Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPSC Civil Services Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विविध पदाची पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) (MPSC Civil Services Bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  (Maharashtra Public Service Commission) MPSC Civil Services Bharti 2025 (MPSC Recruitment 2025) MPSC Job 2025 (MPSC Vacancy 2025) (Civil Services Gazetted Combined 2025) (Civil Services Gazetted Combined Bharti 2025)  (MPSC Civil Services Combined Bharti 2025)   राजपत्रित गट-अ व गट-ब या पदाच्या एकुण 385 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या www.mpsc.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 28 मार्च, 2025 पासून ते 17 एप्रिल, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 17 एप्रिल, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

MPSC Civil Services Bharti 2025
MPSC Civil Services Bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - MPSC Civil Services Bharti 2025
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 28.03.2025 ते 17.04.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 17.04.2025
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – 28 सप्टेंबर, 2025
  • 📍नोकरी ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र राज्यात.

एकूण – 385 पदे- MPSC Civil Services Bharti 2025

अ.क्र. विभागाचे नांव संवर्ग पदे
1 सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब 127
2 महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब 144
3 सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 114

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- MPSC Civil Services Bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदांसाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्र राज्याचा नागरीक असावा.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. पदांचे नांव

शैक्षणिक अर्हता

1 सामान्य प्रशासन विभाग
  • पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.
2 महसूल व वन विभाग
  • वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
3 सार्वजनिक बांधकाम विभाग
  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- MPSC Civil Services Bharti 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.07.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वनक्षेत्रपाल या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे असावे.
  • इतर संवर्ग पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18/19 वर्षे असावे.
  • मागसवर्गीय/ आ.दु. घ./ अनाथ उमेदवारांसाठी साठी 05 वर्षे सुट
  • दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असेल.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

परीक्षा शुल्क (फी)- MPSC Civil Services Bharti 2025

  • अमागासवर्ग साठी परीक्षा शुल्क (फी)- रु.  544/-
  • मागसवर्गीय/ आ.दु. घ./ अनाथ / दिव्यांग साठी परीक्षा शुल्क (फी) – रु.  344/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसाधारण सुचना- MPSC Civil Services Bharti 2025

  • अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सर्व संवर्गातील पद भरतीकरीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
  • सर्व संवर्गाकरीता मुख्य परीक्षेमधून पात्र होण्याकरीता शतमत (Percentile) पध्दत लागू राहील.
  • अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल.
  • शिफारसपात्र उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
  • मागासवर्गीय उमेदवार, अनाथ, दिव्यांग आणि खेळाडू यांना अनुज्ञेय असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
  • विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

परीक्षेचे टप्पे :– MPSC Civil Services Bharti 2025

  • प्रस्तुत परीक्षेमधून वरील विविध संवर्गाकरीता खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येईल :-
अ. क्र. संवर्ग टप्पे संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण
1 राज्य सेवा परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा व

स्वतंत्र मुख्य परीक्षा

400 1750 275
2 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 400 50
3 महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 400 50
  • राज्य सेवा मुख्य परीक्षा सुधारित पद्धतीनुसार वर्णनात्मक स्वरुपाची घेण्यात येणार असून प्रस्तुत परीक्षेचा सविस्तर तपशील आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरील परीक्षा योजना व अभ्यासक्रम या सदरामध्ये सविस्तर नमूद केले आहेत.
  • संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवारांना, शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असल्यास ते वरीलपैकी एकापेक्षा जास्त संवर्ग/सेवेसाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प (Option) द्यावा लागेल.
  • संबंधित संवर्गाच्या पदभरतीकरीता उमेदवाराने दिलेला/ले विकल्प हा/हे संबंधीत संवर्ग भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येईल/येतील.
  • राज्य सेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षेकरीता वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे. सदर निवडलेल्या व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये बदल करण्याची विनंती पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.
  • संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना सेवेसाठी दिलेला विकल्प तसेच, संबंधित संवर्गाच्या परीक्षेमधून भरावयाची पदसंख्या लक्षात घेऊन मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येते. तसेच सामाईक पूर्व परीक्षेमधील गुणांच्या पात्रतेच्या आधारे उमेदवारांनी दिलेल्या विकल्पानुसार प्रत्येक सेवानिहाय स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
  • आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना/पद्धती तसेच अभ्यासक्रमानुसार भरतीप्रक्रिया व निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल.

पूर्व परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत :- MPSC Civil Services Bharti 2025

अर्ज सादर करण्याचे टप्पे :-

  • खाते निर्माण करणे अथवा आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
  • पूर्व परीक्षेस अर्ज करताना सेवा व संवर्गाचा विकल्प देणे तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा व वन सेवा मुख्य परीक्षा करीता वैकल्पिक विषयांची निवड करणे व भाषेचे माध्यम निवडणे.
  • विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
  • जिल्हा केंद्र निवड करणे.

विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे :- MPSC Civil Services Bharti 2025

  • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना जाहिरातीत नमूद कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
  • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाच्या/सवलतीच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

जिल्हा केंद्र निवड :- MPSC Civil Services Bharti 2025

  • अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही
  • एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हाकेंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुस-या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल.
  • एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेले जिल्हा केंद्र / परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
  • वरीलप्रमाणे जिल्हा केंद्रनिवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्त्याच्याआधारे संबंधित महसुली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत आयोगाचे त्या त्या वेळचे धोरण व आयोगाचा निर्णय अंतिम मानण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र :- MPSC Civil Services Bharti 2025

  • परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर (https://mpsconline.gov.in) उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे 7 दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रवेशप्रमाणपत्र परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी डाऊनलोड केलेले मूळ प्रवेश प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वत:चे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • परीक्षेच्या दिनांकापूर्वी 3 दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
  • परीक्षेच्यावेळी स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
  • नावांमध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावांत बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे..

परीक्षेस प्रवेश – MPSC Civil Services Bharti 2025

  • संबंधित परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेच्या उपस्थितीसाठी पात्र समजण्यात येईल.
  • प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “उमेदवारांकरीता माहिती” विभागातील “ सूचना ” अंतर्गत “ सर्वसाधारण सूचना ” तसेच “ परीक्षा ” या सदराखालील “ परीक्षा योजना ” विभागातील “ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा” मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे.
  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025 च्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे; याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वत: घेणे आवश्यक राहील.
  • पदभरतीसंदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, 2024 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कार्यवाही करण्यात येईल.
  • आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
  • सदर जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शारीरिक मोजमापे/अर्हता :- Physical Test for MPSC Civil Services Bharti 2025

राज्य सेवा परीक्षा
पदाचे नाव पुरुष उमेदवारांकरीता महिला उमेदवारांकरीता
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ (1) उंची-163 सें. मी. (अनवाणी)(कमीत कमी)

(2) छाती – न फुगविता 79 से.मी. फुगविल्यानंतर किमान 5 से.मी. वाढलेली असावी

(3) चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत.

(4) “चांगली दृष्टी” याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा 6/24, सुधारल्यानंतर + 2.5 सह, प्रत्येक डोळ्याचा 6/6, इशिहार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमीची दृष्टी. डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे, कोणताही सैल तिरळेपणे नसावेत.

(1) उंची-155 सें.मी. (अनवाणी)(कमीत कमी)

(2) चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत.

(3) “चांगली दृष्टी” याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा 6/24, सुधारल्यानंतर + 2.5 सह, प्रत्येक डोळ्याचा 6/6, इशिहार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमीची दृष्टी. डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे, कोणताही सैल तिरळेपणे नसावेत.

उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट-ब उंची-165 सें. मी. (अनवाणी)(कमीत कमी)

छाती – न फुगविता 79 से.मी.

फुगविण्याची क्षमता- किमान 5 से.मी. आवश्यक

 

उंची-155 सें.मी.

(अनवाणी) (कमीत कमी)

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
पदाचे नाव पुरुष उमेदवारांकरीता महिला उमेदवारांकरीता
 

वनक्षेत्रपाल, गट-ब

 

(अ) अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार
उंची – 163 सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

छाती – न फुगवता 79 सें.मी. (कमीत कमी)

फुगविण्याची क्षमता- न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सें.मी.पेक्षा कमी नसावा.

उंची – 150 सें.मी.

(अनवाणी) (कमीत कमी)

(ब)अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार 
उंची – 152.5 सें.मी.(अनवाणी)(कमीत कमी)

छाती – न फुगवता 79 सें.मी. (कमीत कमी)

फुगविण्याची क्षमता- न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सें.मी.पेक्षा कमी नसावा.

उंची – 145 सें.मी.

(अनवाणी) (कमीत कमी)

(क)दृष्टी :- सुधारणेनंतर (After Correction) + 4.00 OD सह प्रत्येक डोळयाची दृष्टितीक्ष्णता (Visual Acuity) 6/6 असावी. बाह्य डोळयावर कोणतेही रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा.
वनक्षेत्रपाल, गट-ब पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 कि.मी. 16 कि.मी. अंतर चार तासांत चालून पूर्ण करण्याची शारिरीक क्षमता असणे आवश्यक.


MPSC Civil Services Bharti 2025

  • ऑनलाईन अर्ज प्रणाली 28 मार्च 2025 पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment