Join Whatsapp Group

Join Telegram Group

IGR Maharashtra Peon Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई या पदाची पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!

10 वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी… महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये IGR Maharashtra (IGR) (IGR Maharashtra Peon Bharti 2025) मध्ये मोठी शिपाई पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये IGR Maharashtra (IGR) (IGR Maharashtra Peon Bharti 2025) (IGR Maharashtra Peon Recruitment 2025) IGR Maharashtra Peon Career 2025 (IGR Maharashtra Job 2025) (IGR Peon Vacancy 2025) (IGR Pune Peon Job 2025) (IGR Shipai Bharti 2025) IGR Pune Shipai Recruitment 2025) मध्ये शिपाई या पदाच्या एकुण 284 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www. igrmaharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 22 एप्रिल, 2025 पासून ते 10 मे, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 10 मे, 2025 16 मे, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

IGR Maharashtra Peon Bharti 2025
IGR Maharashtra Peon Bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 22.04.2025 ते 10.05.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 10.05.2025 16.05.2025
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
  • 📝मुलाखत/कागदपत्रे पडताळणी दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – महाराष्ट्र राज्य विभाग

एकूण – 284 पदे- IGR Maharashtra Peon Bharti 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 शिपाई (गट ड) 284

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- IGR Maharashtra Peon Bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 10.05.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा नागरीक असावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. पदांचे नांव

शैक्षणिक अर्हता

1 शिपाई (गट ड)
  • 10वी उत्तीर्ण  {माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण}

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
📑 छाेटी जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- IGR Maharashtra Peon Bharti 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 22.04.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय असावे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 43 वर्षे वय असावे
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे.
  • अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे राहील.
  • दिव्यांग कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
  • प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच भुकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
  • खेळाडू तसेच अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील.

परीक्षा शुल्क (फी)- IGR Maharashtra Peon Bharti 2025

  • खुलाप्रवर्गासाठी परीक्षा शुल्क –1000/-
  • मागासवर्गीय तसेच अनाथ प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 900/-
  • माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक यांचे साठी परीक्षा शुल्क माफ राहिल.
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – IGR Maharashtra Peon Bharti 2025 Salary

अ.क्र. पदांचे नाव वेतनश्रेणी
1 शिपाई (गट ड)

S-1 : 15000-47600


अभ्यासक्रम – Syllabus IGR Maharashtra Peon Bharti 2025

  • नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदाचा मराठी अभ्यासक्रम (परीशिष्ट- 2) –  👉 येथे क्लिक करा
अ.क्र. परीक्षेचे नाव एकुण प्रश्न कमाल गुण परीक्षेचे माध्यम कालावधी
1 इंग्रजी 25 50 इंग्रजी 30 मिनिटे
2 मराठी 25 50 मराठी 30 मिनिटे
2 सामान्य ज्ञान 25 50 इंग्रजी व मराठी 30 मिनिटे
4 बौध्दिक चाचणी/अंकगणित 25 50 30 मिनिटे
  100 200   120 मिनिटे
  • प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील.
  • सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपध्दतीचा अवलंब केला जाणार नाही.

अर्ज करण्यासाठीची महत्वाची सूचना- IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी प्राप्त करून घेण्यासाठी वेगळ्याने नविन लिंक ही www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल त्यामुळे आपण सातत्याने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळ पाहत राहण्याची जबाबदारी प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक व बंधनकारक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवाराची कसल्याही स्वरुपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रुपरेषा/वेळापत्रक/परीक्षाकेंद्र / बैठक क्रमांक इ. बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  • ऑनलाईन परीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातुर, मुंबई आणि कोंकण विभागातील खालील नमुद विविध शहरांमध्ये केले जाईल. उमेदवाराने निवड केलेल्या परीक्षाकेंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अहिल्यानगर, नागपुर, अकोला, नांदेड, अमरावती, नंदुरबार, बीड, नाशिक, भंडारा, परभणी, चंद्रपुर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, जळगाव, सातारा, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, लातुर, सोलापुर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे/एमएमआर, यवतमाळ इ. ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतला जाईल.
  • परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची (पावती) प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.igrmaharashtra.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी.
  • वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक (एस.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरणेत येईल.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  1. प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
  2. अर्ज सादरीकरण
  3.  शुल्क भरणा

अ. प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे. – IGR Maharashtra Peon Bharti 2025

  • https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरीता “नवीन वापरकर्त्याची नोंदणी” (“Click here for New Registration”) वर क्लिक केल्यानंतर यंत्रणा लॉग-इन पृष्ठ प्रदर्शित करेल. नवीन खाते (वापरकर्त्याचे नाव Login व Password) निर्माण करण्यासाठी लॉग-इन पृष्ठाव्दारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
  • प्रोफाईलव्दारे माहिती भरताना उमेदवाराने स्वतःचाच वैध ई-मेल आयडी, वैध भ्रमणध्वनी क्रमांक व जन्म दिनांक नोंदविणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे नित्य वापरात असेल असा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच भरती प्रक्रिये दरम्यान पत्रव्यवहार, प्रवेशपत्र आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्याकारणामुळे भरती प्रकियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये नोंदणीकृत सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैध व कार्यरत राहणे आवश्यक आहे.
  • वरीलप्रमाणे प्रोफाईलची निर्मिती झाल्यानंतर वापरकर्त्याने स्वतःच्या Login व Password व्दारे प्रवेश करून प्रोफाईलमध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, इतर माहिती, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.
  • फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे- नोंदणीची प्रक्रिया व प्रोफाईलव्दारे विचारलेली माहिती भरून झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःचे छायाचित्र फोटो (रुंदी 4.5 से.मी. x उंची 3.5 से.मी.) व स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करुन खालीलप्रमाणे अपलोड करावी.
  • पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचा फोटो चिकटवावा. फोटोवर स्वाक्षरी करू नये अथवा फोटो साक्षांकित करु नये. वरील सुचनांनुसार फोटो कागदावर व्यवस्थित चिकटवावा, स्टेपल अथवा पिनिंग करु नये. फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करता येईल.
  • छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून आधी काढलेले नसावे आणि ते ऑनलाईन परिक्षेच्या वेळी उमेदवाराच्या रुपाशी जुळणारे असावे.
  • विहित आकार / क्षमतेप्रमाणे काळ्या शाईच्या (बॉल) पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • वरीलप्रमाणे विहित आकारातील फक्त फोटो व स्वाक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी. संपूर्ण पृष्ठ अथवा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करु नये.
  • स्कॅन करून अपलोड केलेली स्वाक्षरी, प्रवेशपत्र / हजेरीपट व तत्सम कारणासाठी वापरण्यात येईल. परीक्षेच्या वेळी, प्रत्यक्ष कागदपत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अर्ज भरताना केलेली स्वाक्षरी व फोटो न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, अथवा अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ब. अर्ज नोंदणी सादरीकरण- IGR Maharashtra Peon Bharti 2025

  1. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर जाऊन “Click here for New Registration ” या पर्यायावर क्लिक करा जेथे एक नवीन स्क्रीन उघडेल.
  2. अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल.
  3. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट (Save & Next) टॅब निवडून आधीच एंटर (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
  4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/करणे शक्य होणार नाही.
  5. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
  6. तुमचे तपशील सत्यापित करा (Validate your details) आणि जतन करा आणि पुढील” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
  7. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्णची कार्यवाही करावी.
  8. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन” (Preview) टॅबवर क्लिक करा.
  9. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा’ (COMPLETE REGISTRATION)
  10. पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Submit) बटणावर क्लिक करावे.

क. परीक्षा शुल्क भरणे- IGR Maharashtra Peon Bharti 2025

  1. डेबिट कार्ड (RuPay/Visa/Master Card/Maestro), केडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्डस्, मोबाइल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते.
  2. व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, एक ई-पावती तयार होईल.
  3. ई- पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शविते.
  4. उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

परीक्षा- IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) करीता वेगळयाने नविन लिंक ही www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. नविन लिंकवर परीक्षेच्या किमान ७ (सात) दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावरून काढून घ्यावे.
  • परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा छायाप्रतीसह सोबत ठेवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतःजवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेश पत्र व ओळखीच्या पुराव्याची छायाप्रत जमा करावी.

परीक्षेचे वेळापत्रक- IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • परीक्षेचे वेळापत्रक हे www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. त्याकरिता उमेदवारांनी वारंवार संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करणे आवश्यक राहील.

