Join Whatsapp Group

Join Telegram Group

MPKV Group C-D Bharti 2025 महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मध्ये विविध पदाची पदभरती…!! जाणुन घ्या संपूर्ण माहिती…!!

कृषि विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी… महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी  (Mahatma Phule Krushi Vidyapith) (MPKV Group C-D Bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी  (Mahatma Phule Krushi Vidyapith) MPKV Group C-D Bharti 2025 (MPKV Group C-D Recruitment 2025) MPKV Group C-D Career 2025 (MPKV Group C-D Job 2025) (MPKV Group C-D Vacancy 2025) (MPKV Group C & D Job 2025) (MPKV Group C & D Bharti 2025)  (MPKV Group C & D Recruitment 2025)  विविध संवर्गाच्या विविध पदाच्या एकुण 787 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून विद्यापीठा च्या www.mpkv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 31 डिसेंबर, 2024 पासून ते 30 जानेवारी, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 30 जानेवारी, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

MPKV Group C-D Bharti 2025
MPKV Group C-D Bharti 2025

📌 महत्वाचे दिनांक 📌 - MPKV Group C-D Bharti 2025
  • 💻ऑफलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 31.12.2024 ते 30.01.2025
  • 📃ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 30.01.2025
  • 📝 परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
  • 📝मुलाखत/कागदपत्र पडताळणी दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी 

एकूण – 787 पदे- MPKV Group C-D Bharti 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 वरिष्ठ लिपिक 21
2 लघुटंकलेखक 03
3 लिपिक-नि-टंकलेखक 40
4 प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय) 03
5 निर्गमन सहायक (ग्रंथालय) 02
6 कृषी सहाय्यक 45
7 पशुधन पर्यवेक्षक 02
8 कनिष्ठ संशोधन सहाय्यक 62
9 सहाय्यक (संगणक) 01
10 आरेखक 02
11 अनुरेखक 04
12 वरीष्ठ यांत्रिक 02
13 तांत्रिक सहाय्यक 01
14 प्रक्षेत्र यांत्रिक 02
15 जोडारी (फिटर) 02
16 ओतारी (फाउंड्रीमन) 02
17 दृकश्राव्य चालक 02
18 तारतंत्री (वायरमन) 08
19 मिश्रक (पशुवैद्यकीय) 01
20 छायाचित्रकार 03
21 सहायक सुरक्षा अधिकारी 02
22 प्लंबर 02
23 मिस्तरी 04
24 जुळणीकार (कंपोझिटर) 01
25 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 03
26 वाहन चालक 14
27 कृषि यंत्र चालक 06
28 संगणक चालक 01
गट-ड
1 प्रयोगशाळा परीचर 07
2 ग्रंथालय परिचर 03
3 गणक 24
4 गवंडी 02
5 माळी 23
6 सुरक्षा रक्षक 06
7 प्रयोगशाळा सेवक/नोकर/पाल 02
8 शिपाई 60
9 पहारेकरी 54
10 मजूर 365

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- MPKV Group C-D Bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 31.12.2024 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. संवर्ग पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 गट-क वरिष्ठ लिपिक, स्टेनो टायपिस्ट, लिपिक-सह-टायपिस्ट, मुख्य कॅटलॉगर (लायब्ररी), इश्यू असिस्टंट (लायब्ररी), कृषी सहाय्यक, थेट स्टॉक पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, सहाय्यक (संगणक), ड्राफ्ट्समन, ट्रेसर, वरिष्ठ मेकॅनिक, तांत्रिक सहाय्यक, फार्म मेकॅनिक, फिटर, फाउंड्रीमन, ऑडिओ-व्हिज्युअल ऑपरेटर, वायरमन, कंपाउंडर (पशुवैद्यक), छायाचित्रकार, सहायक सुरक्षा, प्लंबर, मिस्त्री (सिव्हिल), कंपोझिटर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, ट्रॅक्टर चालक, संगणक ऑपरेटर
  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
2 गट-ड प्रयोगशाळा अटेंडनेट, लायब्ररी अटेंडर, काउंटर, गवंडी, माळी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा सेवक / नोकर / पाल, शिपाई, चौकीदार, मजूर
  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
📑 ऑफलाईन अर्ज 📑 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- MPKV Group C-D Bharti 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 331.12.2024 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • अराखीव उमेदवारांसाठी वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
  • मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे असावे.
  • प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादा 38/43 वर्षे.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे.
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे.

परीक्षा शुल्क (फी)- MPKV Group C-D Bharti 2025

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता- रु. 1000/-
  • राखीव प्रवर्गातील (मागासवर्ग/आ.दु.घ./ अनाथ) उमेदवारांकरीता- रु. 900/-
  • धनाकर्ष (DD) – नियंत्रक,महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या नावाने काढावा.

✅ अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – MPKV Group C-D Bharti 2025 Salary
अ.क्र. पदांचे नांव वेतनश्रेणी
गट-क संवर्गातील पदे MPKV Group C-D Bharti 2025
1 वरिष्ठ लिपिक S- 8 : 25500-81100
2 लघुटंकलेखक S- 8 : 25500-81100
3 लिपिक-नि-टंकलेखक S- 6 : 19900-63200
4 प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय) S- 10 : 29200-92300
5 निर्गमन सहायक (ग्रंथालय) S- 7 : 21700-69100
6 कृषी सहाय्यक S- 8 : 25500-81100
7 पशुधन पर्यवेक्षक S- 8 : 25500-81100
8 कनिष्ठ संशोधन सहाय्यक S- 13 : 35400-112400
9 सहाय्यक (संगणक) S- 8 : 25500-81100
10 आरेखक S- 10 : 29200-92300
11 अनुरेखक S- 7 : 21700-69100
12 वरीष्ठ यांत्रिक S- 8 : 25500-81100
13 तांत्रिक सहाय्यक S- 10 : 29200-92300
14 प्रक्षेत्र यांत्रिक S- 8 : 25500-81100
15 जोडारी (फिटर) S- 8 : 25500-81100
16 ओतारी (फाउंड्रीमन) S- 8 : 25500-81100
17 दृकश्राव्य चालक S- 8 : 25500-81100
18 तारतंत्री (वायरमन) S- 8 : 25500-81100
19 मिश्रक (पशुवैद्यकीय) S- 8 : 25500-81100
20 छायाचित्रकार S- 10 : 29200-92300
21 सहायक सुरक्षा अधिकारी S- 10 : 29200-92300
22 प्लंबर S- 6 : 19900-63200
23 मिस्तरी S- 6 : 19900-63200
24 जुळणीकार (कंपोझिटर) S- 7 : 21700-69100
25 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) S- 8 : 25500-81100
26 वाहन चालक S- 6 : 19900-63200
27 कृषि यंत्र चालक S- 7 : 21700-69100
28 संगणक चालक S- 13 : 35400-112400
गट-ड संवर्गातील पदे MPKV Group C-D Bharti 2025
1 प्रयोगशाळा परीचर S- 6 : 19900-63200
2 ग्रंथालय परिचर S- 6 : 19900-63200
3 गणक S- 3 : 16600-52400
4 गवंडी S- 3 : 16600-52400
5 माळी S- 5 : 18000-56900
6 सुरक्षा रक्षक S- 1 : 15000-47600
7 प्रयोगशाळा सेवक/नोकर/पाल S- 1 : 15000-47600
8 शिपाई S- 1 : 15000-47600
9 पहारेकरी S- 1 : 15000-47600
10 मजूर S- 1 : 15000-47600

अर्ज पाठविण्याचा पत्ता- MPKV Group C-D Bharti 2025

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी

मध्यवर्ती परीसर, प्रशासकीय इमारत, ता. राहुरी

जिल्हा. अहिल्यानगर – 413 722

  • MPKV Group C-D Bharti 2025- परीक्षा / भरती प्रक्रिया शुल्क नियंत्रक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, यांचे नावे डिमांड ड्राप्ट (धनाकर्ष) स्टेट बँक ऑफ इंडिया, (शाखा कोड क्रंमाक – ३२३९) (आयएफएस कोड क्र. एसबीआयएन ०००३२३९) (IFS Code: SBIN0003239) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या शाखेवर काढलेला असावा.
  • ज्या मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी जाहिरात केलेल्या पदास अर्ज करावयाचा असल्यास अशा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गासाठी निर्धारित केलेले शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदाकरिता वेगवेगळा अर्ज करावा लागेल, तसेच, त्याकरिता वेगवेगळे शुल्क भरणा करणे आवश्यक आहे. सदरचे शुल्क ना परतावा (Non Refundabale) आहे.
  • माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारांनी परीक्षा / भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यासाठी माजी सैनिक उमेदवारांनी सैनिकी सेवेचा कालावधी पूर्ण केल्याचे कार्यमुक्त प्रमाणपत्रांची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. तसेच, अनाथ उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

