Join Whatsapp Group

Join Telegram Group

MahaTransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये या विविध पदाची पदभरती…!! जाणुन घ्या संपूर्ण माहिती…!!

नोकरीची सुवर्णसंधी… महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) (MahaTransco Bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण  कंपनी (MahaTransco) (Mahapareshan)  MahaTransco Bharti 2025 (MahaTransco Recruitment 2025) MahaTransco Career 2025 (MahaTransco Job 2025) (Mahapareshan  Bharti 2025) (Mahagenco Recruitment 2025) मध्ये विविध संवर्गाच्या विविध पदाच्या एकुण 493 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण  कंपनीच्या  www.mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 12 एप्रिल, 2025 पासून ते 02 मे, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 02 मे, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

MahaTransco Bharti 2025
MahaTransco Bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌MahaTransco Bharti 2025
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 12.04.2025 ते 02.05.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 02.05.2025
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – मे/जुन-2025
  • 📝मुलाखत/कागदपत्र पडताळणी दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – महाराष्ट्र राज्य

एकूण – 493 पदे- MahaTransco Bharti 2025

अ.क्र. जाहिरात क्रमांक पदांचे नांव पदे
1 15/2024  कार्यकारी अभियंता (Civil) 04
2 16/2024 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
3 17/2024 उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
4 18/2024 सहाय्यक अभियंता (Civil) 134
5 19/2024 सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
6 20/2024 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
7 21/2024 व्यवस्थापक (F&A) 06
8 22/2024 उपव्यवस्थापक (F&A) 25
9 23/2024 उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
10 24/2024 निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- MahaTransco Bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 03.04.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1  कार्यकारी अभियंता (Civil)
  • B.E/BTech (Civil)
  • 09 वर्षे अनुभव
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)
  • B.E/BTech (Civil)
  • 07 वर्षे अनुभव
3 उपकार्यकारी अभियंता (Civil)
  • B.E/BTech (Civil)
  • 03 वर्षे अनुभव
4 सहाय्यक अभियंता (Civil)
  • B.E/BTech (Civil)
5 सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)
  • CA / ICWA
  • 08 वर्षे अनुभव
6 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)
  • CA / ICWA
  • 05 वर्षे अनुभव
7 व्यवस्थापक (F&A)
  • CA / ICWA
  • 01 वर्षे अनुभव
8 उपव्यवस्थापक (F&A)
  • Inter CA / ICWA –  01 वर्ष अनुभव किंवा
  • MBA (Finance)/M.Com – 03 वर्षे अनुभव
9 उच्च श्रेणी लिपिक (F&A)
  • B.Com
  • निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण
  • MS-CIT
10 निम्न श्रेणी लिपिक (F&A)
  • B.Com
  • MS-CIT

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- MahaTransco Bharti 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 03.04.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील सर्व पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे असावे.
  • वरील पद क्र.01 व 02 पदासाठी उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षांपर्यंत असावे.
  • वरील पद क्र.03, 04, 08 व 10 या पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षांपर्यंत असावे.
  • वरील पद क्र.05, 06 व 07 या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षांपर्यंत असावे.
  • वरील पद क्र.09 या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय 57 वर्षांपर्यंत असावे.
  • EWS/मागासवर्गासाठी 05 वर्षे सुट.
  • माजी सैनिकांसाठी 03 वर्षे सुट.
  • महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचारी साठी कमाल वय 57 वर्षे.
  • दिव्यांग साठी कमाल वय 45 वर्षे.

परीक्षा शुल्क (फी)- MahaTransco Bharti 2025

पद क्र.01, 02, 03, 04 व 08 साठी-

  • अराखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु.  700/-
  • राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु. 350/-

पद क्र- 05 साठी –

  • सर्व प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु. 390/-

पद क्र- 06 व 07 साठी –

  • सर्व प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु. 350/-

पद क्र. 09 व 10 साठी-

  • अराखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु.  600/-
  • राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु. 300/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – MahaTransco Bharti 2025 Salary

