Join Whatsapp Group

Join Telegram Group

North Western Rail Bharti 2024 उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये पदभरती

उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये North Western Rail Bharti 2024 विविध विभागातील विविध पदांच्या एकुण 1791 जागांची पदभरती.

उत्तर पश्चिम रेल्वे विभागामध्ये North Western Rail Bharti 2024 विविध विभागातील विविध  पदांच्या एकुण 1791 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून उत्तर पश्चिम रेल्वे विभागाच्या https://rrcactapp.in/  या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिनांक 06 नोव्हेंबर, 2024 पासून ते दिनांक 10 डिसेंबर, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 10 डिसेंबर, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

North Western Rail Bharti 2024
North Western Rail Bharti 2024

विभागानूसार एकूण – 1791 पदे how many vacancies in North Western Rail Bharti 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 Divisional Railway Manager’s Office, Ajmer 440
2 Divisional Railway Manager’s Office, Bikaner 482
3 Divisional Railway Manager’s Office, Jaipur 532
4 Divisional Railway Manager’s Office, Jodhpur 67
5 B.T.C. Carriage, Ajmer 29
6 B.T.C. LOCO, Ajmer 69
7 Carriage Works Shop, Bikaner 32
8 Carriage Works Shop, Jodhpur 70

शैक्षणिक अर्हता व अनुभव- North Western Rail Bharti 2024

  • सदर जाहिरातील नमूद सर्व पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांक 06.11.2004 रोजी पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • नमूद सर्व पदांसाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
  • 10वी उत्तीर्ण -किमान 50% गुणांसह
  • ITI (NCVT / SCVT) (Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Diesel Mechanic / Welder / M.M.T.M./ Technician/Mechanist)

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

🔗Important link🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा-North Western Rail Bharti 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 10.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • सर्व पदांसाठी किमान 15वर्षे ते कमाल वय 24 वर्षे
  • (SC-ST-माजी सैनिक साठी 05 वर्षे सुट/ OBC साठी 03 वर्षे सुट)
  • PwBD / Ex.Serv. साठी 10 वर्षे सुट.

परीक्षा शुल्क (फी)-North Western Rail Bharti 2024

  • अमागासवर्ग / OBC/ EWS साठी – रु.100/-
  • SC/ST / PwBD/ महिलांसाठी परीक्षा शुल्कात सूट आहे. (फी लागू नाही)
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

North Western Rail Bharti 2024
North Western Rail Bharti 2024

अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…

अर्ज कसा करावा – How to apply for North Western Rail Bharti 2024

  • वर नमूद केलेल्या दोन्ही पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी https://rrcactapp.in/ वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या RRC/जयपूर वेबसाइट https://rrcactapp.in/ वर लॉग इन करणे आवश्यक आहे आणि वैयक्तिक संपुर्ण तपशील/BIO डेटा काळजीपूर्वक भरा.
  • नोंदणीच्या वेळी उमेदवारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवारांना 12 अंकी आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल. दस्तऐवज पडताळणीच्या वेळी उमेदवारांना मूळ आधार कार्ड किंवा वर नमूद केलेले दस्तऐवज सादर करावे लागतील.
  • उमेदवारांनी आपले नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख मॅट्रिक किंवा समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवल्याप्रमाणे जुळत असल्याची खात्री करावी. दस्तऐवज पडताळणी दरम्यान कोणतेही विसंगती आढळल्यास उमेदवारी रद्द होईल
  • उमेदवारांना त्यांचा सक्रिय मोबाइल क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी ऑनलाइन अर्जामध्ये सूचित करणे अत्यावश्यक आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान त्यांना सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण सर्व महत्त्वाचे संदेश ईमेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील.
  • उमेदवारांनी कोणत्याही एका विभाग/युनिटसाठी एकच अर्ज करावा.
  • भिन्न अर्जांसह एकापेक्षा जास्त अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करणारे उमेदवारांचे अर्ज सरसकट नाकारले जातील
  • उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआउट जपून ठेवावी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सदर प्रिंट आऊटची प्रत माहितीसाठी उपयोगात येईल.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आणि प्रिंटिंगमध्ये कोणत्याही समस्या असल्यास, वेबसाइटवर दिलेला हेल्पलाइन नंबरवर 10.11.2024 पासून सकाळी 10:00 ते 17:00  च्या दरम्यान कॉल करा. हेल्पलाईन नंबर साठी👉येथे क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज सादर करताना, प्रत्येक अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक जारी केला जाईल. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक जपून ठेवण्याचा/नोंद ठेवणे आवश्यक आहे.
  • शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी, उमेदवारांना त्यांच्या स्वत: च्या हितासाठी सल्ला दिला जातो की त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज सबमिट करावा, इंटरनेटवरील जास्त लोडमुळे किंवा RRC च्या वेबसाइटवर लॉग इन करण्यात संभाव्य अक्षमता/अयशस्वी टाळण्यासाठी किंवा शेवटच्या दिवसात वेबसाइट ठप्प होण्या आधी कृपया आपला अर्ज सादर करावा.
  • वरील कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उमेदवार शेवटच्या दिवसात अर्ज सादर करू शकत नसल्याची कोणतीही जबाबदारी RRC स्वीकारणार नाही.

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना- North Western Rail Bharti 2024

  • पात्रता, अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत यासंबंधी सर्व बाबींमध्ये रेल्वे प्रशासनाचा निर्णय अंतिम असेल
  • रेल्वेमध्ये प्रशिक्षण देण्याचे उमेदवारांना कोणतेही अधिकार दिले जाणार नाहीत
  • रेल्वेमध्ये प्रशिक्षण दिल्याने उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेमध्ये सामावून घेण्याचा कोणताही अधिकार मिळणार नाही.
  • भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्जा व्यतिरीक्त कोणताही पत्रव्यवहार करू नये.
  • उमेदवाराची उमेदवारी पडताळणीसाठी आवश्यक मूळ/ प्रशस्तिपत्रे/ कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्यास किंवा इतर कोणतीही तफावत आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्जदाराने चुकीची/बनावट प्रमाणपत्रे/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतरही त्याला कोणत्याही टप्प्यावर सूचना न देता सेवामुक्त करण्याचा अधिकार रेल्वे प्रशासन राखून ठेवते.
  • निवडलेल्या किंवा बोलावलेल्या उमेदवारांना उत्तर पाठवण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेत नाही. सबमिट केलेल्या अर्जाच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार विचार केला जाणार नाही किंवा कार्यालयाकडून कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला उत्तर दिले जाणार नाही.
  • ज्या उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल त्यांना कोणताही दैनिक भत्ता/वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांना कोणत्याही अर्जाचे प्रिंटआउट किंवा प्रमाणपत्रे किंवा प्रती पोस्टाने RRC कडे पाठवण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या बळावरच उमेदवारांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल.
  • सहभागासाठी निवड झाल्यानंतर, विभाग/युनिट/व्यापार बदलण्याच्या उमेदवाराच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment