Join Whatsapp Group

Join Telegram Group

BMC recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये पदभरती

पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी… बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) BMC recruitment 2024 (BMC Vacancy 2024) मध्ये  पदभरती… जाणून घ्या संपुर्ण माहिती..

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) BMC jobs 2024 (BMC Recruitment 2024) (BMC Vacancy 2024) (BMC Engineer bharti 2024) (BMC Career 2024) (BMC Bharti 2024) मध्ये इंजिनिअर संवर्गाच्या रिक्त जागांच्या पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 26 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 16 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 16 डिसेंबर, 2024 26 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात  पहा.

BMC Recruitment
BMC Recruitment 2024

📌 महत्वाचे दिनांक 📌 - (BMC Recruitment )
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 26.11.2024 ते 16.12.2024
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 16.12.2024
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक- संकेतस्थळावर स्वतंत्र्यरीत्या प्रसिध्द करण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाणबृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात

अभियंता पदासाठी एकूण –690 पदे BMC recruitment 2004

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 250
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 130
3 दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233
4 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 77

शैक्षणिक अर्हता व अनुभव- Qualification for BMC recruitment 2024

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात शेवटच्या दिनांक 01.11.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व पदांसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • 10वी उत्तीर्ण नंतर
  • सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा   
  • MS-CIT किंवा समतुल्य/संगणक ज्ञान असणे आवश्यक.
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
  • 10वी उत्तीर्ण नंतर
  • यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा  
  • MS-CIT किंवा समतुल्य/ संगणक ज्ञान असणे आवश्यक.
3 दुय्यम अभियंता (स्थापत्य)
  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य   
  • MS-CIT किंवा समतुल्य/ संगणक ज्ञान असणे आवश्यक.
4 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
  • यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी 
  • MS-CIT किंवा समतुल्य/ संगणक ज्ञान असणे आवश्यक.

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा
📑 अभ्यासक्रम – कनिष्ठ अभियंता 📑 👉 पहा 
📑 अभ्यासक्रम – दुय्यम अभियंता 📑 👉 पहा

वयोमर्यादा- BMC recruitment 2024 age limit

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय असावे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 43 वर्षे वय असावे
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादेत 05 वर्षे सुट.
  • अंशकालीन पदवीधर/पदविकाधारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे राहील.
  • दिव्यांग/ अनाथ/खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील.
  • प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच भुकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.

परीक्षा शुल्क (फी)- BMC recruitment 2024 Application Fee –

  • खुलाप्रवर्गासाठी परीक्षा शुल्क –1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 900/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

👉कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/ (यांत्रिकी व विद्युत) अभ्यासक्रम -  BMC Recruitment 2024
BMC JE Exam Pattern
BMC JE Exam Pattern

👉दुय्यम अभियंता (स्थापत्य)/ (यांत्रिकी व विद्युत) अभ्यासक्रम - BMC Recruitment 2024
BMC SE Exam Pattern
BMC SE Exam Pattern

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – BMC recruitment 2024 Salary
Grade Pay Scale (Rs.)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) M 23 -रु.41800-132000 + अनुज्ञेय भत्ते
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) M 23 -रु.41800-132000 + अनुज्ञेय भत्ते
दुय्यम अभियंता (स्थापत्य) M 25 -रु.44900-142400 + अनुज्ञेय भत्ते
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) M 25 -रु.44900-142400 + अनुज्ञेय भत्ते

निवड प्रक्रिया- BMC recruitment 2024

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) संवर्गातील पदाकरीता निवडीचे निकष –
  • वरील पदांकरीता पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल.
  • त्यासाठीचा अभ्यासक्रम/ पॅटर्न आपल्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.
  • सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार तात्पुरती / अंतिम निवडयादी तयार करण्यात येईल.
  • कनिष्ठ अभियंता तसेच दुय्यम अभियंता पदांकरिता घेण्यात येणा-या परीक्षेचा दर्जा भारतातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ब तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदविका / पदवी परीक्षेच्या समान राहील.
  • सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील.
  • प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण बजा करण्यात येतील.
  • मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
  • ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती/ अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल
  • उपरोक्त निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना राहतील.
  • संबंधित विद्यापीठ/संस्थेने पदविका प्रदान करताना विहित केलेले गुण विचारात घेण्यात येतील.
  • ज्या उमेदवारांना पदविका प्रदान करताना विद्यापीठ/संस्था यांनी गुण पध्दती ऐवजी श्रेणी पध्दती वापरली आहे, त्यांच्या बाबतीत मिळालेल्या श्रेणीचे टक्केवारीमध्ये खालीलप्रमाणे रुपांतर करण्यात येईल.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदाकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह इतर राज्यातील मध्यवर्ती शहरांमध्ये घेण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दती- How to Apply for BMC Recruitment 2024

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • एका उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज सादर करता येईल.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरतीकरिता अर्ज करण्याची मुभा राहील. परंतु, एकाच उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेता येणार नाहीत.
  • उमेदवाराने आपला वैध ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्थात नोंदविलेला ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा अपूर्ण असल्यास संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान पाठविल्या जाणा-या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उमेदवाराने ऑनलाईन अर्थात नोंदविलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविण्यात येईल. एखाद्या उमेदवाराचा वैध ई-मेल आयडी नसल्यास त्याने अर्ज नोंदणी करण्यापूर्वी स्वतः या ई-मेल आयडी तयार करणे आवश्यक आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत- BMC Recruitment 2024

अ. अर्ज नोंदणी.

  • ऑनलाईन पध्दतीने करावयाचा अर्ज साठी https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळावर जावे.
  • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता “Click here for new Registration निवडून त्यामध्ये नाव, संपर्काची माहिती व ई-मेल आयडी नमूद करावा, त्यानंतर तात्पुरत्या रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड क्रीनवर दिसेल. उमेदवाराने सदर तात्पुरत्या रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड स्वतःकडे लिहून ठेवावा. तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. उमेदवाराला अर्जात काही दुरुस्ती करावयाची असल्यास तात्पुरत्या रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डचा उपयोग करुन दुरुस्त्या करता येतील.
  • जर उमेदवार एकाच वेळी अर्ज पूर्णपणे भरु शकला नाही तर भरलेली माहिती “SAVE AND NEXT या टॅबचा वापर करून SAVE करता येईल. ऑनलाईन अर्ज SUBMIT करण्यापूर्वी उमेदवाराने “SAVE AND NEXT” या सुविधेचा वापर करून भरलेली माहिती तपासून पहावी व आवश्यकतेनुसार त्यामध्ये दुरुस्ती करावी. अंतिम SUBMIT करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य रितीने भरली असल्याची खात्री करुन घ्यावी. क्षीण दृष्टी असलेल्या उमेदवारांनी विशेष काळजी घेवून ऑनलाईन अर्जात माहिती भरावी व तपासून पहावी.
  • उमेदवाराने स्वतःचे / वडिलांचे / पतीचे नाव तसेच नावांचे स्पेलिंग त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र / गुणपत्रक / ओळखपत्र यांवर नमूद केल्याप्रमाणे भरणे आवश्यक आहे. सदरची माहिती योग्य पध्दतीने न भरल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने भरलेली माहिती तपासण्यासाठी व SAVE करण्यासाठी “Validate your details” आणि “SAVE AND NEXT या मटनांचा वापर करावा,
  • ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचा फोटो व सही अपलोड करण्याची पध्दतीचा तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.
  • “COMPLETE REGISTRATION” टॅवयर क्लिक करण्यापूर्वी “Preview” टॅबवर क्लिक करून संपूर्ण अर्ज तपासून पहावा.
  • आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्यरितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करून “COMPLETE REGISTRATION” बटनवर क्लिक करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी उमेदवाराने सदर अर्जात स्वतःबाबतची माहिती अचूक रितीने भरावी. एकदा “COMPLETE REGISTRATION” बटनावर क्लिक केल्यावर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

ब. परीक्षा शुल्क भरणे.

  • “Payment” बटनावर क्लिक करुन परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
  • त्यानंतर “SUBMIT” बटनावर क्लिक करावे.

क. आवश्यक कागदपत्रे स्कॅन व अपलोड करणे.

  • ऑनलाईन अर्ज भरताना छायाचित्र, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
  • सदर लिंकवर क्लिककरून छायाचित्र, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा उसा व कालिखित घोषणापत्र अपलोड करावे.
  • Browse करून छायाचित्र, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा तसा व घोषणापत्र जेथे save केलेली आहे तेथे जावे.
  • फाईलवर क्लिक करून सिलेक्ट करावे.
  • ‘Open / Upload’ पर क्लिक करावे.
  • फाईलचा आकार आवश्यकतेप्रमाणे नसेल तर error चा message येईल. error चा message आल्यास जाहिरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे फाईलचा आकार आवश्यकतेनुसार adjust करून फाईल पुन्हा अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
  • अपलोड केलेली फाईल preview करून छायाचित्राची गुणवत्ता तपासावी preview मध्ये जर छायाचित्र फिक्कट / अस्पष्ट असेल तर आवश्यक बदलकरून पुन्हा सदर फाईल अपलोड करावी.
  • तुमध्या ऑनलाईन अर्जात जोपर्यंत तुम्ही छायाचित्र, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज स्वीकारला केला जाणार नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना –BMC Recruitment 2024

  • जर अपलोड केलेल्या छायाचित्रामध्ये उमेदवाराचा चेहरा / सही / डाव्या हाताच्या अंगठ्‌याचा ठसा / हस्तलिखित घोषणापत्र अस्पष्ट असेल तर सदर ऑनलाईन अर्ज व उमेदवारी रद्द केली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज submit करण्यापूर्वी अपलोड केलेली फाईल preview करून छायाचित्र, सही, डाव्या हाताच्या अंगव्याचा ठसा व हस्तलिखित धोषणापत्राची गुणवत्ता तपासावी. preview जर फिक्कट / अस्पष्ट असेल तर आवश्यक बदलकरून पुन्हा सदर फाईल अपलोड करावी.
  • ऑनलाईन अर्ज submit करण्यापूर्वी छायाचित्राच्या लिंक पर छायाचित्र, सहीच्या लिंकवर सही साध्या हाताच्या अंगठ्याच्या ठस्याच्या लिंकवर ठत्ता व घोषणापत्राच्या लिंकवर घोषणापत्रच अपलोड झालेले आहे याची खात्री करावी. चुकीच्या लिंकवर चुकीची फाईल अपलोड झाली असल्यास उमेदवाराला ऑनलाईन परीक्षेस बसण्याची परवानगी देता येणार नाही.
  • छायाचित्रामध्ये उमेदवाराचा चेहरा सुस्पष्ट असल्याची खातरजमा करावी.
  • उमेदवाराने फोटोच्या जागी स्वतःचा फोटो अपलोड न केल्यास उमेदवारास ऑनलाईन परीक्षेस बसण्याची परवानगी देता येणार नाही. त्यासाठी स्वतः उमेदवार जबाबदार असेल.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन व परीक्षा शुल्क पूर्ण भरल्यानंतर उमेदवाराने संपूर्ण अर्ज मुद्रण करून (printout) स्वत: जवळ जपून ठेवणे आवश्यक आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहित केलेल्या कालावधीत उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने विहित मुदतीत ऑनलाईन अर्जासोबत परीक्षा शुल्क भरण्याची कार्यवाही करावी जेणेकरुन शेवटच्या क्षणी अडचण येणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयात नियुक्ती करण्यात येईल व त्यांची सेवा महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात बदली योग्य असेल
  • काही अपरिहार्य कारणास्तव ऑनलाईन परीक्षेच्या तारखांमधे बदल करावा लागल्यास, त्याबाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर भरतीप्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत प्रसिध्द करण्यात येईल. सदर भरतीप्रक्रिये संदर्भात लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षेसाठी कोणताही भत्ता अथवा खर्च दिला जाणार नाही
  • उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, सामाजिक व समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणा-या उमेदवारास महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या उमेदवाराने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतु सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याची नोंद असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय ऑनलाईन परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवार ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवारांना काही अडचणीचे निरसन करण्यासाठी हेल्पलाईन क्र. 1800222300/10001034508 या क्रमांकवर संपर्क साधावा तसेच tps://curs.ihes in उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 डिसेंबर, 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment