नोकरीची सुवर्णसंधी… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड GMC Nanded Bharti 2025 मध्ये पदभरती… आजच अर्ज करा…जाणुन घ्या संपुर्ण माहिती…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड GMC Nanded Bharti 2025 (GMC Nanded Recruitment 2025) GMC Nanded Career 2025 (GMC Nanded Job 2025) (GMC Nanded Vacancy 2025) (GMC Nanded Group – D Job 2025) (GMC Nanded Group – D Bharti 2025) (GMC Nanded Group – D Recruitment 2025) गट – ड (वर्ग 4) (सर्व संवर्ग/ प्रयोगशाळा परिचर) या पदाच्या एकुण 86 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेडच्या www.drscgmcnanded.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 26 एप्रिल, 2025 पासून ते 16 मे, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 16 मे, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

📌 महत्वाचे दिनांक 📌 - GMC Nanded Bharti 2025
- 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 26.04.2025 ते 16.05.2025
- 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 16.05.2025
- 📃परीक्षेचा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
- 📝मुलाखत/कागदपत्र पडताळणी दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
- 📍नोकरी ठिकाण – नांदेड
एकूण – 86 पदे GMC Nanded Bharti 2025
अ.क्र. |
पदांचे नांव |
पदे |
1 | गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग | 79 |
2 | गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर | 17 |
महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक अर्हता व अनुभव- Education Qualification of GMC Nanded Bharti 2025
- सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात नमूद दिनांक 24.05.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- वरील पदांसाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. | पदांचे नांव | शैक्षणिक अर्हता |
1 | गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग/ प्रयोगशाळा परिचर |
|
महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
🔗 Important link 🔗 | |
📑 जाहिरात (Notification) 📑 | 👉 येथे क्लिक करा |
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 | 👉 येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 | 👉 येथे क्लिक करा |
वयोमर्यादा- GMC Nanded Bharti 2025
- जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरातीस नमूद दिनाक 24.04.2025 या दिनांकास गणण्यात येणार आहे.
- अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 38 वर्षे वय असावे.
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल 43 वर्षे वय असावे
- माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे.
- अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे राहील.
- दिव्यांग कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
- प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच भुकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील.
- खेळाडू तसेच अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील.
परीक्षा शुल्क (फी)- GMC Nanded Bharti 2025
- खुलाप्रवर्गासाठी परीक्षा शुल्क –1000/-
- मागासवर्गीय तसेच अनाथ प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – 900/-
- माजी सैनिक साठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
- टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.
✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या…
वेतनश्रेणी (सैलरी) – GMC Nanded Bharti 2025Salary
अ.क्र. | पदांचे नाव | वेतनश्रेणी |
1 | गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग | S-1 : 15,000-47,600 |
2 | गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर | S-6 : 19,900-63,200 |
परीक्षेचे स्वरूप – GMC Nanded Bharti 2025
अ.क्र | पदाचे नाव | मराठी | इंग्रजी | सामान्य ज्ञान | बौध्दिक चाचणी/ अंकगणित | एकुण गुण | |||||
प्रश्न | गुण | प्रश्न | गुण | प्रश्न | गुण | प्रश्न | गुण | प्रश्न | गुण | ||
1 | गट – ड (वर्ग 4)
समकक्ष पदे |
25 | 50 | 25 | 50 | 25 | 50 | 25 | 50 | 100 | 200 |
- परीक्षा कलावती २ तास (१२० मिनिटे)
- परीक्षा ही ऑनलाईन (COMPUTER BASED TEST) पध्दतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागा कडील शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२ प्र.क्र १४ का १३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदी नुसार गट ड (वर्ग-४) समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) हि कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी. परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्रपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (एस.एस.सी) व्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बोध्दीक चाचणी या विषयावर प्रश्रा करीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
- शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का १३-अ दि ४ मे २०२२ मधील तरतुदी नुसार या पदां करीता गौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.
- उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०१७/प्र.क्र.३१/९८/१६-अ दि. १६/०३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण ११९९/प्र.क्र.३९/१६ अ दि.१९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का १३ दि ४ मे २०२२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रालिनं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदी नुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिनं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मध्ये नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
- परीक्षा ही Computer Based Test ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्यावे समानीकरण करणेचे (Normalization) पब्दतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल (Normalization) TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षाधी यांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :- GMC Nanded Bharti 2025
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील,
- अर्ज सादर करण्या करीता संकेतस्थळ- www.drscgmcnanded.in
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सुचना www.drscgmcnanded.inया अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्या शिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही
- अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणका मार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला य वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीत व अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील
केंद्र निवड:- GMC Nanded Bharti 2025
- प्रस्तुत परिक्षे करीता परीक्षा केंद्राचा तपशील www.drscgmcnanded.in संकेत स्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पध्दती या सदरा मध्ये उपलब्ध आहे.
- परीक्षा केंद्र बदला बाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही
- माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
- परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
- अर्ज सादरीकरणाचे टप्प्ये पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणा-या submit बटनावर क्लिक केल्यानंतर pay fees या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुखपृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील fees not paid अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहीरात/पद/परीक्षे समोरील pay now या लिंकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल,
- परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यामातून क्रेडिट कार्ड, डेबिट कॉर्ट, अथवा नेटबैंकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
- परीक्षा शुल्काचा भरणा करताना बैंक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा भरणा यशस्वीपणे झाला (payment successful) असल्याचा संदेश ऑनलॉईन अर्ज प्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्या शिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्या शिवाय संकेतस्थळा वरील संबंधीत पृष्ठावरुन आणि/ अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.
- परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्यांच्या प्रोफाईल मध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे स्थिती (status) लगेचच अवगत होईल, खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे मरले असल्या बाबत व बँकेकडून व्यवहार (TRANSACTION) पुर्ण झाला असल्या बाबतव खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.
- परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहीत दिनांक/विहीत वेळे पूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारीची दखल घतली जाणार नाही विहीत मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकणा-या उमेदवारांचा संबंधीत भरती प्रक्रिये करीता विचार केला जाणार नाही.
निवड सूचीची कालमर्यादा – GMC Nanded Bharti 2025
- निवड समितीने तयार केलेली निवड सूची १ वर्षांसाठी किंया निवड सुची तयार करताना ज्या दिनांकापर्यतची स्थित पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, या पैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधी ग्राहय राहील. तद्नंतर ही निबढ सुची व्यपगत होईल भरती प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरत्ती प्रक्रिया निवड सूची प्रतिज्ञा सुधी इत्यादीचे अनुषंगाने दिलेले निर्देश तथा सुचना किया सुधारणा यथास्थितीत लागु राहतील.
- निवड समितीने तयार केलेल्या निवड सुचीमधुन ज्येष्ठते नुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्या नंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजु न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी नुसार, किंवा जात प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची अनुपलब्धता अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्या नंतर नजिकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याच्या मृत्यु झाल्याने पद रिक्त झाल्यास, अशी पदे त्या-त्या प्रवर्गाच्या निवड सुचीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारां मधुन निवड सुचीच्या कालमयदित वरिष्ठते नुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील तथापी, भरती प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवड सुधी, प्रतिक्षा सुची इत्यादीचे अनुषंगाने दिलेले निर्देश तथा सुचना किया सुधारणा यथास्थितीत लागू राहतील.
परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र – GMC Nanded Bharti 2025
- परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेत स्थळावर www.drscgmcnanded.in उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे १० दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल, त्याची प्रत परीक्षक्षेपूर्वी डाऊनलोड करून प्रिंट काढून परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वताचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्या शिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमुद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल, या बाबतची घोषणा कार्यालयाच्या संकेत स्थळावर परीक्षेपूर्वी एक आठवडा आगोदर प्रसिध्द करण्यात येईल.
- परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह संबंधित कार्यालयाच्या मदत कक्षाकडे संपर्क साधावा.
- परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वताचे आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोचत आणणे अनिवार्य आहे.
- आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेत स्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार पर उमेदवारांचे नांव, पत्ता, लिंग, फोटो, जन्म दिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
- नावा मध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावांत बदल झाल्या संबंधी अधिसुचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या कडुन नावात बदल झाल्या संबंचिचा दाखला व त्याची व छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- संबंधीत परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रावर नमुद केलेल्या अटी व शतीच्या अधीन राहुल उमेदवारांना परीक्षोच्या उपस्थितीसाठी पात्र समजण्यात येईल तथापि, परीक्षा शुरू होण्या पूर्वी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळे पुर्वी २ तास अगोदर ओळख तपासणीची पुर्तता करण्यासाठी उपस्थित राहावे लागेल.
- कोणत्याही परिस्थिती मध्ये परीक्षा सुरू झाल्या नंतर उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जणार नाही अशा उमेदवारांना पुनर्परीक्षा देण्याची कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही.
- प्रस्तुत जाहिराती मध्ये परीक्षे संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, क्यो मर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा पध्दती, अभ्यासक्रम इत्यादी बाबतचा सविस्तर तपशीलासाठी संस्थेचे www.drscgmcnanded.in या संकेत स्थळावरील उमेदवारां करीता माहिती विभागातील सुचना अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा या सदरा खालील गट ड (वर्ग-४) समकक्ष संवर्ग परीक्षा मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे.
- संस्थेचे www.drscgmcnanded.in संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/ जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
- सदर जाहिरात संस्थेच्या www.drscgmcnanded.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
GMC Nanded Bharti 2025
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16.05.2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.