सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) (Bombay High Court Driver bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती…!!
मुंबई उच्च न्यायालय मध्ये (Bombay High Court) Bombay High Court Driver bharti 2025 (Bombay High Court Recruitment 2025) (Bombay High Court Job 2025) (Bombay High Court Vacancy 2025) (Bombay High Court Driver Job 2025) (Bombay High Court Driver 2025) (Bombay High Court Driver Recruitment 2025) वाहनचालक (Driver) या पदाच्या एकुण 11 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून मुंबई उच्च न्यायालय च्या https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 25 एप्रिल, 2025 पासून ते 09 मे, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 09 मे, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

📌महत्वाचे दिनांक 📌 - Bombay High Court Driver bharti 2025
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 25.04.2025 ते 09.05.2025
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 09.05.2025
- 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – उच्च न्यायालय मुंबई कार्यक्षेत्र
एकूण – 11 पदे- Bombay High Court Driver bharti 2025
अ.क्र. | पदांचे नांव | पदे |
1 | वाहनचालक (Driver) | 11 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Bombay High Court Driver bharti 2025 Qualification
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
- उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक.
- उमेदवारांचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाल (रेकार्ड) स्वच्छ असावा.
- मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक.
- उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहित असावी.
- उमेदवार शारीरिकदृष्टया सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | वाहनचालक (Driver) |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗
|
|
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
📑 Self-Declaration (Form – A) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
📑 Character Certificate 📑 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- Bombay High Court Driver bharti 2025
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरातीत नमूद दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- अराखीव उमेदवारांसाठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे असावे.
- मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचारी साठी वय मर्यादा नाही.
परीक्षा शुल्क (फी)- Bombay High Court Driver bharti 2025
- परीक्षा फी (Fee) – रु.500/-
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – Bombay High Court Driver bharti 2025 Salary
अ.क्र. | पदांचे नाव | वेतनश्रेणी |
1 | वाहनचालक (Driver) | S-10: 29200-92300 |
अर्ज करण्याची पध्दत :- Bombay High Court Driver bharti 2025
- अर्ज सादर करतांना www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या (Web Browsers) माध्यमातून संगणकावर भरावा.
- ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धिच्या दिनांकापासून 15 दिवसांत करावा. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
- पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईटद्वारे दिनांक 25/04/2025 ते दिनांक 09/05/2025 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 25/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता उघडेल आणि दिनांक 09/05/2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता बंद होईल.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्यावत पासपोर्ट साईज चा फोटो (3.5 सें. मी X 4.5 सें.मी) व स्वतःची स्वाक्षरी (3 सें.मी x 2.5 सें.मी) स्कॅन करून 40 KB पेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने दोन स्वतंत्र फाईल्स jpg/jpeg format मध्ये करून ऑनलाईन अर्जात दर्शविलेल्या ठिकाणी सदर फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे. (टिप. फोटो व स्वाक्षरी अपलोड झाल्याची खात्री करावी).
- प्रवेशपत्रावर / अर्जावर दुसऱ्याचा फोटो/स्वाक्षरी असल्यास उमेदवारास निवडीच्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- उमेदवाराने www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वर क्लिक करून Recruitment मध्ये Staff-Car-driver च्या Apply Online पर्याय (option) वर क्लिक करावे तनंतर SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी तनंतर SB Collect Reference No. प्राप्त होईल तनंतर ऑनलाईन फॉर्म भरावा.
- उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी I Agree बटणावर क्लिक करून अर्ज सादर (Submit) करावा. (एकदा माहिती सादर (Submit) केल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. तसेच त्यासंदर्भात उच्च न्यायालय प्रशासनाकडून कोणतीही तकार/दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही).
- उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज सादर (Submit) केल्यानंतर उमेदवाराने Print Application मध्ये जाऊन Registration ID Number व Date of Birth टाकून Print काढून त्या Printout वर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरतांना Upload केलेला फोटो चिटकवावा आणि विहित जागेवर काळया पेनाने स्वाक्षरी करावी. सदरील अर्जाचे Printout स्वतःकडे जतन करून ठेवावे. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्या-त्यावेळी सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी.
- ऑनलाईन अर्ज भरत असताना आपण जाहिरातीतील नमुद शैक्षणिक पात्रता / अनुभव /इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्विकारला जाईल.
- उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याच्या/तिच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.
ऑनलाईन शुल्क भरण्याची पध्दतः- Bombay High Court Driver bharti 2025
- उमेदवाराला वरीलप्रमाणे नोंदणी शुल्क ‘SBI Collect द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना ‘SBI Collect’ सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी ‘User Mannual’ मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
- अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल.
- ‘SBI Collect’ सुविधेद्वारे तयार केलेले नियम, अटी व शर्तीची कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाची नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. या बाबत कोणत्याही स्वरूपाची चौकशी/दाव्याची दखल घेतली जाणार नाही.
निवड प्रक्रियाः- Bombay High Court Driver bharti 2025 Syllabus
- आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सुची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
क्र. | परीक्षेचा प्रकार | गुण | अभ्यासकम |
1 | लेखी परीक्षा | 20 गुण
(उत्तीर्ण गुण किमान 7)
|
लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयांवर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील(i.e. objective type, multiple choice questions) :-
अ) वाहनांची देखभाल व किरकोळ दुरूस्ती विषयक ज्ञान. ब) मुंबई शहर व त्यालगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती. क) सामान्य ज्ञान. |
2 | पूर्वानुभव | 10 गुण | — |
3 | मोटार वाहन परीक्षा (प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत) | 10 गुण
(उत्तीर्ण गुण किमान 7)
|
— |
4 | तोंडी मुलाखत | 10 गुण
|
— |
निवड प्रक्रियेचे एकुण गुण | 50 गुण (उत्तीर्ण गुण किमान 25) |
नोंद- वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल.
ज्या उमेदवारांना मुलाखतीकरीता बोलवण्यात येईल, त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मुळ प्रमाणपत्रांसह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात :Bombay High Court Driver bharti 2025
- जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला. (शाळा प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र/एस.एस.सी. चे बोर्ड प्रमाणपत्र) सोडल्याचे
- शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक (10वी किंवा तत्सम परीक्षा, १२वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला, इत्यादी).(नोंद काही बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरुपात दिल्या जातात. या प्रकरणात, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकुण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा/बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनांनुसार भरावे. सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागविल्यास सादर करावे.)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. (10वी किंवा तत्सम परीक्षा, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला, इत्यादी)
- जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. (अर्जासोबत ऑनलाईन Form-A नमुन्यात)
- वैध वाहन परवान्याची (ड्रायव्हींग लायसन्स) प्रत.
- मोटार वाहन चालविण्याचे किमान 3 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र. प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे/व्यक्तीचे नावं, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे.
- वाहन दुरूस्ती/देखभालीचे ज्ञान असले बाबतचे प्रमाणपत्र. प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे/व्यक्तीचे नावं, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे.
- सक्षम अधिकाऱ्याने (मागासवर्गीयांसाठी). केलेला जातीचा प्रदान दाखला
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- रोजगार विनिमय (Employment Exchange) कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
- उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल तर तिच्या नावाच्या बदला बाबत दस्तऐवज जसे की, शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
- संबंधीत इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह.
- न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज.
उमेदवारांकरीता इतर महत्वाच्या सूचना :- Bombay High Court Driver bharti 2025
- परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, याबाबत सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
- सदरहू जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पद संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव पदे कमी/जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणताही दावा सांगता येणार नाही.
- सदरहु पदे जशी जशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांनी पदस्थापनेबाबत / स्थळाबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास किंवा पदस्थापनेबाबत विनंती केल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- अर्जदार जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेकरीता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. मुलाखती/नियुक्ती पूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात येईल. त्यावेळी उमेदवार अपात्र आढळल्यास नियुक्ती करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.
- जाहिरातीस अनुसरुन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्प सुची (Shortlisting) करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि/किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर, पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणमर्यादा ठरविण्याचे सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मुंबई यांनी आपल्याकडे राखून ठेवले आहेत.
- केवळ अर्ज दाखल केला यावरून मुलाखतीचा किंवा नेमणूकीचा हक्क प्रस्थापित होणार नाही. तसेच उमेदवाराची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर पदाच्या निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही.
- परीक्षेच्यावेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणि पडताळणीसाठी स्वतःचे आधारकार्ड/ पॅनकार्ड/वाहन परवाना इ. ओळखपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- मोटार वाहन परीक्षा तसेच मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी त्यांनी अर्जामध्ये नमुद व दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो प्रमाणपत्र (Photo ID) जसे मतदार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना यापैकी एखादा पुरावा आणावा.
- पात्र उमेदवारांना (नेमलेल्या तारखांना) लेखी परीक्षा, मोटार वाहन परीक्षा व तोंडी मुलाखतीसाठी स्वः खर्चाने हजर राहावे लागेल.
- कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षीत घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते असा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. त्याकरीता उमेदवारांनी उच्च न्यायालय, मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.
- उमेदवाराला कोणत्याही बदलाबाबतीची सूचना उशीरा मिळाल्यामुळे नियोजित तारखेस व वेळेस लेखी परीक्षेस, मोटारवाहन परीक्षेस किंवा मुलाखतीस उमेदवार अनुपस्थित राहिल्यास, उच्च न्यायालय प्रशासनाकडून या बाबत कोणतीही तक्रार/दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही.
- अपुर्ण अथवा चुकीची माहिती असलेला अर्ज प्रथम पडताळणीच्या टप्प्यात नाकारला जाईल. तसेच कोणतीही वस्तुस्थिती दडपल्यास अर्ज नाकारला जाईल. उमेदवाराने दिलेला कोणताही तपशील खोटा किंवा चुकीचा असल्याचे आढळल्यास, उमेदवाराला निवड प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्त झाल्यास त्याला/तिला पदावरून काढून टाकण्यात येईल.
- अल्पसुचीत पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, मोटार वाहन परीक्षा तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल. उमेदवाराने परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र ‘Admit Card’ वर क्लीक करून प्रिंट काढून घ्यावे.
- उमेदवाराने लेखी परीक्षा तसेच मोटारवाहन परीक्षेमध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे, तसेच त्याच्या अर्जाची छाननी व त्याने तोंडी मुलाखतीचे वेळेस हजर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची मुलाखतीची पात्रता अंतिमरित्या ठरविण्यात येईल. फक्त पात्र उमेदवारांचीच तोंडी मुलाखत घेण्यात येईल.
- उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, मोटार वाहन परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या (Merit) आधारे केली जाईल.
- मंजूर केलेली निवड यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त 2 वर्षासाठीच वैध राहील. त्यास मुदतवाढ न दिल्यास सदरची निवड यादी रद्द करण्यात येईल.
- निवड यादीतील उमेदवार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कर्तव्यात सामील होऊ शकला नाही तर त्याचे/तिचे नाव निवड यादीतून काढून टाकले जाईल.
- निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती सुरूवातीला दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी असेल. परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईपर्यंत नियुक्तीच्या सेवा कोणत्याही वेळी, कोणतीही नोटीस न देता किंवा कोणतेही कारण न देता समाप्त केल्या जातील.
- उमेदवाराने निवड समितीच्या सदस्यांना किंवा उच्च न्यायालयात काम करण्या-या अधिका-यांना/कर्मचा-यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर त्याच्या निवड प्रक्रियेसंबंधी व्यक्तीशः अथवा इतर कोणा मार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला/तिला निवड प्रक्रियेमधून अपात्र ठरविण्यात येईल व यासंबंधी निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
- याद्वारे सुचित करण्यात येते की, निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यावर आवश्यक ते बदल करण्याचा सर्वाधिकार उच्च न्यायालयाच्या अधीन राहील.
- या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.
Bombay High Court Driver bharti 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09.05.2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.