परीक्षा पध्दती / परीक्षेचे स्वरुप :- MPKV Group C-D Bharti 2025

  • लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहीत करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न स्वरुपाचा नसेल.
  • ज्या पदांकरिता पदयौ ही कमीतकमी अर्हता आहे. अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहिल.
  • शासन निर्णय दिनांक ०४ मे, २०२२ अन्वये गट-क व गट-ड मधील संबंधित पदांकरीता उमेदवारांची निवड करतांना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेकरिता अपंग उमेदवारांना नियमित वेळेपेक्षा अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात येईल, सदर परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणा-या उमेदवारांमधुन निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
  • ज्या पदांसाठी शारिरिक चाचणी (Physical Test) किंवा व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक असेल, अशा पदांसाठी मराठी, इंप्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ३० गुण ठेवून एकूण १२० गुणांची (एकूण ६० प्रश्न) लेखी परीक्षा व ८० गुणांची शारिरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि, जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील, अशा उमेदवारांनाच शारिरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी देता येईल, लेखी परीक्षा व शारिरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
  • शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी, आवश्यक तेथे शारिरिक क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवारांची निवड करताना ६० गुर्गाची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे ४० गुणांची शारिरिक क्षमतेची चाचणी घेऊन यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. ज्या पदांसाठी शारिरिक क्षमतेची चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पदांसाठी १०० गुणांची व्यावसायिक चाचणी घेऊन यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.
  • वरील प्रमाणे कार्यवाही करताना गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकुण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल.
  • जाहिरातीमधील गट-ड संवर्गातील अ.क्र.०४,०५,०६,०९ व १० पदांकरिता शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२१६/(प्र.क्र.६५/१६/१३- दिनांक १३ जून २०१८ मधील ८(१) नुसार अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास तितक्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेणे शक्य /व्यवहार्य नसेल तेव्हा उमेदवारांची संख्या मर्यादित होण्याकरिता व अधिक सक्षम उमेदवार उपलब्ध होण्याकरिता अशा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात येईल. अशा परीक्षेतील प्रश्नाचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरुपाची असेल.

अर्ज करण्याची पध्दत :- MPKV Group C-D Bharti 2025

  • प्रस्तुत पदाकरिता फक्त ऑफलाईन पध्द‌तीने अर्ज स्विकारण्यात येतील.
  • उमेदवार एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकतील, तथापि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे व विहीत शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • ऑफलाईन परीक्षेचा निकाल ऑफलाईन परीक्षेचा निकाल व पात्र/अपात्र याद्या विद्यापीठाच्या mpky.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • कागदपत्रे तपासणी : लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल, कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील, जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील असे उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरतील.
  • व्यावसायिक / शारिरिक चाचणी – लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केले आहेत, अशा पात्र उमेदवारांची निवड समिती कडून ठरविलेल्या तारखेनुसार ८० गुणांची व्यावसायिक / शारिरिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक / शारिरिक चाचणीची तारीख जाहीर / कळविण्यात येईल. सदर तारखेस उमेदवाराने स्वः खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहिर करणे-  लेखी परीक्षा व व्यावसायिक / शारीरिक चाचणी यामधील गुण एकत्रित करुन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/१३-अ, दिनांक ०४/०५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील तरतुदीनुसार तयार करण्यात येईल.

निवड यादीची कालमर्यादा :- MPKV Group C-D Bharti 2025

  • निवड समितीने तयार केलेली निवडसूची ०१ (एक) वर्षासाठी किंवा पुढील सर्वसाधारण / नियमित जाहिरात प्रसिध्द करण्याचा दिनांक यापैकी जी कालावधी आधिचा असेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राहय राहील.
  • निवड समितीने तयार केलेल्या निवडसूची मधील ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहीत मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार किया जात प्रमाणपत्र / अन्य आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता / अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजिकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास, अशी पदे त्या त्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून (प्रतिक्षा यादीतील) ज्येष्ठतेनुसार उत्तरत्या क्रमाने भरण्यात येतील. मात्र अशी कार्यवाही निवडसूचीच्या कालमयदित करण्यात येईल.

सर्व पदांसाठी उमेदवारांना सूचना/अटी /शती :- MPKV Group C-D Bharti 2025

  • अर्जदाराने सोबतच्या विहीत नमुन्यामध्ये अर्ज संगणकावर टंकलिखीत करुन आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती व शुल्कासह मुदतीत सादर करावा. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा तसेच अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • प्रकल्पग्रस्त अर्जदार हा मुळ खातेदाराचा नातु / पणतु असल्यास अशा उमेदवाराने / अर्जदाराने वंशावळी बाबतचे रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्याबाबत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी, यांचेकडील विहीत नमुन्यातील वैध प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. ज्या उमेदवारांचे प्रकल्पास्त प्रमाणपत्र यापूर्वीच अवैध ठरविण्यात आलेले आहेत, अशा उमेदवारांनी अर्ज सादर करु नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते अपात्र ठरविण्यात येतील.
  • विद्यापीठाकरिता संपादित झालेल्या संपूर्ण जमिनीचा तावा प्रकल्पबाधित कुटुंबियांनी विद्यापीठाकडे दिलेला असल्याचे आणि प्रकल्पबाधित मुळ खातेदाराचे कुटुंबातील अर्जदारा व्यतिरिक्त इतर कोणाही व्यक्ती प्रकल्पग्रस्त म्हणून विद्यापीठामध्ये सेवेत असल्याचे / नसल्याबाबतचे रु. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रामधील माहिती चुकोची अथवा खोटी आढळल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदार दिनांक ३१/१२/२०२४ रोजी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव धारण करित असला पाहिजे तसेच वय, जात इ. माहिती शासनाच्या अधिकृत आधिका-यांनी दिलेल्या विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्राच्या सत्य प्रती अर्जासोबत जोडाव्यात. मुळ प्रमाणपत्रे अर्जासोबत पाठवू नयेत, जे उमेदवार विमुक्त जाती, भटक्या जमाती (अ,ब,क,ड) तसेच इतर मागासवर्गातील, विशेष मागास प्रवर्गातील असतील त्यांनी संपन्न गटातून वगळण्याबाबतचे सन २०२३-२०२४ या वर्षाचे शासनाचे सक्षम अधिका-यांने निर्गमित आवश्यक ते प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मागासवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्रासह संबंधीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास अर्जासोबत जोडावे अथवा जात वैधता प्रमाणपत्र नियुक्ती झालेनंतर सहा महिन्याच्या मुदतीत कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.
  • प्रत्यक्ष पदे भरण्याच्या वेळी परिस्थिती विचारात घेवून एखादे पद किंवा सर्व पदे भरणे / न भरणे तसेच निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांचे नेमणुकी बाबतचे अधिकार विद्यापीठाने राखुन ठेवलेले आहेत. तसेच टपाल विलंबास विद्यापीठ कार्यालय जबाबदार असणार नाही.
  • कोणत्याही पदाकरिता निवडीबाबत अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास संबंधित उमेदवाराची निवड नेमणुकीच्या कोणत्याही टण्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील मुळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र तपासणीच्या वेळो सादर करणे बंधनकारक राहील. प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे मुळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणा-या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल. सदर प्रमाणपत्र पडताळणी अंती प्राप्त होणा-या अहवालानुसार नियुक्ती आदेश देणेबाबत निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल,
  • सामाजिक व समांतर आरक्षण / प्रकल्पग्रस्त आरक्षण संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणे अंतिम निर्णयाच्या अधीन राहुन पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
  • प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी जाहिरात निर्गमित केलेल्या दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • लिपिक-नि-टंकलेखक पदावरील नियुक्ती बाबत मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र सादर करणेबाबत शासन निर्णय संकिर्ण १११४/प्र.क्र.२००/१६-अ दिनांक ०४ सप्टेंबर, २०१५ व दिनांक १३ जानेवारी, २०२३ नुसार कार्यवाही करण्यात येईल.
  • गट-क मधील ज्या पदांना संगणक अर्हता बंधनकारक नाही अशी पदे बगळुन व इतर पदांवर नियुक्त होणा-या सर्व कर्मचारी यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणेबाबत शासन निर्णय १९ मार्च, २००३ नुसार कार्यवाही करण्यात येईल.
  • महिलांसाठी असलेले आरक्षण हे संबंधित सामाजिक प्रवर्गासाठी समांतर राहील. तथापि, संबंधित प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यासाठी आरक्षित असलेली पदे इतरत्र अदलाबदल न करता त्या त्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र ठरणा-या पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील.
  • शासन निर्णय (वित्त विभाग) क्र. अनियो-१००५/१२६/सेवा-४ दिनांक ३१.१०.२००५ नुसार निवड झालेल्या उमेदवारांकरिता निवृत्तो वेतन नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ आणि सध्या अस्तित्वात असलेली भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणार नाही. सदर कर्मचा-यांना शासन निर्णय दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ नुसार नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील.
  • निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांनी अर्जात व अर्जासोवत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी असल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची निवडीची शिफारस नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल, जाहिरातीमधील काही मुद्दे शासन निर्णयाशी विसंगत असल्यास शासन निर्णय अंतिम राहोल.
  • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किवा लेखी सूचना दिली जाणार नाही.
  • भरती प्रक्रिया अंतर्गत परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रिये संदर्भात बाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेणे, पडताळणी अंती अर्ज रद्द ठरविणे, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करणे, उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादीस मान्यता देणे, जाहिरातीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार विद्यापीठ कार्यालयाकडे राहतील.
  • उमेदवारांना लेखी परीक्षा / चाचणी परीक्षा व कागदपत्रे पडताळणी करिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही. तसेच, भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरतील व परीक्षा शुल्क ना-परतावा राहील.
  • मुळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीचे काळजी पूर्वक वाचन करावे, व अर्ज भरण्याची दक्षता स्वतः उमेदवाराने घेणे आवश्यक आहे. चुकीची / खोटी प्रमाणपत्रे सादर करणारा उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) प्रसिध्द करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्पबाधित उमेदवारांनी अर्ज सादर करु नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरविण्यात येतील.

MPKV Group C-D Bharti 2025

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30.01.2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment