Join Whatsapp Group

Join Telegram Group

Latur Anganwadi Helper Bharti 2025 बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) लातूर मध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस पदाची पदभरती…!! जाणुन घ्या संपूर्ण माहिती…!!

महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी… बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) लातूर (Latur) (Latur Anganwadi Helper Bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!!

बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) लातूर (Latur) Latur Anganwadi Helper Bharti 2025 (Latur Anganwadi Recruitment 2025) Latur Anganwadi Job 2025 (Latur Anganwadi Helper Bharti 2025) (Latur Anganwadi Helper Recruitment 2025) लातूर शहर तसेच लातूर जिल्ह्यातील नगर परीषद/ नगरपंचायत प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस या पदाच्या अनुक्रमे एकुण 33 व 06 तसेच जागांची पदभरती करीता पात्र महिला उमेदवारांकडून शासनाच्या www.latur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन फक्त ऑफलाईन पध्दतीने शहरी भागासाठी अर्ज दिनांक 17 एप्रिल, 2025 पासून ते 02 मे, 2025 पर्यतच्या तसेच नगरपंचायत/ नगर परीषद भागासाठी 16 एप्रिल, 2025 पासून ते 30 एप्रिल, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 02 मे, 2025 व 30 एप्रिल, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

Latur Anganwadi Helper Bharti 2025
Latur Anganwadi Helper Bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - Latur Anganwadi Helper Bharti 2025
  • 💻ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी –
    1. लातूर शहर – दिनांक 17.04.2025 ते 02.05.2025
    2. लातूर नगरपालिका कार्यक्षेत्र- दिनांक 16.04.2025 ते 30.04.2025
  • 📃ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 02.05.2025 व 30.04.2025
  • 📍नोकरी ठिकाण – नांदेड शहर/ नांदेड नगरपालिका-नगरपंचायत कार्यक्षेत्र.

एकूण – 39 पदे- Latur Anganwadi Helper Bharti 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
लातूर शहर
1 अंगणवाडी मदतनीस 33
लातूर नगरपालिका-नगरपंचायत
1 अंगणवाडी मदतनीस 06

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- Latur Anganwadi Helper Bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद अंतिम दिनांक पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार महाराष्ट्राचा नागरीक असावा.
  • स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 अंगणवाडी मदतनीस
  • किमान 12 वी उत्तीर्ण

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑

लातूर शहर

लातूर नगरपालिका-नगरपंचायत

 

👉 येथे क्लिक करा

👉 येथे क्लिक करा

🔍  ऑफलाईन अर्ज 🔍

लातूर शहर

लातूर नगरपालिका-नगरपंचायत

 

👉 येथे क्लिक करा

👉 येथे क्लिक करा

🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Latur Anganwadi Helper Bharti 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरातीच्या अंतिम दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील दोन्ही पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 35 वर्षे असावे.
  • विधवा उमेदवारांसाठी कमाय वयोमर्यादा 40 वर्षे राहील.

परीक्षा शुल्क (फी)- Latur Anganwadi Helper Bharti 2025

  • वरील दोन्ही पदासाठी कोणतेही परीक्षा शुल्क (फी) लागू नाही.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – Latur Anganwadi Helper Bharti 2025 Salary

अ.क्र. पदांचे नाव वेतनश्रेणी
2 अंगणवाडी मदतनीस एकत्रित मानधन रु. 7,000/-

अर्ज सादर करण्याचा पत्ता- Latur Anganwadi Helper Bharti 2025 
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर, 
त्रिमुर्ती भवन, उदय पेट्रोलपंप जवळ, बॅक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला,
बार्शी रोड, लातूर- 413 512

अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे/प्रमाणपत्रांची माहिती :- Latur Anganwadi Helper Bharti 2025
  • उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा जोडावे.
  • किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे).
  • बारावीनंतर उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास उदा. पदवीधर, पदव्युत्तरपदवी, डी. एड. बी. एड, एमएससीआयटी किंवा समकक्ष व इतर शैक्षणिक कागदपत्रे सोवत जोडावे.
  • अनुभव विधवा, अनाथ असल्यास सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • गावाचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपूर्ण, अर्जामध्ये खाडा-खोड केलेले, विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जासोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या सक्षम प्राधिका-यांकडून साक्षांकित केलेल्या प्रति नसणे इ. कारणामुळे अर्ज अपात्र ठरविण्यांत येतील व त्याबाबत उमेदवारास स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही.

