आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक Aadivasi Vikas Vibhag 2024 यांच्या अंतर्गत नाशिक/ ठाणे/ अमरावती/ नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध सवंर्गाच्या एकुण जागा 612 पदांची सरळसेवेने पदभरती (मुदतवाढ)
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक Aadivasi vikas vibhag 2024 ह्यांच्या अंतर्गत नाशिक / ठाणे / अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवर वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/ लघुटंकलेखक / गृहपाल स्त्री/ गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक संवर्गातील भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 02 नोव्हेंबर 2024 12 नोव्हेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया जाहिरात पहा. (मुदतवाढ)
Aadivasi vikas vibhag 2024 ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12.10.2024 पासुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अ.क्र. | विभाग | पदे |
१ | आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक विभाग | 17 |
२ | अपर आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक विभाग | 178 |
३ | अपर आयुक्त आदिवासी विभाग, ठाणे विभाग | 189 |
४ | अपर आयुक्त आदिवासी विभाग, अमरावती विभाग | 112 |
५ | अपर आयुक्त आदिवासी विभाग, नागपूर विभाग | 115 |
एकुण पदे | 612 |
वयोमर्यादा- Aadivasi vikas vibhag 2024
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.11.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
- किमान वय 18 वर्षे व कमाल अमागास वर्ग साठी 38 वर्षे व मागासवर्गासाठी 43 वर्षे.
- दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
- अनाथ उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे.
शैक्षणिक पात्रता- Educational Qualification-Aadivasi vikas vibhag 2024
- सर्व पदांच्या शैक्षणिक पात्रेतासाठी कृपया सविस्तर जाहिरात पहा.
- सर्व पदांकरीता दिनांक 01.11.2024 रोजी विहित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा भारतीय नागरीक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
निवड पध्दती-Aadivasi vikas vibhag 2024
- सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल, परीक्षा जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
- संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुमक्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
- ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवुन एकूण 200 गुणांची असेल.
- परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
Important link | |
जाहिरात (Notification) | पहा |
शुध्दीपत्रक | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |
परीक्षा शुल्क (फी)- Aadivasi vikas vibhag 2024
- खुला प्रवर्ग- रु.1000/-
- मागास प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग/ माजी सैनिक – रु.900/-
- उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क् (फी ) भरणे बंधनकारक आहे.
अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
सर्वसाधारण सुचना:- Aadivasi vikas vibhag 2024
- अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ- https://tribal.maharashtra.gov.in असा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 12.10.2024 पासून ते दिनांक 12.11.2024 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
- ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकाल https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- USERNAME आणि PASSWORD जतन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
- उमेदवारांने नोंदणी प्रकियेसाठी स्वत:चा वैध ईमेल आयडीचा वापर करावा, अन्य व्यक्तींचा ईमेल आयडी वापर करू नये.
- उमेदवारास अर्ज करतांना अपर आयुक्त, नाशिक / अमरावती ठाणे व नागपुर या बार अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी समान पदनामाच्या पदाकरिता कोणत्याही एकाच अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील.
- अर्ज सादर करण्याची पध्दती व सुचना, आवश्यक असणारी कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी, Declaration form, यांचे सविस्तर सुचना जाहिरातीमध्ये नमूद असल्याने जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन उमेदवारांनी करावे जेणेकरून अर्ज सादर करतांना त्यांना अडचणी येणार नाही.
भरती प्रक्रियेबाबत संपर्क-
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना काही अडचणी आल्यास उमेदवारांनी https://cgrs.ibps.in या लिंक वर किंवा 1800 222 366/ 1800 103 4566 या हेल्पलाईन वर संपर्क करावा.
- उमेदवारांना आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रियेबाबत संपर्क साधण्यासाठी टोल फ्री नंबर 1800 267 0007 वर संपर्क साधावा.