेल.

(3) मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/अधिसूचनेतील अर्हता/अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

(4)पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) तयार करण्यात येईल.

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

Important link
जाहिरात (Notification) पहा
ऑनलाईन अर्ज पहा
परीक्षा योजना पहा
अभ्यासक्रम पहा

 

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 साठी आयोगाच्या सर्वसाधारण सुचना-

  • अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सर्व संवर्गातील पद भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
  • सर्व संवर्गाकरीता मुख्य परीक्षेमधून पात्र होण्याकरीता शतमत (Percentile) पध्दत लागू राहील.
  • अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल.
  • शिफारसपात्र उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
  • आयोगाच्या वेळापत्रकानुसार अशा उमेदवारांच्या उंची व छातीविषयक फेरमोजमापनाकरिता दिनांक, वेळ व ठिकाण निश्चित करण्यात येईल.
  • संयुक्त पूर्व परीक्षेच्या एकत्रित निकालाच्या आधारे गट-ब सेवेच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उपरोक्त चारही संवर्गांसाठी एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

 

Leave a Comment