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना – Latur Anganwadi Helper Bharti 2025
  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शहरी भागासाठी अर्ज दिनांक 17 एप्रिल, 2025 पासून ते 02 मे, 2025 पर्यतच्या तसेच नगरपंचायत/ नगर परीषद भागासाठी 16 एप्रिल, 2025 पासून ते 30 एप्रिल, 2025 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर, त्रिमुर्ती भवन पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला बार्शी रोड, लातूर, यांचे कार्यालयात समक्ष सादर करणे आवश्यक आहे. उपरोक्त नमूद अंतिम दिनांक व कार्यालयीन वेळेनंतर या कार्यालयामार्फत कोणतेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज दाखल करताना उमेदवारांने स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच पोस्टाव्दारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • शैक्षणिक पात्रताः-अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील.अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणारे उमेदवार जर एकापेक्षा अधिक संधीमध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाले असल्यास सर्व गुणपत्रके अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहिले. सर्व गुणपत्रके सादर न केल्यास किमान गुण देण्यात येतील.
  • अर्जदाराने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार (इयत्ता 12 वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, डी.एड, बी.एड व शासकिय मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT) त्यांची साक्षांकित गुणपत्रके व प्रमाणपत्रके . अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
  • वास्तव्याची अट (स्थानिक रहिवाशी)-अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी अर्ज करणारे अर्जदार फक्त लातूर शहर महानगरपालीका,  तसेच लातूर नगर पंचायत/ नगरपरीषद अंतर्गत स्थानिक क्षेत्रातील रहीवाशी असणे बंधनकारक आहे. स्थानिक रहिवाशी बाबत सक्षम प्राधिकारी तह‌सिलदार यांनी अलिकडील काळातील निर्गमित केलेले रहिवाशी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. (विवाहित उमेदवारांनी पतीच्या नावाचे रहिवाशी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.)
  • वयाची अट- अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर नियुक्तीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे अशी राहील. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्षे अशी राहील. अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय दिनांक रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे, विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जासोबत वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (सनद) सादर करणे बंधनकारक राहील.
  • लहान कुटूंबाची अट-अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी लहान कुटूंबाची अट शासन निर्णयाप्रमाणे खालील प्रमाणे लागू राहील.उमेदवाराला दोन हयात अपत्यांपेक्षा अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. जर सदर बाब नियुक्ती नंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल. पुर्वीचे केवळ एकच मूल असेल त्या बाबतीत नंतरच्या एकाच प्रसुतीत जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल.लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र विवाहीत, अविवाहीत, विधवा, परित्यक्ता सर्व महिलांना अनिवार्य आहे. ते सोबत न जोडल्यास उमेदवाराला अपात्र करण्यात येईल.
  • विधवा महिला –अर्जदार विधवा, अनाथ असल्यास त्यांना सुधारीत गुणदान पध्दतीमध्ये शासन निर्णयातील परिशिष्टामधील गुणवत्ता यादी तयार करताना अशा विधवा महिला / अनाथ मुलींना 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचे कडून प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. प्रमाणपत्र असल्यास अतिरिक्त गुण दिले जातील, अन्यथा अतिरिक्त गुण दिले जाणार नाहीत,
