सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… सहसंचालक लेखा व कोषागारे, कोंकण विभाग (Mahakos Konkan Vibhag) (Mahakosh Konkan Vibhag bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!
सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोंकण विभाग मध्ये (Mahakosh Konkan Vibhag) Mahakosh Konkan Vibhag bharti 2025 (Mahakosh Konkan Vibhag Recruitment 2025) Mahakosh Konkan Vibhag Career 2025 (Mahakosh Konkan Vibhag Job 2025) (Mahakosh Konkan Vibhag Vacancy 2025) (DAT Konkan Vibhag Job 2025) (DAT Konkan Vibhag Bharti 2025) (DAT Konkan Vibhag Recruitment 2025) कनिष्ट लेखापाल (Juniour Accountant) या पदाच्या एकुण 179 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून लेखा व कोषागारे च्या www.mahakosh.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 04 फेब्रुवारी, 2025 पासून ते 06 मार्च, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 06 मार्च, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

📌 महत्वाचे दिनांक 📌 - Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 04.02.2025 ते 06.03.2025
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 06.03.2025
- 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी & सिंधुदुर्ग (मुंबई विभाग)
एकूण – 179 पदे- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | कनिष्ट लेखापाल / (Junior Accountant) | 179 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 06.03.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अ.क्र. | पदांचे नांव |
शैक्षणिक अर्हता |
1 | कनिष्ट लेखापाल / (Junior Accountant) |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗
|
|
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
📑 अभ्यासक्रम – मराठी 📑 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 06.03.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- अराखीव उमेदवारांसाठी वय किमान 19 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे असावे.
- दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे
- खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
- प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43/45 वर्षे.
परीक्षा शुल्क (फी)- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- खुला प्रवर्ग- रु.1000/-
- मागास प्रवर्ग- रु.900/-
- माजी सैनिकांना परीक्षा शुक्ल (फि) आकारली जाणार नाही.
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – Mahakosh Konkan Vibhag bharti 2025 Salary
अ.क्र. | पदांचे नाव | वेतनश्रेणी |
1 | कनिष्ट लेखापाल /(Junior Accountant) | S-10: 29200-92300 |
Junior Accountant Exam Pattern 2025

परीक्षेचे स्वरुप व दर्जा- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- परीक्षा कालावधी 2 तास (120 मिनिटे) असेल.
- परीक्षा सुरु होण्याच्या विहित वेळनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेची वेळ जरी दोन तास (120 मिनिटे) असली तरी उमेदवारास ओळख पटविणे, आवश्यक कागदपत्रे तपासणे, सूचना देणे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी उमेदवारास परीक्षा सुरु होण्यापूवी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागेल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी एकूण 200 गुणाची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल.
- प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्याया वस्तुनिष्ठ स्वरुपाचे असतील. मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून व इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. सामान्यज्ञान व अंकणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून घेण्यात येईल.
- संकेतस्थळावरुन प्राप्त प्रवेशपत्राची पीडीएफ प्रत (हॉल तिकीट) निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवाराकडून प्रवेशपत्र हरविल्यास गहाळ झाल्यास पुन्हा देण्यात येणार नाही. तसेच, परीक्षा झाल्यावर पीडीएफ कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.
- उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाही. ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेत समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांबाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ, दिनांक 04.05.2022 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीन्वये कार्यवाही करण्यात येईल.
- उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही समस्या आकस्मिकपणे उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा समस्यांमुळे परीक्षा घेण्याबावत किया निकाल घोषित करण्याबाबत काही अडचण उद्भवल्यास अशा अडवणी तात्काळ सोडवण्याची सर्वतोपरी प्रयत्न केले जातील व आवश्यकता भासल्यास नव्याने परीक्षा येण्यात येईल. या संदर्भात अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती तथा सासंचालक, लेखा य कोषागारे, पुणे विभाग, पुर्ण यांचा निर्णय अंतिम राहील, अशा प्रकारचा बदल न स्विकारणाचा उमेदवारांस त्याची उमेदवारी गमवावी लागेल
- ही परीक्षा Computer Based Test पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येवून त्यांचे समानीकरण करण्याचे (Normalization) पद्धतीने गुणांकन निश्चित करून निकाल जाहिर करण्यात येईल. सदर Normalization सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
प्रवेशपत्र:-Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र विभागाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या प्रोफाईलव्दारे परीक्षेपूर्वी 7 दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल, परोक्षेपूर्वी प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन मुद्रित करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सदर मुद्रित प्रवेशपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर त्याबाबत उमेदवाराला त्याच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाव्दारे (SMS व्दारे) कळविण्यात येईल, याबाबतची घोषणा (www.mahakosh.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर परीक्षेपूची 7 दिवस अगोदर प्रसिध्द करण्यात येईल.
- परीक्षेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे कार्यालयाकडे संपर्क साधावा.
- परीक्षेच्या वेळी उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र, तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राकडे असलेल्या उपस्थिती पत्रकातील नोंदीबरोबर व त्याने वरीलप्रमाणे सादर केलेले पुरावे याची पडताळणी करुन उमेदवाराची ओळख पटविली जाईल. जर उमेदवाराची ओळख पटवण्याचाबत शंका उपस्थित झाल्यास किंवा ओळख शंकास्पद असल्यास त्याला परीक्षेसाठी उपस्थित राहू दिले जाणार नाही, सदर उमेदवाराचे मूळ प्रवेशपत्र व ओळखपत्राची एक छायांकित प्रत परीक्षा कक्षामध्ये जमा करणे आवश्यक राहील.
- विवाहित स्त्री उमेदवाराच्या नावामध्ये बदल झाला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, नावात बदल झाल्याबाबत संबंधित राजपत्राची प्रत (छायांकित प्रतीसह) परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्वाच्या सूचना – Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापुर्वी सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भांतील सविस्तर जाहिरात www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अभ्यासावी.
- उमेदवारास ऑनलाईन अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर जावुन हेल्पलाईनवर संपर्क साधावा
- अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किवा खाडाखोड केलेलं वा बनावट दाखले सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेचेवेळी नक्कल (copy) करणे, वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडींना अपात्र ठरविणे इत्यादीपैकी प्रकरणपरत्वे योग्य त्या शिक्षा करणेचा तसेच प्रचलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करणेचे अधिकार अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांना राहतील. तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणुक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. तसंच निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल.
- वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/माध्यमिक (एस.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र/वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र प्राह्य धरणेत येईल.
- शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.
- गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची (Grade) यादी सादर करावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
A.प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल अद्ययावत करणे.
B.अर्ज सादरीकरण.
C.परीक्षा शुल्क भरणा.
A. प्रोफाईल निमिती/ प्रोफाईल अद्यावत करणे- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वापरकत्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरीता “नवीन वापरकत्यांची नोंदणी” (“Click here for New Registration”) वर क्लिक केल्यानंतर यंत्रणा लॉग-इन पृष्ठ प्रदर्शित करेल. नवीन खाते (वापरकत्यांचे नाव Login व Password) निर्माण करण्यासाठी लॉग-इन पृष्ठाद्वारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
- प्रोफाईलद्वारे माहिती भरताना उमेदवाराने स्वतःचाच वैध ई-मेल आयडी, वैध भ्रमणध्वनी क्रमांक व जन्म दिनांक नोंदविणे आवश्यक आहे.
- उमेदवारांकडे नित्य वापरात असेल असा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच भरतीप्रक्रियेदरम्यान पत्रव्यवहार, प्रवेशपत्र आणि इतर माहिती ई-मेल व भ्रमणध्वनीद्वारे देण्यात येणार असल्याकारणामुळे भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये नोंदणीकृत सदर ई-मेल आयडी य भ्रमणध्वनी क्रमांक वैध कार्यरत राहणे आवश्यक आहे.
- वरीलप्रमाणे प्रोफाईलची निर्मिती झाल्यानंतर वापरकर्त्याने स्वतःच्या Login व Password द्वारे प्रवेश करून प्रोफाईलमध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदभांतील तपशीलाचो अचूक नोंद करावी.
परीक्षा केंद्र – Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- सदर परीक्षा संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल, याकरिता उमेदवारांना तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे आवश्यक आहे. उमेदवारांन निवडलेल्या तीनही परीक्षा केंद्रांची क्षमता संपुष्टात आल्यास इतर उपलब्ध कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल व याबाबतचे स्थळ प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) नमूद करण्यात येईल.
- परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ व सत्र इत्यांदीबावत बदलाची विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपल्या जबाबदारीवर व स्वखर्चाने परोक्षा केंद्रावर उपस्थित रहावयाचे आहे या संबंधात कोणत्याही प्रकारच्या हानी / नुकसानीस सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे जबावदार राहणार नाही.
छायाचित्र / फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- छायाचित्रः एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचे छायाचित्र व्यवस्थित चिकटवावे, छायाचित्रावर स्वाक्षरी करू नये अथवा ते साक्षांकित करू नये, तसेच छायाचित्र स्टेपल अथवा पिनिंग करू नये, फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करावा.
- स्वाक्षरी: विहित आकार/ क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या वॉलपेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- छायाचित्र व स्वाक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी, छायाचित्र व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करु नये.
छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड (Upload of Photos Signature) करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे – Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- छायाचित्राचा आकार (रुंदी 3.5cm x उंची 4.5 cm)
- छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून आधी काढलेले नसावे आणि ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराच्या रुपाशी जुळणारे असावे, छायाचित्र रंगीत (कलर फोटो) व पासपोर्ट आकाराचे असणे आवश्यक आहे. हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढऱ्या, पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतलेले असावे. टोपी आणि गडद चष्मा ग्राहय नाहीत.
- छायाचित्राचे परिमाण 140 x 180 पिक्सेल असावे.
- छायाचित्राचा आकार 10 kb ते 200 kb दरम्यान असावा. स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 200 kb पेक्षा जास्त नसावा.
- अर्जदाराने काळ्या शाईच्या बॉलपेनने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी.
- परिमाण 140 x 180 पिक्सेल असावे.
- फाईलचा आकार 80 kb ते 200 kb दरम्यान असावा. स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 200 kb पेक्षा जास्त नसावा.
- ऑनलाईन अर्जामध्ये छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी प्रतिमा स्पष्ट आहेत आणि योग्यरित्या अपलोड केल्या आहेत हे तपासावे, छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कैनिग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या विनिदेशांनुसार उमेदवाराने छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
- स्कॅन करून अपलोड केलेली स्वाक्षरी, प्रवेशपत्र/ उपस्थिती व तत्सम कारणासाठी वापरण्यात येईल. परीक्षेच्या वेळी, प्रत्यक्ष कागदपत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अर्ज भरताना केलेली स्वाक्षरी व छायाचित्र न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
B. अर्ज सादरीकरण – Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- उमेदवारांनी अर्ज करणेसाठी www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी.
- उमेदवाराचे अर्जामध्ये नमूद कलेले त्याचे/तिचे, त्याच्या किंवा तिच्या वडीलाचे नाव व त्याचे किंवा तिचे आडनाव आणि पुराव्यादाखल जोडण्यात आलेले प्रमाणपत्रे गुणपत्रिका / ओळख यामध्ये तफावत दिसून आल्यास सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
C. परीक्षा शुल्काचा भरणा – Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बैंकिगव्दारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
- अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनो विहित मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- परीक्षा शुल्काचा भरणा करतांना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश विभागाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या पृष्टावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेत स्थळावरील संबंधित पृष्ठावरुन आणि अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.
- परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरण यशस्वी झाला आहे किंवा कसे याची स्थिती (Status) लगेचच अवगत होईल, खात्यातून (Logout) होण्याची परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याचाकत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याचावत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.
- परीक्षा शुल्काचा भरणा अयशस्वी ठरल्यास ऑनलाईन पद्धतीने पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहीत दिनांकापूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील कोणत्याही तक्रारीची विभागाकडून दखल घेतली जाणार नाही व परीक्षा शुल्क भरणा करु न शकलेल्या उमेदवाराचा संबंधित भरती प्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही.
- ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाइन अर्जाची घ्यावी.
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) या अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा नावाच्या पत्त्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी.
- एस.एस.सी.अथवा तत्सम प्रमाणपत्रांवरोल नावाप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्याबाबतच्या पुराव्यासाठी राजपत्र (Gazette) किंवा अन्य परिपोषक कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी.
- पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता लिहावा व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्रव्यबहारासाठी देवू नये.
- अर्जामध्ये केलेला दावा व कागदपत्रे तपासणीचे वेळी सादर केलेल्या सारांश पत्रातील अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील दावा यामध्ये तफावत आढळून आल्यास अर्जामधील माहितीच्या पृष्ठ्यर्थ कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास / न मिळाल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा अजांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता निर्धारित करुन त्याआधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
- उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
- उमेदवाराने अर्जावर केलेली स्वाक्षरी आणि त्याच्या प्रवेशपत्रावर उपस्थिती पत्रावरील स्वाक्षरी एकच असावी. तसेच, उमेदवाराने ऑनलाईन अर्जावर अपलोड केलेले छायाचित्र वरीलप्रमाणे सर्व ठिकाणी एकच असावे.
- प्राप्त अर्जाच्या प्राथमिक छाननीच्या आधारे उमेदवाराला परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार गुणवत्तेनुसार पात्र झाला तरी विहित शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व विहित कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय तो निवडीसाठी पात्र राहणार नाही. केवळ परोक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास निवडीचा हक्क प्राप्त होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी पात्रताविषयक अटी अभ्यासूनच अर्ज करावा.
- भरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती व वेळोवेळी www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमाद्वारे भरती प्रक्रियेची माहिती उपलव्ध होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाय, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू अनुभव पात्रता इत्यादीसंदर्भात अर्जामधे स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज अंतिमरित्या सादर केलेनंतर त्यापली कोणताही बदल करता येणार नाही.
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र/ सेवायोजन कार्यालय/ समाज कल्याण/ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/ जिल्हा सैनिक बोर्ड/ अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे. अशा उमेदवाराना ऑनलाईन सुध्दा सदर पदावर निवडीसाठी इच्छुक असल्यास उपरोक्त संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे
कागदपत्रे पडताळणीवेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे :- Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- सदर परिक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवडयादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्यात येईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांना लागू असणारी खालील नमूद कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहिल.
अ.क्र. | कागदपत्रे / प्रमाणपत्रे |
1 | परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत. |
2 | परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत. |
3 | परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत. |
4 | एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. |
5 | वयाचा पुरावा. |
6 | जन्माचा पुरावा. |
7 | शैक्षणक अर्हता इत्यादीचा पुरावा. |
8 | टंकलेखन प्रमाणपत्र. |
9 | MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र. |
10 | राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. |
11 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा. |
12 | नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. |
13 | माजी सैनिक/ दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. |
14 | खेळाडू अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर यापैकी आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा. |
15 | विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. |
16 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. |
17 | महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला. |
18 | मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. |
19 | लहान कुटंबाचे प्रमाणपत्र. |
20 | आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य असल्याचा पुरावा. |
21 | अ) स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचा पुरावा.
ब) 1991 चे जनगणना कर्मचारी असल्याचा पुरावा. क) 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी असल्याचा पुरावा. |
Mahakosh Konkan Vibhag bharti 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 06.03.2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.