सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… धर्मादाय आयुक्तालय मध्ये पदभरती… (CCM) (Charity Commissioner) Charity Commissioner Bharti 2025 आजच अर्ज करा… जाणून घ्या संपुर्ण माहिती..!!
धर्मादाय आयुक्तालय (CCM) मध्ये (Charity Commissioner) Charity Commissioner Bharti 2025 (Charity Commissioner Job 2025) Charity Commissioner Career 2025 (Charity Commissioner Recruitment 2025) (CCM Vacancy 2025) (CCM Job 2025) (CCM Bharti 2025) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गाच्या रिक्त पदासाठी 179 पदांच्या पदभरती करीता पात्र इच्छूक उमेदवारांकडून धर्मादाय आयुक्तालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 11 सप्टेंबर, 2025 पासून ते दिनांक 03 ऑक्टोबर, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 03 ऑक्टोबर, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.
📌 महत्वाचे दिनांक 📌 - Charity Commissioner Bharti 2025
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 11.09.2025 ते 03.10.2025.
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 03.10.2025.
- 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – ऑक्टोबर- नोव्हेंबर- 2025
- 📍नोकरी ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्रात
एकूण – 179 पदे Charity Commissioner Bharti 2025
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | विधि सहायक | 03 |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 22 |
4 | निरीक्षक | 121 |
5 | वरिष्ठ लिपिक | 31 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Charity Commissioner Bharti 2025
- सदर वरील सर्व पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. | पदांचे नांव |
शैक्षणिक अर्हता |
1 | विधि सहायक |
|
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) |
|
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) |
|
4 | निरीक्षक |
|
5 | वरिष्ठ लिपिक |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठी कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗
|
|
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Charity Commissioner Bharti 2025
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 03.10.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय असावे.
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 43 वर्षे वय असावे
- माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे.
- खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील.
- दिव्यांग कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
परीक्षा शुल्क (फी)- Charity Commissioner Bharti 2025
- अमागासवर्ग प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी)- रु. 1000/-
- मागासप्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क (फी) – रु. 900/-
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – GMC Nanded Bharti 2025 Salary
अ.क्र. | पदांचे नांव | वेतनश्रेणी |
1 | विधि सहायक | S-15 : 41800 – 132300 |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | S-16 : 44900 – 142400 |
3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | S-15 : 41800 – 132300 |
4 | निरीक्षक | S-13 : 35400 – 112400 |
5 | वरिष्ठ लिपिक | S-8 : 25500 – 81100 |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना:- Charity Commissioner Bharti 2025
- वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता/अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नियमित वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर महिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी वैध राहणे आवश्यक आहे.
- अराखीव (खुला) पदांकरीता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा (मागासवर्ग उमेदवारांसह) विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले, तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
- संबंधित पदाच्या/परीक्षेच्या जाहिरात /अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
- अर्जातील माहिती तपशील तसेच अर्जासोबत अर्हते पृष्ठतेसंलग्न उमेदवारांने योग्य कागदपत्र सादर केली आहेत यास अधिन राहून संबंधित उमेदवारास परीक्षेस बसण्यासाठी विचारधीन करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारास सदर परीक्षेअंती किमान गुण प्राप्त झाले तरी परीक्षा संबंधित पदाची आवश्यक शैक्षणिक व इतर अर्हता संलग्न कागदपत्राच्या पडताळणीअंती संबंधित उमेदवार शिफारस निवडीस पात्र होईल. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी व अर्ज करावा.
- नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहीत स्त्रियांच्या बाबतीत), नावात बदल झाल्या संबंधित अधिसूचीत केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्या संबंधिचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
- पत्रव्यवहारासाठी स्वतःच्या पत्ता इंग्रजीमध्येच लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्राचा/ संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.
- अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार मूळ शैक्षणिक इतर कागदपत्रांची संबंधित शैक्षणिक विद्यापीठ /संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करु न शकल्यास उमेदवाराची निवड रह करण्यात येईल.
- वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग/नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अशंकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव पात्रता व ज्या दिव्यांग उमेदवारास लेखनिक द्यावयाचा आहे इत्यादी बाबत अर्जामध्ये स्पष्टपणे निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास, संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवायोजन कार्यालय/समाज कल्याण /आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा सैनिक बोर्ड दिव्यांग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे, अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अशंकालीन इत्यादी समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
- प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- प्राप्त अर्जाच्या संख्येचा विचार करुन निवड प्रक्रियेचे स्वरुप ठरविण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई व निवड समिती यांना राहील.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. अर्ज इंग्रजीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
- संक्षिप्तपणे (Abbreviations) वा अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या पत्त्याच्या दोन भागांमध्ये एक स्पेसने (जागा) सोडावी.
- एस. एस. सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रांवरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत त्यांनतर नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदलासंदर्भात विहित प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी.
- उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्रे, मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे एमएसीआयटी प्रमाणपत्र तसेच मागणवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गवगळता अन्य सर्व मागास प्रवार्गातील उमेदवारांनी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र, इत्यादी सर्व कागदापत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती, तसेच उमेदवाराची समांतर आरक्षणातर्गत निवड झाली असल्यास, शासन निर्णयानुसार विहीत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक असेल.
- संबंधित पदाच्या / परीक्षेच्या जाहिरात/सूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनाचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
- सदरची परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंतः बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.
निवड पध्दत :- Charity Commissioner Bharti 2025
- जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
- नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते. एकदा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या लिंक होस्ट केल्यानंतर, उमेदवाराला ई-मेल व मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे त्याबाबत सूचित केले जाईल. उमेदवार थेट लिंकवरून त्याचे प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्राबाबत कोणताही वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा लघुसंदेशाद्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यांत येईल.
- जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करुन अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- सरळसेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची उत्तरपुस्तिकांची गुणपडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही. अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावणेकरीता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल, त्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञत प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न यांचाही समावेश असेल.
- पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी पाचारण करण्यात येईल. त्याबाबतची यादी व वेळापत्रक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच उमेदवाराच्या ई-मेल अथवा मोबाईलवर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.
- निवडसूचीतील उमेदवाराची व त्या उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणीसाठी (Verification) उमेदवारांने मूळ (Original) कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
- पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर्ड केलेल्या ई-मेल आयडीवर / भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे निवडसूची /प्रतिक्षा यादी नियुक्तीबाबत कळविण्यांत येईल. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी विधीग्राहय राहील. त्यानंतर ही निवडसूची आपोआप व्यपगत होईल.
- कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त दाखला, भूकंपग्रस्त दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, खेळांडूचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन उमेदवार प्रमाणपत्र, अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र इ. बाबतची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. कागदपत्रे तपासणीचे वेळी उमेदवार शैक्षणिक व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणीकरीता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करणेत येईल व त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतलीजाणार नाही. कागदपत्रे तपासणीअंती निवड यादी व प्रतिक्षा यादी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या
- www.charity.maharashtra.gov.in
- या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
अर्ज भरणे व सादर करणेबाबत आवश्यक सूचना :- Charity Commissioner Bharti 2025
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.charity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा.
- उमेदवारास अर्ज सादर करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास ०२२-२४९७६४२२ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तसेच जाहिरात मधील बाबीसंबंधी, काही विचारणा करावयाची असल्यास या 022-24976422 हेल्पलाईन वर सोमवार ते शुक्रवार 10.30 ते 17.30 वाजेपर्यत संपर्क साधावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
१. प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
२. अर्ज सादरीकरण.
३. शुल्क भरणा.
१. प्रोफाईल अद्ययावत करणे. Charity Commissioner Bharti 2025
- धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकव्दारे, वापरकर्त्याने त्याचे नविन प्रोफाईल तयार करावे.
- नवीन वापरकर्त्यांची नोंदणी या टॅब वर क्लिक केल्यानंतर संबंधित यंत्रणा लॉग-इन पृष्ठ प्रदर्शित करेल. त्यानुसार नवीन खाते (वापरकर्त्याचे नाव login a password) निर्माण करण्यासाठी लॉग-इन पृष्ठावर सर्व माहिती भरुन नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी.
- प्रोफाईलद्वारे माहिती भरताना उमेदवाराने स्वतःचाच वैध ई-मेल आयडी, वैध मोबाईल क्रमांक व जन्म दिनांक नोंदविणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे.तसेच भरती प्रक्रिये दरम्यान पत्रव्यवहार, प्रवेशपत्र आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्यामुळे भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये नोंदणीकृत ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैधकार्यरत राहणे आवश्यक आहे.
- वरीलप्रमाणे प्रोफाईलची निर्मिती झाल्यानंतर वापरकर्त्याने स्वतःचा login व password द्वारे प्रवेश करुन प्रोफाईलमध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील, इतर माहिती, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे :- नोंदणीची प्रक्रिया व प्रोफाईलद्वारे विचारलेली माहिती भरून झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःचे छायाचित्र /फोटो (रुंदी ३.५ सें.मी. x लांबी ४.५ सें.मी.)
- स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करुन खालीलप्रमाणे अपलोड करावी :- एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचा फोटो चिकटवावा. फोटोवर स्वाक्षरी करु नये अथवा फोटो साक्षांकित करु नये. वरील सुचनांनुसार फोटो कागदावर व्यवस्थित चिकटवावा. स्टॅपल अथवा पिनिंग करु नये. फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करता येईल.
- फोटोचा आकार खालीलप्रमाणे असणे गरजचे आहे. फोटो रुंदी ३.५ सें.मी. फोटो लांबी ४.५ सें.मी.
- छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून आधी काढलेले नसावे आणि ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराच्या रुपाशी जुळणारे असावे.
- विहित आकार क्षमतेप्रमाणे काळया शाईच्या (बॉल) पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी. उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही.
- वरीलप्रमाणे विहित आकारातील फक्त फोटो व स्वाक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी. संपूर्ण पृष्ठे अथवा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करु नये.
- स्कॅन करुन अपलोड केलेली स्वाक्षरी, प्रवेशपत्र / हजेरीपट तत्सम कारणासाठी वापरण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रत्यक्ष कागदपत्रे तपासणीच्या वेळी व अन्य कोणत्याही वेळी अर्ज भरताना केलेली स्वाक्षरी व फोटो न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल अथवा अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अर्ज नोंदणी – Charity Commissioner Bharti 2025
- धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायावर क्लिक करा जे एक नवीन स्क्रिन उघडेल.
- नवीन अर्ज करण्यासाठी योग्य टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ठ करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रिनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने स्क्रीनवर दर्शविण्यात येणारा तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवावा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि लघुसंदेश देखील पाठविण्यात येईल.
- जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो सेव्ह आणि नेक्स्ट टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करु शकतो. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. उमेदवावारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करुन घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण पूर्ण नोंदणी बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही करणे शक्य होणार नाही.
- उमेदवाराचे नाव किंवा त्याचे तिचे वडील/पती इ. वे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे जसे ते प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका /ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.
- तुमचे तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढील बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.
- फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
- नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी प्रिव्हिव्ह टॅबवर क्लिक करा
- आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्रे, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा.
- पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व सबमिट बटणावर क्लिक करावे.
2.परीक्षा शुल्क भरणे:- Charity Commissioner Bharti 2025
- ऑनलाईन मोड:- डेबिट कार्ड (Rupay/Visa/Master Card/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स/मोबाईल वॉलेट वापरुन पेमेंट केले जाऊ शकते.
- व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई-पावती तयार होईल.
- ई-पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शविते.
- उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट घेणे आवश्यक आहे.
3.कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रियाः- Charity Commissioner Bharti 2025
- ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराला छायाचित्र, स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी स्वतंत्र लिंक प्रदान केल्या जातील. ऑनलाईन छायाचित्रासाठी (Capture photograph) चे बटन दाबणे आवश्यक आहे. संबंधित लिंकवर क्लिक करा “छायाचित्र /स्वाक्षरी अपलोड करा. ऑनलाईन फोटो व स्कॅन केलेला फोटो दोन्ही फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
- फोटो, स्वाक्षरी, अपलोड केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज स्विकृत होणार नाही.
- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, कॅप्चर केलेला फोटो, अपलोड केलेला फोटो आणि अपलोड केलेली स्वाक्षरी पाहणे अनिवार्य आहे, अन्यथा फॉर्म स्विकृत होणार नाही.
- छायाचित्रातील चेहरा किंवा स्वाक्षरी अस्पष्ट असल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- ऑनलाईन अर्जामध्ये छायाचित्र /स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी प्रतिमा स्पष्ट आहेत आणियोग्यरित्या अपलोड केल्या आहेत हे तपासावे.
- उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की अपलोड करावयाचा फोटो आवश्यक आकाराचा आहे आणि चेहरा स्पष्टपणे दिसला पाहिजे.
- टिपः ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनीत्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट घ्यावी.
अर्ज सादरीकरण- Charity Commissioner Bharti 2025
- सदर अर्ज धर्मादाय आयुक्त यांच्या www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकव्दारे दिनांक ११/०९/२०२५, वेळ १४:०० पासून भरणेसाठी उपलब्ध होतील.
- उमेदवारांनी परीक्षा शुल्क दिलेल्या पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
- परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणा करण्यात यावे.
- उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठीस्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- परीक्षा शुल्क ना परतावा (Non Refundable) आहे. वरील कार्यपध्दती ही अर्ज करण्याची योग्य पध्दत आहे. याशिवाय दुसऱ्या पध्दतीने केलेले अर्ज हे अवैध ठरविण्यात येतील.
- उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करु इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्म दिनांक, भ्रमणध्वनी क्रमांत व ई-मेल आयडी इ. माहिती काळजीपूर्वक भरावी. सदर माहिती चुकल्यास त्यास धर्मादाय आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही.
- उमेदवाराने अर्जावर केलेली स्वाक्षरी ही त्याच्या प्रवेशपत्रावर / उपस्थिती पत्रकावर एकाच प्रकारची असेल याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जावर अपलोड केलेले छायाचित्र वरीलप्रमाणे सर्व ठिकाणी एकच असेल याची दक्षता घ्यावी.
- उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील तपशिल व ऑनलाईन पध्दतीने सादर केलेली कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षेस बसणेस मुभा देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार संभाव्य निवडसूची क्षेत्रात आला तरी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ संभाव्य निवडसूची क्षेत्रात आल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज सादर करावा.
- भरती प्रक्रियेच्या संदर्भातील व त्याअनुषंगाने होणाऱ्या बदलाबाबतची सर्व माहिती केवळ धर्मादाय आयुक्तालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमाद्वारे भरती प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये स्विकृत केला जाणार नाही.
- वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र/, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव पात्रता इ. संदर्भात नचूकता अर्जामध्ये स्पष्टपणे/निर्विवादपणे अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. नसल्यास, संबंधित दाव्याचा नंतर विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण दिव्यांग कल्याण /जिल्हा सैनिक बोर्ड/ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / कार्यालय इ- कार्यालयात नोंदविलेले आहे, अशा उमेदवारांनी तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन उमेदवार यांनी देखील स्वतंत्ररित्या अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
परीक्षा :- Charity Commissioner Bharti 2025
- जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल.
- परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या / विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.
- विधि सहायक या पदाकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधुन निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. विधि सहायक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.
- निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांकरिता परीक्षेचे गुण २०० व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधुन निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. निरीक्षक व वरिष्ठ लिपिक पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे.
- परंतु लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी, या संवर्गाचे परीक्षेचे गुण १२० व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. तसेच व्यावसायीक चाचणीसाठी ८० गुणांची असेल, व जे उमेदवार परिक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवारांनाच व्यावसायीक चाचणी देता येईल.
- परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
- लघुलेखक उच्चश्रेणी, व लघुलेखक निम्नश्रेणी पदाकरीता परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत जोडण्यात येत आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या व परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र (HallTicket) www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकव्दारे, परीक्षेच्या ०७ (सात) दिवस अगोदर त्यांच्या व्यक्तिगत प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
- उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा प्रवेशपत्राची प्रत स्वतः संकेतस्थळावरून प्रिंट करून घ्यावी. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा सोबत ठेवणे (छायाप्रतीसह) बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारांस परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- परीक्षेनंतर प्रस्तुत प्रवेशपत्र स्वतः जवळ जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र व ओळखीच्या पुराव्याची छायाप्रत जमा करावी. परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धतेनुसार निश्चित केली जातील.
ओळख पटवणे:- Charity Commissioner Bharti 2025
- परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उमेदवाराचे ओळख पटवणारे मूळ कागदपत्रासह व उमेदवाराचा अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैध फोटो ओळखपत्र जसे पॅन कार्ड (Pan card)/ पारपत्र (Passport)/ वाहनचालक परवाना (Driving License)/ मतदार ओळखपत्र (Voter ID)/ आधारकार्ड, बैंक पोस्ट फोटोसहीतचे पासबुक / विदयापीठ / शासकीय कर्मचारी ओळखपत्र / /कॉलेजचे फोटोसहीत ओळखपत्र बार कौन्सिलचे ओळखपत्र हे समवेक्षक /पर्यवेक्षकाला सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराचे प्रवेशपत्र, हजेरीपत्रक /उपस्थितीपत्रक आणि त्याने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवाराची ओळख पटविली जाईल. जर उमेदवाराची ओळख पटवण्याबाबत काही शंका उपस्थित झाल्यास किंवा ओळख शंकास्पद असल्यास त्याला परीक्षेसाठी उपस्थित राहू दिले जाणार नाही, सदर उमेदवारांचे मूळ प्रवेशपत्र व ओळखपत्राची एक छायाप्रत परीक्षा हॉलमध्ये जमा करणे आवश्यक राहील.
- टीप : उमेदवाराने परीक्षेला उपस्थित राहताना स्वतःची ओळख पटविण्यासाठीची आवश्यक ती मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांच्या छायांकीत प्रती परीक्षेच्या प्रवेशपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या प्रवेशपत्रावरील नाव (परीक्षेसाठी नोंदणी केल्यानुसार) सोबत सादर करण्यात येणाऱ्या ओळखपत्राशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सदर महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र यापैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व सादर करण्यात आलेले फोटो असलेले ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाही.
- रेशनकार्ड, शिकाऊ वाहन परवाना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.
कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे : Charity Commissioner Bharti 2025
- सदर परीक्षेच्या निकालानंतर संभाव्य निवडसूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसारखालील कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य (लागू असलेली) आहे.
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा पत्र.
- शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे.
- वयाचा पुरावा.
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
- राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य).
- वैध नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र.
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
- खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा.
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अराखीव महिला,मागासवर्गीय, आदुध, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र (डोमिसाईल)
- पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र (शासन निर्णय क्र. पक १००९/प्र.क्र.२००/२००९/१६- अ, दि. २७/१०/२००९ नुसार,
- शासन निर्णय मानंम २०१२/प्र.क्र.२७७/३९,दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद प्रमाणे MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र.
- पात्रते संदर्भातील विविध दाव्याच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे इत्यादी.
उमेदवारांसाठी काही विशेष सूचना:- Charity Commissioner Bharti 2025
- धर्मादाय आयुक्त कार्यालयत सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे/अभिलेख ही धर्मादाय आयुक्त अभिलेखाचा भाग होती व शासकीय नियमानुसार वापरण्यात येतील.
- जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल”.
- शासन सेवेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती/ मध्यस्थ/ ठग्यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहेत.
- यापूर्वी सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या जाहिरातीस अनुसरून पुन्हा नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.
- परीक्षेची वेळ, दिनांक, ठिकाण, परीक्षेचे प्रवेशपत्र (HallTicket) याबाबत वेळोवेळी धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल, याबाबतची दक्षता स्वतः उमेदवाराने घेणे आवश्यक आहे. 3
- प्राप्त अर्जाची संख्या लक्षात घेता परीक्षेची वेळ, दिनांक व ठिकाण यामध्ये बदल होऊ शकतो. यामध्ये बदल होऊ शकतो. याबाबत अर्जदारांची तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे; याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील.
- उपरोक्त पदाच्या भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार निवड समिती, धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित, रद्द किंवा काही बदल करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहेत.
Charity Commissioner Bharti 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03.10.2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.