  • अनाथ मुली- शासकिय संस्थेत व शासन अनुदानित संस्थेत राहत असलेल्या अनाथ मुली तसेच इतर अनाथ मुली यांनी सक्षम प्राधिकारी विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • विधवा महिला-अर्जासोबत पतीचे मृत्यु प्रमाणपत्र व पुनर्विवाह न केल्याबाबतचे स्वयंघोषणा पत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • मागासवर्गीय उमेदवार असल्यास (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती) त्यांना गुणवत्ता यादी तयार करताना 05 गुण अतिरीक्त देण्यात येतील व उमेदवार विमुक्त जाती । भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग / इतर मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्‌या मागासवर्ग इत्यादी उमेदवारांना 03 अतिरिक्त गुण देण्यात येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकारी / तहसिलदार / सक्षम प्राधिकारी यांचे कडुन निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अन्यथा अतिरिक्त गुण देता येणार नाहीत. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या कार्यालयीन वेळेनंतर कोणतेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत.
  • अनुभव- अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास गुणवत्ता यादी तयार करताना 05 गुण अतिरीक्त देण्यात येतील. (संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मुळ अनुभव प्रमाणपत्र ओडणे बंधनकारक राहील.)
  • भाषेचे ज्ञान- ज्या अंगणवाडी केंद्रासाठी मदतनीसची नियुक्ती करावयाची आहे अशा अंगणवाडी केंद्रामध्ये 50%  पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा (उदा. उर्दू, हिंदी, माडिया, गॉड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा इत्यादी) बोलणारी असतील तर अशा अंगणवाडी केंद्रावर त्या भाषेचे जान असलेल्या (लिहिता व वाचता येणे) तसेच त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. तथापी अशा उमेदवाराने इयत्ता 10 वी अथवा नमुद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
  • या शहरी नागरी प्रकल्पातील 33 रिक्त पदांपैकी अनुक्रमे भागाचे नाव व अंगणवाडी क्रमांक शास्त्रीनगर-44, बरकत नगर-78, आलमपुरा-9, खोरी गल्ली-105, हतेनगर-109, मिस्कीनपूरा-85, नांदगाव वेस-83, तुळजापूरे नगर-74, चौधरी नगर-15, कपील नगर-18, इस्लामपूरा-106, आदमनगर 131, या अंगणवाडया हिंदी आषिक अंगणवाड्‌या असल्यामुळे ज्या उमेदवारांना हिंदी वाचता व लिहीता येते अशाच उमेदवारांची या अंगणवाड्यांवर गुणानुक्रमे निवड करण्यात येईल.
  • तसेच नगरपरीषद/ नगरपंचायत साठी निलंगा, देवणी, जळकोट, अहमदपूर, शिरुर, रेणापूर या अंगणवाडया आहेत.
  • वरील पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अर्जासोबत जोडलेल्याच गुणपत्रकांचा व प्रमाणपत्रांचा विचार केला जाईल. व त्या आधारेच शैक्षणिक व इतर अर्हतेचे गुणांकन ग्राह्य धरले जाईल. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या कार्यालयीन वेळेनंतर कोणतेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत.
  • अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याचे तसेच पद रद्द करण्याचे व कोणत्याही टप्प्यावर अंशतः अथवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर यांनी राखुन ठेवलेले आहेत.
  • विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त न झाल्यास व अर्जावर अर्जदार यांची स्वाक्षरी नसल्यास अपूर्ण व त्रुटी असलेले तसेच अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे नसलेले अर्ज फेटाळण्यात येतील. तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदारांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार नाही. तसेच विहित मुदतीत या कार्यालयास प्राप्त न होणारे अर्ज अपात्र ठरतील. तसेच सदर मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जाबाबत या कार्यालयामार्फत कोणतेही कार्यवाही करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्जासोबत सादर करण्यात येणारी सर्व कागदपत्रे उमेदवाराने सक्षम प्राधिकारी यांचेकडून साक्षांकित अथवा स्वसाक्षांकित करून सादर करावीत.

Latur Anganwadi Helper Bharti 2025
  • अर्ज तसेच कागदपत्रे पाठविण्याची शेवटची दिनांक 02 मे, 2025 व 30 एप्रिल, 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment