Join Whatsapp Group

Join Telegram Group

mahila bal vikas bharati 2024 महिला व बाल विकास विभागाच्या विविध संवर्गाच्या एकुण 236 पदांसाठी भरती

महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विभागाच्या गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गाच्या एकुण 236 पदांसाठी भरती mahila bal vikas bharati 2024 (मुदतवाढ)

महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे mahila bal vikas bharati 2024 यांच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) -२ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट-क -७२ पदे  (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क -१ पद (४) ) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क -२ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क -५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क- ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड- ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड -३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड- ६ पदे हे अशा एकुण 236 रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 03 नोव्हेंबर 2024 दिनांक 10 नोव्हेंबर, 2024 (मुदतवाढ) आहे. सविस्तर कृपया माहितासाठी जाहिरात पहा. 

mahila bal vikas bharati 2024
mahila bal vikas bharati 2024

 

एकुण 236 पदे- mahila bal vikas bharati 2024

अ.क्र. संवर्ग वेतनश्रेणी पद
1 संरक्षण अधिकारी S-14: 38600-122800 2
2 परिविक्षा अधिकारी S-14: 38600-122800 72
3 लघुलेखक (उच्चश्रेणी) S-16: 44900-142400 1
4 लघुलेखक (निम्नश्रेणी) S-15: 41800-132300 2
5 वरिष्ठ लिपीक /सांख्यिकी सहायक S-8 : 25000-81100 56
6 संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) S-6 : 19900-63200 57
7 वरिष्ठ काळजी वाहक S-3 : 16600-52400 4
8 कनिष्ठ काळजी वाहक S-1 : 15000-47600 36
9 स्वयंपाकी S-3 : 16600-52400 6

 

शैक्षणिक अर्हता / पात्रताmahila bal vikas bharati 2024

जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 03-11-2024 रोजी शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

अ.क्र. संवर्ग शैक्षणिक अर्हता
1 संरक्षण अधिकारी
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य शाखेची पदव्युत्तर पदवी.
  • समाजकार्य विषयांसंबधी 03 वर्षाचा अनुभव.
2 परिविक्षा अधिकारी
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
3 लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • 10 वी उत्तीर्ण.
  • शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण आणि
  • मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट
4 लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • 10 वी उत्तीर्ण
  • शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण आणि
  • मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट.
5 वरिष्ठ लिपीक /सांख्यिकी सहायक
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
6 संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
  • कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाजकार्य, गृहविज्ञान किंवा पोषणआहार यापैकी कोणत्याही विषयाची पदवी
  • विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य
7 वरिष्ठ काळजी वाहक
  • 10 वी उत्तीर्ण
  • पुरुष उमेदवारांसाठी खालील शारीरिक पात्रता अनिवार्य-
  •  उंची- किमान – 163 सेंमी
  •  छाती- न फुगवता  – किमान 79 सेंमी
8 कनिष्ठ काळजी वाहक
  • 10 वी उत्तीर्ण
  • पुरुष उमेदवारांसाठी खालील शारीरिक पात्रता अनिवार्य-
  • उंची- किमान – 163 सेंमी
  • छाती- न फुगवता  – किमान 79 सेंमी
9 स्वयंपाकी
  • 10 वी उत्तीर्ण

 

Important link

जाहिरात (Notification)

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज

येथे क्लिक करा

संगणक आधारीत परीक्षेचे स्वरूप येथे क्लिक करा

वयोमर्यादा-mahila bal vikas bharati 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 03.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • किमान वय 18 वर्षे व कमाल अमागास वर्ग साठी – 38 वर्षे व मागासवर्गासाठी – 43 वर्षे.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी – वयोमर्यादा 45 वर्षे.
  • अनाथ उमेदवारांसाठी  – वयोमर्यादा 43 वर्षे.
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी – वयोमर्यादा 55 वर्षे
  • खेळाडू उमेदवारांसाठी  – वयोमर्यादा 43 वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी – वयोमर्यादा 45 वर्षे.
  • माजी सैनिक वयोमर्यादेतून सुट

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

परीक्षा शुल्क (फी)-mahila bal vikas bharati 2024

  1. खुला प्रवर्ग- रु.1000/-
  2. मागास प्रवर्ग- रु.900/-

सर्वसाधारण सुचना:-

  1. अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. 
  4. उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क् (फी ) भरणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप-

  1. वरील पदांसाठी मौखिक परीक्षा (मुलाखत) घेण्यात येणार नाही.
  2. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुमक्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. 
  3. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा मराठी व इंग्रजी भाषेमध्ये  वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
  4. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकूण २०० गुणांची असेल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  5. लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क, लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क, स्वयंपाकी, गट-क या पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल  त्यानंतर ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. १२० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ३० गुणांची  एकूण १२० गुणांची  परीक्षा घेण्यात येईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायीक चाचणी साठी पात्र राहतील. लेखी परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन नियुक्तीकरीता शिफारस करण्यात येईल. 
  • ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणीसाठी कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक-  ७३५३००९०९४ (वेळ सोमवार ते शनिवारी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००)

Leave a Comment