अ.क्र. पदांचे नाव वेतनश्रेणी Approx. Monthly
1  कार्यकारी अभियंता (Civil) Rs. 97220-3745-115945- 4250-209445 Rs. 1,98,574/-
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) Rs. 81850-3250-98100- 3455-184475 Rs. 1,49,080/-
3 उपकार्यकारी अभियंता (Civil) Rs. 73580-2995-88555- 3250-166555 Rs. 1,34,297/-
4 सहाय्यक अभियंता (Civil) Rs. 58560-2580-71460- 2715-142050. Rs. 1,07,596/-
5 सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) Rs. 102890-4250-124140-4740- 228420. Rs. 2,08,610/-
6 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) Rs. 81695-3145-97420-3570- 175960. Rs.1,98,574/-
7 व्यवस्थापक (F&A) Rs. 75890-2995-90865-3250- 168865. Rs.1,38,530/-
8 उपव्यवस्थापक (F&A) Rs. 54505-2580-67405-2715- 137995 Rs.1,00,534/-
9 उच्च श्रेणी लिपिक (F&A) Rs. 36665-1265-42990-1385- 56840-1510-105160
10 निम्न श्रेणी लिपिक (F&A) Rs. 34555-845-38780-1140- 50180-1265-86865

निवड पध्दतीः MahaTransco Bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेस बोलविण्यात येईल.
  • ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलविण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहीलः-
अनु.क्र. विषय/उपविषय प्रश्न गुण परिक्षा कालावधी 
1  संबंधित त्या त्या विषयाचे ज्ञान (Professional Knowledge) 50 110 एकत्रित कालावधी 120 मिनीट

 

2 सामान्य अभियोग्यता (General Aptitude)

अ) तर्कशक्ती (Reasoning)

ब) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)

क) मराठी भाषा (Marathi Language)

 

40

20

20

 

20

10

10

एकूण 80 40
एकुण (1+2) 130 150
  • उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती / दंड (Penalty) असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकुण गुणांच्या १/४ (०.२५%) इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. तथापि, उमेदवाराने एखादया प्रश्नाचे उत्तर न दिल्यास / रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती /दंड (Penalty) लागणार नाही.
  • उमेदवाराने उपरोक्त पदांनुसार त्या त्या विषयाचे ज्ञान (Professional Knowledge), सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमुद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात / उप विषयात उमेदवारास शून्य अथवा शून्यापेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे अशा उमेदवारांनी जरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले असले तरी त्यांचा निवडीकरीता विचार करण्यात येणार नाही याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि. नियुक्तीपुर्वी उमेदवाराची विहित शारीरीक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात येईल. या शारीरिक चाचणी/वैद्यकीय तपासणीत उमेदवारास पात्र होणे आवश्यक राहिल. याबाबतचे निकष निवडीपुर्वी प्रशासनातर्फे स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येतील. त्यामुळे उमेदवाराने अशा विहित केलेल्या शारिरिक व वैद्यकिय चाचणी/तपासणीत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहिल व तसे न झाल्यास सदर उमेदवाराने जरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले असले तरी त्यांचा निवडीकरीता विचार करण्यात येणार नाही याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अंतिम गुणवत्ता माची/ निवडसुची तयार करतांना उमेदवारास ऑनलाईन परिक्षेत एकुण १५० गुणांपैकी मिळविलेल्या गुणांचे रुपांतरण १०० गुणांत करून अंतिम यादी/निवडसुची तयार करण्यात येईल. अंतिम निवड यादीत स्थान मिळविण्याकरीता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास १०० गुणांपैकी कमीत कमी ३० गुण आणि मागास प्रवर्गातील व समांतर आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारात १०० गुणांपैकी कमीत कमी २० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निवडयादी त्या मर्यादेत राखण्यात येईल.
  • दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान असतील तर सदर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून त्यांच्यातील जेष्ठताक्रम (वयाने जेष्ठ असणाऱ्यास प्राधान्य) ठरविण्यात येईल
  • सामान्यतः उपरोक्त नमुद केलेल्या निवड पद्धतीचे अनुसरण करण्यात येईल. तथापि, कोणत्या निवड पद्धतीचा अवलंब करायचा हे ठरविण्याचा अधिकार व निर्णय पुर्णपणे कंपनी प्रशासनाचा असेल.

निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेबाबतः MahaTransco Bharti 2025
  • उमेदवारास ज्या परिमंडला अंतर्गत पदस्थापना हवी आहे त्या परिमंडलाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करावी. उमेदवाराची पदस्थापना ही कंपनीच्या त्यावेळच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचे अधिकार कंपनीच्या प्रशासनास राहील. तसेच उमदेवाराने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडलात पदस्थापना देणे शक्य नसल्यास, अनुशेष व रिक्त पद ज्या परिमंडलात उपलब्ध आहे त्या परिमंडलात पदस्थापना देण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी. पदस्थापनेसंदर्भात उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाने दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
  • उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक राहिल.

परिक्षा केंद्र : MahaTransco Bharti 2025
  • ऑनलाईन परिक्षेकरीता निश्चित केलेली परिक्षा केंद्रे पुढील प्रमाणे असतील.- अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपुर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर.
  • उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने तीन परिक्षा केंद्रांची नावे ऑनलाईन अर्ज करतांना नमूद करावीत ज्यायोगे उमेदवारास त्यांनी नोंदविलेल्या परिक्षा केंद्रांच्या पर्यायानुसार तीन केंद्रांपैकी एक केंद्र परिक्षेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
  • तथापि, त्या तीनही केंद्रासाठी आवश्यक असलेल्या किमान उमेदवारांची नोंदणी न झाल्यास अथवा अन्य कोणत्याही प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे त्या केंद्रावर परीक्षा घेता येणार नसल्यास अथवा त्या उमेदवारास त्या परिक्षाकेंद्रावर देता येत नसल्यास सदर उमेदवारांना उपलब्धतेनुसार अन्य कोणत्याही परिक्षा केंद्रावर परिक्षेसाठी वर्ग करण्यात येईल, याबाबत कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतीम असेल व तसे अधिकार कंपनी राखून ठेवत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने निवड केलेल्या केंद्रांवर त्या केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांची नोंदणी झाल्यास या कारणामुळेही उमेदवारास अन्य उपलब्ध केंद्रावर वर्ग करण्यात येईल.
  • उमेदवारास परिक्षेसाठी कोणते केंद्र ठेवावे याबाबतचा तसेच कोणतेही केंद्र बदलण्याचा, वाढविण्याचा अथवा कमी करण्याचा कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना निवडलेले परिक्षा केंद्र अंतिम असेल. परिक्षाकेंद्र/परिक्षेचे स्थळ /तारिख/सत्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
  • परिक्षेसाठीच्या प्रवेश पत्रावर परिक्षा केंद्राचा संपुर्ण तपशील देण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परिक्षेस स्वतःच्या जोखीमेवर उपस्थित रहावे. महापारेषण कंपनी कोणत्याही प्रकारच्या दुखापतीस अथवा हानीस जबाबदार राहणार नाही.

ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्यासंबंधिच्या सूचनाः MahaTransco Bharti 2025
  • परिक्षेस उपस्थित राहण्यासाठी फक्त महापारेषण कंपनीने जारी केलेले वैध प्रवेश पत्र Call Letter च ग्राह्य धरले जाईल, ते सोबत आणावे.
  • प्रवेश पत्रावर देण्यात आलेल्या ठिकाणी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
  • तसेच खाली नमूद केल्यापैकी कोणतेही एक मुळ (Original) ओळखपत्र व एक फोटोकॉपी परिक्षेस सोबत येतांना न चुकता आणावी.
  • परिक्षेस उपस्थित राहण्यासाठी सध्याच्या वैध ओळखपत्राची मूळ मत (Original) आवश्यक राहील. रंगीत प्रत Colour Copy ग्राह्य धरली जाणार नाही. प्रवेश पत्र Call Letter वरिल नाव व सध्याच्या वैध ओळखपत्रावरिल नाव समान असणे आवश्यक आहे. परिक्षेस उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराकडे पॅन कार्ड (PAN Card) / पासपोर्ट (Passport) / वाहन परवाना (Driving License) / मतदार ओळखपत्र (Voter’s Card) / अलीकडचे छायाचित्र असलेले बँकेचे पासबूक (Bank Passbook with Photograph)/राजपत्रित अधिकाऱ्याने अधिकृत Letter Head वर जारी केलेले अलीकडचे छायाचित्र असलेले ओळखपत्र/लोकप्रतिनिर्धिनी अधिकृत Letter Head वर जारी केलेले अलीकडचे छायाचित्र असलेले ओळखपत्र/मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापिठाकडील अलीकडचे छायाचित्र असलेले ओळखपत्र (Valid recent Identity Card issued by a recognized College/University) / छायाचित्र असलेले आधार कार्ड (Aadhar Card with a Photograph) / कर्मचारी ओळखपत्र (Employee ID)/ अलीकडचे छायाचित्र असलेले बार कॉन्सीलचे ओळखपत्र (Bar Council Identity Card with Photograph) ओळखपत्र निरिक्षकांकडे पडताळणीसाठी सादर करावे.
  • रेशन कार्ड व शिकाऊ वाहन परवाना (Learner’s Driving License) हे वैध ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन परिक्षेसाठी विहीत केलेल्या वेळेनंतर कोणत्याही कारणास्तव उशिराने हजर होणाऱ्या उमेदवारास परिक्षेस बसू दिले जाणार नाही.
  • परिक्षा केंद्रावर भरती प्रक्रियेसंबंधीच्या विविध औपचारिकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्जदाराने Call Letter वर नमूद केलेल्या वेळेच्या आधीच परिक्षाकेंद्रावर हजर राहणे अपेक्षीत आहे.
  • परिक्षा केंद्राबर उशिराने उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी सुचनाः-प्रवेश पत्रावर (Call Letter वर) नमुद केलेल्या वेळेनंतर परिक्षा केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारास परिक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. प्रवेश पत्रावर (Call Letter वर) नमुद केलेली वेळ ही परिक्षा सुरु होण्याच्या वेळेपुर्वीची आहे. परिक्षेचा कालावधी हा फक्त दोन तासांचा असला तरी उमेदवारास परिक्षा केंद्रावर औपचारीकता पूर्ण करण्यासाठी जसे की, ओळखपत्रांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी व संकलन, लॉग इन करणे, उमेदवारांना परिक्षेसंबंधी सुचना देणे वगैरे बाबी पुर्ण करण्यासाठी सुमारे ४ तास परिक्षाकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक राहील.
  • पात्र दिव्यांग उमेदवारांना परिक्षेच्यावेळी लेखनिक व अतिरिक्त वेळेचा लाभ देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडून दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार लागू राहील.

ओळखपत्र तपासणीः- MahaTransco Bharti 2025
  • परिक्षा केंद्रांवर / परिक्षा सभागृहात उमेदवारांचे Call Letter व मूळ छायाचित्र ओळखपत्राची तपासणी करण्यात येईल. उमेदवाराच्या ओळखीबाबत शंका असल्यास उमेदवारास परिक्षेला बसू दिले जाणार नाही अथवा उमेदवार स्वतःची ओळख सिध्द करण्यास असमर्थ ठरल्यास अशा उमेदवारास परिक्षेस बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना- MahaTransco Bharti 2025
  • जाहिरातीत नमुद केलेल्या पदासाठी अर्ज करतेवेळी उमेदवाराने विहित शैक्षणिक अर्हता, वय, महाराष्ट्र अधिवास, जात, उन्नत-प्रगत गटात मोडत नसणे, महिला, खेळामधील प्राविण्य, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, शारिरिक बाधित/व्यंगत्वाचे प्रमाण वगैरे त्यास लागू असलेल्या बाबी धारण केलेल्या आहेत याची खात्री करुनच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अर्हता ही ‘किमान’ अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता धारण केली आहे हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरू शकणार नाही.
  • या जाहिरातीला अनुसरून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत सादर केलेलेच अर्ज विचारात घेतले जातील. अन्य पध्दतीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • उमेदवाराने महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, २००५ मधील तरतुदीप्रमाणे एक आवश्यक बाब म्हणून ‘लहान कुटुंब’ असल्याचे प्रतिज्ञापत्र भरुन देणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबत जाहिरातीत दिल्याप्रमाणे प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील :
  • निवड झालेल्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तथापि निवड झालेल्या ज्या उमेदवारांकडे जाहिरातीत नमूद मुद्दा क्र. १३.५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास अशा उमेदवारांस सेवेत रुजू झाल्याच्या तारखेपासून ३ वर्षाच्या आत विभागीय मराठी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहिल.
  • उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरिता स्वखर्चाने यावे लागेल. याकरीता कोणत्याही प्रकारच्या प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही.
  • भरती प्रक्रियेस विलंब होणे, परिक्षा पुर्णपणे रद्द होणे अथवा निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येणे याबाबतची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत परिक्षा वेळेवर पार पाडण्याचे/परिक्षा पुन्हा सुरु करण्याचे/निवड प्रक्रिया पुर्ण करण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येतील. तथापि आवश्यकता भासल्यास पुन्हा ऑनलाईन परिक्षा देखील घेतली जावू शकते. याबाबत कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • परीक्षा कक्षात मोबाईल दुरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन (Electronic Device) घेवून जाण्यास परवानगी नाही.
  • परीक्षेच्यावेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • महापारेषण कंपनीने जाहिरातीत तसेच विविध सुचनांद्वारे प्रसारीत केलेल्या सुचना, अटी, शर्ती मान्य नसलेल्या, कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारास ह्या प्रक्रियेतून आणि / अथवा भविष्यातील सर्व भरती प्रक्रियेसाठी प्रातिरोधीत (Debarred) करण्यात येईल.
  • गैरवर्तणूकीचे स्वरूप गंभीर असल्यास अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर अपात्र ठरविण्यात येईल शिवाय अशा उमेदवारांविरुध्द भारतीय दंडसंहिता आधारभूत कठोर कारवाई देखील केली जावू शकते याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • विहित वयोमर्यादेतील व पात्र अशा शासकीय / निमशासकीय सेवेतील / शासकीय उपक्रमातील कर्मचा-यांची निवड झाल्यास त्यांच्या पूर्वीच्या संस्थे मधून / कंपनीच्या सेवेमधून कार्यमुक्त केल्याचे प्रमाणपत्र रुजू होते वेळी सादर करणे आवश्यक राहील. मात्र त्यांच्या पूर्वीच्या संस्थेतील / कंपनीतील सेवेची व देयकांची (Service Bond / Training Bond, etc.) कोणतीही जबाबदारी घेण्यात येणार नाही.
  • उमेदवाराने जाणीवपूर्वक अथवा हेतूपुरस्सर चूकीची / खोटी माहिती अथवा कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर केल्यास अथवा माहिती दडविली आहे असे आढळल्यास उमेदवारास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अथवा नियुक्ती नंतरही अपात्र ठरविण्यात येईल अथवा त्यांचे पूर्वचारित्र्यात गैर असल्याचे आढळून आल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल आणि नियुक्ती दिली असल्यास कोणत्याही नोटीसीशिवाय किंवा कोणतेही कारण न देता त्यास बडतर्फ करण्याचा अधिकार कंपनी प्रशासनास राहील.
  • महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्याने भरती प्रक्रियेसाठी खोटी माहिती / खोटी कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर केली आहे असे कुठल्याही टप्प्यावर आढळल्यास त्यांस भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरविण्यात येईल. अशा उमेदवारांवर कंपनीच्या नियमाप्रमाणे उचित शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
  • भरती प्रक्रियेत उमेदवाराने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याचा अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  • निवड झालेल्या विभागीय उमेदवारास (महापारेषण कंपनीच्या कर्मचा-यास) नियुक्ती आदेश हा विचाराधीन / सुरु असलेल्या शिस्तभंग विषयक कारवाईचा अहवाल विचारात घेऊन तसेच दक्षता चौकशी व इतर सेवाविषयक नोंदी विचारात घेऊन जारी करण्यात येईल. सदर प्रकरणी कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतिम राहिल. त्याबाबत कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक पातळीवर पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
  • निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीची विधी ग्राह्यता (Validity) निकाल जाहिर केल्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत राहील. त्यानंतर ही निवड सूची कंपनीच्या नियमाप्रमाणे व्यपगत होईल.
  • जाहिरातीत किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः किंवा संपूर्ण बदल करण्याचे तसेच, जाहिरात अंशतः किंवा पुर्णपणे रद्द करण्याचे अधिकार कंपनी प्रशासन राखुन ठेवित आहे. याबाबतचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविणे कंपनीस बंधनकारक नसेल.
  • जाहिरातीतील पदांच्या भरती प्रक्रियेबाबतचा कंपनीचा निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळीवर कोणाशीही केला जाणार नाही.
  • भरती प्रक्रिये संबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावरील “करियर” (Career) ह्या सदराखाली प्रसिध्द करण्यात येईल. संबंधीत उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे.

MahaTransco Bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02.05.2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment