अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, यांच्या प्रयोगशाळेत विभागाच्या रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) व वरीष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) या संवर्गाच्या एकुण 56 पदांसाठी भरती anna aushadh bharati 2024.
अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) व वरीष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) अशा एकुण 56 रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 22 ऑक्टोबर, 2024 आहे. सविस्तर कृपया माहितासाठी जाहिरात पहा.
एकुण 56 पदे- anna aushadh bharati 2024
अ.क्र. | संवर्ग | वेतनश्रेणी | पद |
1 | रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) | S-14: 38600-122800 | 37 |
2 | वरीष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) | S-13: 35400-112400 | 19 |
शैक्षणिक अर्हता / पात्रता –anna aushadh bharati 2024
- जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 22-10-2024 रोजी शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा भारताचा नागरीक तसेच महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असणे आवश्यक आहे व त्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक राहील. तसेच त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अ.क्र. | संवर्ग | शैक्षणिक अर्हता | अनुभव |
1 | रसायन शास्त्रज्ञ (गट-ब)
Analytical Chemist |
OR |
अनुभवाची आवश्यकता नाही |
|
अशी पदवी प्राप्त केल्यानंतर 18 महिन्यांचा औषधी द्रव्ये विश्लेषणाचा अनुभव. | ||
2 | वरीष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)
Senior Technical Assistant |
|
— |
वयोमर्यादा- anna aushadh bharati 2024
- किमान वय 18 वर्षे व कमाल अमागास वर्ग साठी 38 वर्षे व मागासवर्गासाठी 43 वर्षे.
- दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे
- खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
- प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
Important link | |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) -अभ्यासक्रम | येथे क्लिक करा |
वरीष्ठ तांत्रिक सहायक, गट- क- अभ्यासक्रम |
येथे क्लिक करा |
परीक्षा शुल्क (फी)-anna aushadh bharati 2024
- खुला प्रवर्ग- रु.1000/-
- मागास प्रवर्ग- रु.900/-
- माजी सैनिकांना परीक्षा शुक्ल (फि) आकारली जाणार नाही.
अर्ज भरण्याबाबत सूचना – anna aushadh bharati 2024
- नोंदणी / नवीन खाते निर्माण करणे.
- प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
- अर्ज सादरीकरण.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.
- छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे
- अर्जाची प्रिंटआऊट काढणे.
ऑनलाईन परीक्षा सुचना –
- रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) (अराजपत्रित) तसेच वरीष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) या दोन्ही संवर्गासाठी ऑनलाईन परीक्षा एकूण २०० गुणांची (प्रत्येकी २ गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे १०० प्रश्न) घेतली जाईल.
- तांत्रिक प्रश्नांसाठी ८० गुण व मराठी +इंग्रजी +सामान्यज्ञान + बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास ३० गुण याप्रमाणे १२० गुणांची (असे एकुण २०० गुणांची) परीक्षा घेण्यात येईल.
- सदर ऑनलाईन परीक्षा ही निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेशी संबंधित अभ्यासक्रमावर आधारित २ तासांची असेल.
- प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
- बहुपर्यायी प्रश्रांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा.
- परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून अंतिम शिफारस / निवडसूची तयार केली जाईल.
- सदरहु ऑनलाईन परीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा केंद्र येथे केले जाईल.
अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचनाः- anna aushadh bharati 2024
- उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार असल्यामुळे अर्ज भरतांना /सादर करताना, शैक्षणिक प्रमाणपत्रे / अन्य आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
- ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी
- जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच त्यासंदर्भातील वैध प्रमाणत्रांच्या मूळ प्रतीच्या Scan Images अपलोड कराव्यात.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रुपरेषा / वेळापत्रक / परीक्षाकेंद्र / बैठक क्रमांक इ. बाबतची माहिती वर दिलेल्या संकेतत्त्थळावर उपलब्ध राहिल.
- उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- वरिष्ठ तांत्रिक सहायक/ विश्लेषण रसायन शास्रज्ञ या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोणत्याही अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेमध्ये नियुक्ती देण्यात येईल.