Join Whatsapp Group

Join Telegram Group

Latur Mahavitaran Recruitment 2025 लातूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये पदभरती..आजच अर्ज करा…येथे बघा संपूर्ण माहिती..!!

आयटीआय साठी नोकरीची सुवर्णसंधी… लातूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran) (Latur Mahavitaran Recruitment 2025) मध्ये पदभरती.. आजच अर्ज करा…!! येथे बघा संपूर्ण माहिती..!!

लातूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये Latur Mahavitaran Recruitment 2025 (Mahavitaran) Latur Mahavitaran Career 2025 (Latur Mahavitaran Job 2025) (Latur Mahavitaran Vacancy 2025) (Mahavitaran Apprenticeship Job 2025) (Latur Mahavitaran Bharti 2025)  (Mahavitaran Apprenticeship Recruitment 2025) ट्रेड अप्रेंटिस या पदाच्या एकुण 132 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून भारत सरकारच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 20 मे, 2025 पासून ते दिनांक 02 जून, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 02 जून, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा. .

Latur Mahavitaran Recruitment 2025
Latur Mahavitaran Recruitment 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - Latur Mahavitaran Recruitment 2025 
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 20.05.2025 ते 02.06.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 02.06.2025
  • 📍नोकरी ठिकाण – लातूर, निलंगा, उदगीर अंतर्गत उपकेंद्रे

एकूण – 132 पदे Latur Mahavitaran Recruitment 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 वायरमन (तारतंत्री) 66
2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 66

शैक्षणिक अर्हता व अनुभव- Latur Mahavitaran Recruitment 2025

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांकापर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा आणि महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
  • 10 वी पास
  • मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र. (ITI-NCVT)
2 वायरमन (तारतंत्री)
  • 10 वी पास
  • मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वायरमन ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र. (ITI-NCVT)

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Latur Mahavitaran Recruitment 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक जाहिरतीत नमूद दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील पदासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सुट.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक आस्थापना नोंदणी क्रमांक – Latur Mahavitaran Recruitment 2025

अ.क्र. कार्यालयाचे नाव आस्थापना नोंदणी (रजिस्टेशन) क्रमांक
1 लातूर विभाग E12192700110
2 उदगीर विभाग E01172700737
3 निलंगा विभाग E01172700753

वेतनश्रेणी (सैलरी) – Latur Mahavitaran Recruitment 2025 Salary

अ.क्र. पदांचे नांव Stipend Monthly
1 वायरमन (तारतंत्री) Rs.7700/- (प्रचलित नियमानुसार)
2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

अर्ज सादर करतांना आवश्यक कागदपत्रे- Latur Mahavitaran Recruitment 2025

  1. एस.एस.सी व ITI विजतंत्री (Electrician) चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची प्रत
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. आधार कार्ड
  4. मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र
  5. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  6. प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र-नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  7. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याचे प्रमाणपत्र
  8. इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळपत्र.

भरती प्रकियेचा पुर्ण पत्ता- 
अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय लातूर, 
साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर– 413 512

अर्ज कसा सादर करावा- Latur Mahavitaran Recruitment 2025 apply online Apprenticeship form
  • उमेदवारांनी NAPS अप्रेंटिसशिप पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in/  वर स्वतःची नोंदणी करावी. उमेदवारांनी त्यांच्या आधार क्रमांकासह सर्व डेटा योग्यरित्या भरावा. नोंदणी करताना उमेदवारांनी खालील मूळच्या स्कॅन केलेल्या प्रती देखील शिकाऊ पोर्टलवर अपलोड कराव्यात.
  • * मध्ये चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.
  • पोर्टल वरच्या टूलबारवरील “नोंदणी” बटणावर क्लिक करा आणि “उमेदवार” हा पर्याय निवडा.
  • एक लहान नोंदणी फॉर्म उघडेल. त्यातील माहिती तुम्हाला भरणे आवश्यक आहे. तुमचे मूलभूत, कुटुंब आणि संपर्क तपशील आणि नंतर “सुरू ठेवा” क्लिक करा.
  • महत्वाची टीप: कृपया एक वैध ईमेल आयडी प्रविष्ट करा कारण activation link (सक्रियकरण दुवा) मेलद्वारे पाठविला जाईल. तो ईमेल आयडी तसेच पासवर्ड लक्षात ठेवा आणि तुम्ही तो अप्रेंटिसशिप पोर्टलच्या  तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी वापराल.
  • त्यानंतर नोंदणी क्रमांकासह डायलॉग बॉक्स तुमचे खाते तयार केल्यावर सूचित करेल, नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर तुम्हाला activation link सक्रियकरण ईमेल प्राप्त होईल. तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर ‘सक्रिय करा’ बटणावर क्लिक करा.
  • एकदा तुम्ही active सक्रिय करा बटणावर क्लिक केल्यानंतर, स्क्रीन आपोआप तुम्हाला लॉग-इन पृष्ठ  वर पुनर्निर्देशित करेल, जिथे तुम्ही तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी/नोंदणी क्रमांक टाइप कराल आणि पासवर्ड (ईमेल आयडी आणि पासवर्ड सारखाच आहे, जो तुम्ही नोंदणी करते दरम्यान नमूद केला होता) लॉगिन करण्यासाठी.
  • एकदा लॉग इन केल्यावर, तुम्हाला ‘Complete Your Profile’ बटणावर क्लिक करावे लागेल. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही अप्रेंटिसशिप संधीसाठी अर्ज करू शकणार नाही.
  • तुमचे “माझ्याबद्दल” आणि संपर्क जोडण्यासाठी ‘संपादित करा’ बटणावर क्लिक करून प्रारंभ करा. ‘एडिट’ बटणावर क्लिक केल्यावर खालील स्क्रीन दिसेल. ‘*’ मध्ये चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.
  • नंतर Apply to Opportunities हे पाहण्यासाठी तुम्ही शीर्ष टूलबारवरील “प्रशिक्षण संधी” हा पर्याय वापरू शकता. तुमच्या संधीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त निवड केलेल्यावर Apply बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर कंपन्या तुमचे प्रोफाईल पाहू शकतात आणि तुम्हाला ॲप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्यांनी पोस्ट केलेली संधी. तुम्ही डाव्या मेनूवर ‘आमंत्रणे’ पर्यायावर क्लिक करून ते पाहू शकता.
  • तुम्ही View’ बटणावर क्लिक करून संधीचे तपशील पाहू शकता संधी तुम्हाला स्वारस्य असल्यास, संधीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही Apply बटणावर क्लिक करू शकता
  • Apply वर क्लिक केल्यावर, तुम्हाला स्थान निवडण्याचा पर्याय दिला जाईल (ज्या प्रकरणांमध्ये कंपनीने अनेक ठिकाणी संधी दिली आहे). खालील एक बॉक्स दिसेल आणि तुम्ही तुमच्या पसंतीनुसार स्थान निवडू शकता.
  • तुम्ही तुमचे सर्व अर्ज ‘ Applications’ डावा मेनू टॅबवर पाहू शकता
  • नंतरचे पृष्ठ तुम्हाला तुमच्या सर्व Applications चा सारांश दर्शवेल.एका संधीनंतर कंपनी तुमच्या प्रोफाइलचे पुनरावलोकन करेल आणि तुम्हाला कॉल करण्यासाठी आमंत्रित करेल.मुलाखत कंपनीने तुमची निवड केल्यास, ते ‘ Contract ‘ जारी करतील आणि तुम्ही ते करू शकाल हे वरील ‘स्थिती’ स्तंभात पहा.
  • नंतर पुढे तुम्हाला करार पहा आणि स्वीकारा असा टॅब समोर दिसेल त्यात कंपनी तुम्हाला ऑफर देऊ इच्छित असल्यास, ते तुम्हाला करार पाठवतील. करारांची यादी पाहण्यासाठी डाव्या मेनूमधील ‘Contract’ पर्यायावर क्लिक करा.
  • कराराचा तपशील पाहण्यासाठी, ‘View’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही संधीचे सर्व तपशील – स्टायपेंड तपशील, कामाचे दिवस, स्थान पाहण्यास सक्षम असाल आणि तुमच्या माहितीनुसार सर्व तपशील बरोबर असल्यास, तुम्ही स्वीकार करू शकता. ‘साइन’ पर्याय निवडून करार करा. कोणत्याही कारणास्तव, आपण संधी स्वीकारण्याची योजना नाकारु शकता त्यासाठी, तुम्ही ‘reject’  पर्याय निवडू शकता आणि करार संपुष्ट होईल.

उमेदवारांसाठी सर्व साधारण सुचना- Latur Mahavitaran Recruitment 2025

  • ऑनलाईन अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्डवर नमुद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करुन माहीती भरावी.
  • विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहील.
  • पदसंख्या कमी किंवा जास्त करण्याचा व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापने कडे राखीव असतील व सदरचे निर्णय उमेदवारास कळविणे व्यवस्थापनास बंधनकारक राहणार नाही. भरती प्रक्रियेचे ठिकाण – अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, लातूर
  • शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी आरक्षण शासनाच्या विविध नियमांनुसार लागू राहील.एस.एस.सी. गुणपत्र / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र प्रमाणपत्र (चारही रोमिस्टरची) साक्षांकित प्रत व शाळा सोडल्याचा दाखला ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
  • शिकाऊ उमेदवाराची सही, पालकाची सही, प्रवर्ग, जन्म तारीख, एस.एस.सी मार्क, आयटीआय मार्क ही माहिती अचुक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवारांच्या शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • सदर प्रक्रियेमध्ये विभागाच्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये दरम्यान शिकाऊ उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिका-यांकडून दबाव आणल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करतांना पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्रांची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रितीने ऑनलाईन (Online) अर्ज सादर करावा. फोटो अथवा मुळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत कोणताही तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका/पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला नसावा.
  • वरील कागदपत्रे अपलोड न केल्यास नोंदणीधारकांना पुढील प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलब्दारे कळविण्यात येईल, तरी कोणीही महावितरण कार्यालयास भेट देवू नये.
  • जाहीरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागांमध्ये अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहीरात रदद करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे. सदर बाबतीत कुठल्याही प्रकारचा अधिकचा पत्रव्यवहार व याअनुषंगाने कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन (Online) अर्ज सादर करताना उमेदवाराने सदयस्थितीत कार्यास्थित असणारा Email-ID व भ्रमनध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक राहील.  Email-ID व भ्रमनध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवारांवर राहील.
  • दि. 02.06.2025 नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विवार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच या कार्यालयाने मागणी केल्यास शासकीय नियमाप्रमाणे आरक्षणा संबंधित कागदपत्रे सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
  • शिकाऊ उमेदवारीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही, याची कृपया नोंद घ्यावी
  • निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सालय यांच्याकडून वैद्यकिय दाखला देणे बंधनकारक आहे. तसेच निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराने (पोलिस पाटील, मुख्याध्यापक, नगरसेवक, सरपंच यांच्या स्वाक्षरीचे) चारीत्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • कागदपत्रे तपासणी किंवा शिकाऊ उमेदवार म्हणून हजर होण्याकरीता कोणत्याही रक्कमेची पुर्तता कंपनी देनार नाही
  • प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही निवासव्यवस्था कंपनीकडुन मागणी करता येणार नाही.
  • सदर प्रपत्र आवश्यक कागदपत्र / प्रमाणपत्रांसह विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज भरती/ निवड प्रक्रीयेसाठी विचारात घेतला जाणार नाही, याची नोंद सुध्दा उमेदवारांनी घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत तसेच जाहिरातीमध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत/स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे दि. 02.06.2025 पर्यंत अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर– 413 512 येथील कार्यालयास स्वत: प्रत्यक्षात सादर करावे.

Latur Mahavitaran Recruitment 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02 जून, 2025 आहे.
  • ऑनलाईन अर्ज तसेच कागदपत्रे पाठविण्याची शेवटची दिनांक 02 जून, 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment