Join Whatsapp Group

Join Telegram Group

junior Draftsman 2024 कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) या संवर्गाच्या एकुण 154 जागांची पदभरती

junior Draftsman 2024/ DTP Tracer 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क)  एकुण 154 पदाची भरती

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या अंतर्गत पुणे/ कोकण / नागपूर/ नाशिक छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागात Junior Draftsman 2024 / DTP Tracer 2024 कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) या संवर्गातील पदाकरीता सरळसेवा मार्फत एकूण 154 जागाची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी  www.urban.maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने दिनांक 18 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 17 नोव्हेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 17 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा.

junior Draftsman 2024
junior Draftsman 2024

 

एकूण – 154 पदे junior Draftsman 2024 / DTP Tracer 2024

अ.क्र. पदांचे नांव वेतनश्रेणी पदे
1 कनिष्ठ आरेखक (गट-क) S-8: 25500-81100 28
2 अनुरेखक (गट-क) S-7: 21700-69100 126
  • कनिष्ठ आरेखक व अनुरेखक (गट-क) या पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे, घेण्यात येईल व त्यासाठी स्वतंत्र वेळापत्रकानुसार जाहिर करण्यात येणार आहे. सुचनांचे अवलोकन करण्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी विभागाच्या www.dip.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक भेट द्यावी.
  • उमेदवारांच्या संख्येस अनुसरून ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येतील.
  • कनिष्ठ आरेखक व अनुरेखक (गट-क) या पदासाठीची परीक्षा 2 स्तरांवर घेण्यात येणार आहे. पाहिले ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल व दुसऱ्या स्तरामध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान ४५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल.

कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता-junior Draftsman 2024 / DTP Tracer 2024

1.शैक्षणिक अर्हता –  12 वी नंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता.

तसेच

2. तांत्रिक अर्हता-  मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं-संगमक सहाय्यित आराखडा (ऑटो-केंड) (Auto-CAD) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

टिप – प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या म्हणजेच दिनांक 17 नोव्हेंबर, 2024 या अंतिम दिनांकापर्यंत उमेदवाराने संबंधित किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

Important link
कनिष्ठ आरेखक (गट-क) जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अनुरेखक (गट-क) जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अनुरेखक (गट-क) विभागनिहाय जागा येथे क्लिक करा

वयोमर्यादा: junior Draftsman 2024 / DTP Tracer 2024

  • उक्त दोन्ही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक 17 नोव्हेंबर, 2024 रोजी किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मागासवगीयांसाठी / खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी / उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 43 वर्ष. 
  • दिव्यांग, भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्ष,
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ५५ वर्ष .
  • माजी सैनिक – वयोमर्यादा नाही.

 परीक्षा शुल्क-junior Draftsman 2024 /DTP Tracer 2024

  • अराखीव (खुला) प्रवर्ग – 1000/-
  • राखीव प्रवर्ग-900/-
  • माजी सैनिकांराठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

सर्वसाधारण सुचना:- junior Draftsman 2024 / DTP Tracer 2024 

  1. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या इ. बाबतचा तपशिल www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in व https://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवरील सर्वसाधारण सुबना मध्ये लिक प्रसिध्द करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.
  2.  भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.urban.maharashtra.gov.in. www.dtp.maharashtra.gov.in https://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रप्यपहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरुन माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. • स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल, याबाबत कोणताही दावा करता येणार नाही.

अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचनाः- DTP Tracer 2024

  • उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार असल्यामुळे अर्ज भरतांना /सादर करताना, शैक्षणिक प्रमाणपत्रे / अन्य आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
  • ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी
  • जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.

Leave a Comment