परीक्षा केंद्र – IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे
  • सदरची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर विविध सत्रात घेणेत येणार असल्याने उमेदवाराने निवडलेले परीक्षा केंद्रच उमेदवाराला मिळेल याची हमी देता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
  • ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. 04 मे 2022 अन्वये कागदपत्रे पडताळणीकरिता बोलावण्यात येईल.
  • काही अपरिहार्य कारणास्तव परिक्षेच्या तारखांमध्ये परिक्षेच्या ठिकाणामध्ये बदल करावा लागल्यास त्याबाबतची माहिती www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • सदर परीक्षा प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर “ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ व सत्र इत्यादी बाबत बदलाची विनंती मान्य केली जाणार नाही
  • उमदेवारांनी आपल्या जबाबदारीवर स्वखर्चाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावायचे आहे या संबंधात कोणत्याही प्रकारच्या हानी / नुकसानीस नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे, कार्यालय जबाबदार राहणार नाही.
ओळख पटवणे- IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उमेदवाराचे ओळख पटवणारे मूळ कागदपत्रांसह व उमेदवाराचा अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र जसे पॅन कार्ड (Pan Card) / पारपत्र (Passport) / वाहनचालक परवाना (Driving License) / मतदार ओळखपत्र (Voter ID) / आधार कार्ड, बँक/पोस्ट फोटोसहीतचे पासबुक / फोटोसहीत असणारे नोंदणीकृत विद्यापीठ/कॉलेज चे फोटोसहित ओळखपत्र / बार कॉन्सिलचे ओळखपत्र हे समवेक्षक / पर्यवेक्षकाला सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराचे प्रवेशपत्र, हजेरीपत्रक /उपस्थितीपत्रक आणि त्याने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवाराची ओळख पटविली जाईल. जर उमेदवाराची ओळख पटवण्याबाबत काही शंका उपस्थित झाल्यास किंवा ओळख शंकास्पद असल्यास त्याला परीक्षेसाठी उपस्थित राहू दिले जाणार नाही. सदर उमदेवाराचे मूळ प्रवेशपत्र व ओळखपत्राची एक छायाप्रत परीक्षा हॉलमध्ये जमा करणे आवश्यक राहील.
  • उमेदवाराने परीक्षेला उपस्थित राहताना स्वतःची ओळख पटविण्यासाठीची आवश्यक ती मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती परीक्षेच्या प्रवेशपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या प्रवेशपत्रावरील नाव (परीक्षेसाठी नोंदणी केल्यानुसार) सोबत सादर करण्यात येणाऱ्या ओळखपत्राशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या / मधल्या / शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सदर महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व सादर करण्यात आलेले फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाही.
  • रेशनकार्ड, शिकाऊ वाहन परवाना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.
  • परीक्षेला उशिरा येण्याबाबत परीक्षेच्या प्रवेशपत्रात परीक्षेला हजर राहण्यासाठी दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस उपस्थित राहू दिले जाणार नाही. प्रवेशपत्रावरील परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ ही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होणाच्या आधीची असणार आहे. परीक्षेची वेळ जरी दोन तास (120 मिनिटे) असली तरी उमेदवारास ओळख पटवणे, आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, सूचना देणे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी साधारण चार तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागेल.

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना- IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे.
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) व अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या / पत्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी.
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी एकुण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरीता 120 मिनीटे इतका कालावधी देण्यात येईल.
  • गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणेत येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही.
  • ऑनलाईन पद्धतीने घेणेत आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करणेत येणार नाही, याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये.
  • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ दिनांक 04 मे 2022 अन्वये गट-ड मधील पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षेकरीता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
  • तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता बोलविण्यात येईल. त्याबाबतची यादी व वेळापत्रक www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
  • कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मुळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
  • कागदपत्र पडताळणीकरीता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • अर्ज सादर केलेल्या उमेदवारांस प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल, त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांस निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा.
  • भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सर्व माहिती व त्यानुषंगाने होणा-या बदलाबाबतची सर्व माहिती केवळ https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, याव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमाव्दारे भरती प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये स्विकृत केला जाणार नाही.

IGR Maharashtra Peon Bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10.05.2025  16.05.2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment