नोकरीची सुवर्णसंधी…महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (Mahagenco) Mahagenco Vacancy 2024 (Mahagenco recruitment 2024) मध्ये पदभरती…जाणून घ्या संपुर्ण माहिती…
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (Mahagenco Recruitment 2024) (Mahagenco) (Mahanirmiti) Mahagenco jobs 2024 (Mahagenco Vacancy 2024) (Mahagenco Technician bharti 2024) (Mahagenco Career 2024) (MSEB Bharti 2024) मध्ये तंत्रज्ञ-3 (Technician-3) संवर्गाच्या रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून Mahagenco च्या https://www.mahagenco.in/ या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 26 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 26 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 26 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 - (Mahagenco recruitment)
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 26.11.2024 ते 26.12.2024
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 26.12.2024
- 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- संकेतस्थळावर स्वतंत्र्यरीत्या प्रसिध्द करण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्रात
तंत्रज्ञ – 3 साठी एकूण –800 पदे Mahagenco recruitment
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | सामान्य | 400 |
2 | प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी (05 ते अधिक वर्षे प्रशिक्षण) | 160 |
3 | प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी (01 ते 04 वर्षे प्रशिक्षण) | 160 |
4 | बी. टि. आय. आर | 80 |
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Qualification for Mahagenco recruitment
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात शेवटच्या दिनांक 01.11.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | सामान्य |
|
2 | प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी (05 ते अधिक वर्षे प्रशिक्षण) | |
3 | प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी (01 ते 04 वर्षे प्रशिक्षण) | |
4 | बी. टि. आय. आर |
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗Important link🔗 |
|
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Mahagenco recruitment age limit
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.10.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- वरील पदासाठी उमेदवारांचे किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय असावे.
- मागासवर्गीयांसाठी व आ.दु.अ. प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत 05 वर्षे सुट
- माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
- प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच भुकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
- महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षे राहील.
परीक्षा शुल्क (फी)- Mahagenco recruitment 2024 Application Fee –
- खुलाप्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 500/-
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 300/-
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
वेतनश्रेणी (सैलरी) – Mahagenco recruitment 2024 Salary
Grade | Pay Scale (Rs.) |
तंत्रज्ञ – 3
(Technician-3) |
रु. 34555-845-38780-1140-50180-1265-86865 |
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
अर्ज करण्याची पध्दत: mahavitaran recruitment 2024 apply online
- उमेदवारांची http://www.mahagenco.in या संकेत स्थळावर अर्ज ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
- “करिअर” अंतर्गत अधिसूचना निवडा आणि “ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि प्रविष्ट करा
- नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी टाकून एक तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि
- सिस्टमद्वारे पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित होईल. उमेदवार
- तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा. एक ईमेल आणि
- तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा एसएमएस देखील पाठविला जाईल.
- उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसल्यास, तो/ती “सेव्ह आणि नेक्स्ट” टॅब निवडून आधीच प्रविष्ट केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी उमेदवारांना “जतन करा आणि” वापरण्याचा सल्ला दिला जातो. अंतिम सबमिशन करण्याआधी तपशिलांची पडताळणी करा
- उमेदवारांनी ऑनलाइन भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि पडताळावेत असा सल्ला दिला जातो. क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही म्हणून स्वतः अर्ज करा.
- उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इत्यादींचे स्पेलिंग बरोबर असावे
- तुमचे तपशील सत्यापित करा आणि ‘तुमचे तपशील प्रमाणित करा’ वर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा. आणि ‘सेव्ह अँड नेक्स्ट’ बटण निवडा.
- उमेदवार दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
- छायाचित्र आणि स्वाक्षरीचे स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा.
- उमेदवार अर्जाचा इतर तपशील भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
- आधी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा
- नोंदणी पूर्ण करा.
- आवश्यक असल्यास तपशील सुधारित करा आणि त्यानंतरच ‘पूर्ण नोंदणी’ वर क्लिक करा
- छायाचित्र, स्वाक्षरी अपलोड केलेले आणि इतर तपशील सत्यापित करणे आणि याची खात्री करणे
- तुम्ही भरलेले बरोबर आहे.
- ‘पेमेंट’ टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा.
- ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- अर्जाची प्रिंट काढुन जतन करा.
निवड पध्दत्ती : Mahagenco recruitment 2024
- ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
- तंत्रज्ञ-३ या पदाकरीता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा मराठी व इंग्रजी या भाषेत घेण्यात येईल.
- किमान गुणांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर सदरील उमेदवारांची गुणानुक्रमे सामाजिक व समांतर आरक्षणाची निवड यादी तयार करण्यात येईल.
- वरील पदांकरीता मागास प्रवर्गातून अंतिम निवडीकरीता एकूण गुणांपैकी किमान २०% गुण व खुल्या प्रवर्गातून अंतिम निवडीकरीता एकूण गुणांपैकी किमान ३0% गुण मिळविणे आवश्यक आहे. हा निकष विचारात घेऊन पद भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
- उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सूची यादी तयार करण्यात येईल. सदरची निवडसूची कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल
- दस्तऐवज सादर करण्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तऐवज सादर न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : Mahagenco recruitment 2024
- उमेदवार हा भारतीय नागरीक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सामान्य (महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार) अथवा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी (महानिर्मिती कंपनीचे किमान ०५ वर्षे किंवा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले / महानिर्मिती कंपनीचे 01 ते 04 वर्षे कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त महानिर्मिती कंपनी बी.टी. आर. आय. अंतर्गत आय. टी. आय. अभ्यासक्रम पूर्ण केलेले) या आरक्षणातून त्यांना लागू असलेला पर्यायच निवडावा व त्याबाबत खातरजमा करावी.
- ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा अंतिम निवड यादी प्रसिध्द करताना / केल्यानंतर उमेदवाराकडून वरील पर्याय निवडताना त्रुटी आढळून आल्यास, सदरील उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी,
- वरील कोट्यातून अर्ज सादर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन अर्जात नमूद नोंदणी क्रमांक व त्यासोबत इतर कागदपत्रेही संबंधित विद्युत केंद्र कार्यालय येथे दि.०१.१०.२०२४ रोजी पर्यंत सादर करणे बंधनकारक असेल, अशा उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्रे पडताळमीनंतरच/ खातरजमा केल्यानंतरच त्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतील.
- प्रगत कुशल प्रशिक्षण (PAP Training), बी.टी.आर.आय. व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण (Apprentice) या वेगवेगळ्या संकल्पना असून उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा.
- उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जातील, अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी स्वतःचा ई-मेल आय-डी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा, उमेदवारांनी त्यांचा ई-मेल आयडी व मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरात ठेवणे, ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी आहे. उमेदवाराचा ईमेल-आयडी व मोबाईल नंबर बंद झाल्यास अथवा बदलला गेल्यास उमेदवारास मेल अथवा संदेश प्राप्त न झाल्यास महानिर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- एका उमदेवाराने एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास अर्ज संगणकाद्वारे स्विकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज परिपूर्ण भरण्याची दक्षता घ्यावी, ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा, अचूक अर्ज भरण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहील.
- उमेदवाराने अर्जात अचुक माहिती भरणे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. एकदा भरलेली माहिती उदा. जात, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, शिकाऊ उमेदवारी, प्रगत कुशल प्रशिक्षण, माजी सैनिक, दिव्यांग इत्यादी बावतीत भविष्यात कोणताही बदलासंबंधित अर्ज स्विकारला जाणार नाही किंवा तसा कोणताही बदल केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज स्विकृत करण्यापूर्वी उमेदवार त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये बदल करु शकतात. परंतु एकदा अर्ज स्विकृत (Submit) करण्यात आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल उमेदवारास करता येणार नाही व शेवटी भरलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल.
- अर्जाची प्रत स्वतःजवळ तयार ठेवावी व अंतिम निवडीपूर्व अर्ज व कागदपत्रे तपासणीसाठी मागितली जातील त्यावेळी सदर कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.ऑनलाईन अर्जाची प्रत हरविल्यास, गहाळ झाल्यास त्यास महानिर्मिती कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
- शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रम तसेच महानिर्मिती कंपनीच्या सेवेतील कर्मचाऱ्याने वर नमूद केलेल्या पदांकरिता अर्ज केला असेल, तर सदर कर्मचाऱ्याला सक्षम अधिकाऱ्यामार्फत निर्गमित / वितरीत केलेले खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) अंतिम निवडपूर्व कागदपत्रे जमा करतेवेळी सादर करणे आवश्यक राहील.
- वरील पदासाठी असणारी किमान शैक्षणिक अर्हता आणि पात्रता धारण करणाऱ्या व ऑनलाईन परिक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेची रुपरेषा, वेळापत्रक, परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबावतचे स्वतःच्या नावे असलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर, 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.