Join Whatsapp Group

Join Telegram Group

Gondiadccb Bank Bharti 2025 दि गोदिंया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदाची पदभरती…!! जाणुन घ्या संपूर्ण माहिती…!!

बॅंकेत नोकरीची सुवर्णसंधी… दि गोदिंया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (The  Gondia District Central Co-Operative Bank Ltd.) (Gondiadccb Bank bharti 2025) मध्ये मोठी पदभरती…!!

 दि गोदिंया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (The Gondia District Central Co-Operative Bank Ltd.) Gondiadccb Bank bharti 2025 (Gondiadccb Bank Recruitment 2025) Gondiadccb Bank Career 2025 (Gondiadccb Bank Job 2025) (Gondiadccb Bank Vacancy 2025) (Gondia Bank Job 2025) (Gondia Bank Bharti 2025)  (Gondia Bank Recruitment 2025)  द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक, शिपाई या पदाच्या एकुण 77 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून गोंदिया बँकेच्या https://gondiadccb.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज दिनांक 22 जानेवारी, 2025 पासून ते 30 जानेवारी, 2025 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 30 जानेवारी, 2025 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.

Gondiadccb Bank Bharti 2025
Gondiadccb Bank Bharti 2025

📌महत्वाचे दिनांक 📌 - Gondiadccb Bank Bharti 2025
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 22.01.2025 ते 30.01.2025
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 30.01.2025
  • 📝 ऑनलाईन परीक्षा दिनांक – नंतर कळविण्यात येईल.
  • 📝मुलाखत/कागदपत्र पडताळणी दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
  • 📍नोकरी ठिकाण – गोंदिया (महाराष्ट्र)

एकूण – 77 पदे- Gondiadccb Bank Bharti 2025

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 द्वितीय श्रेणी अधिकारी 05
2 लिपिक 47
3 शिपाई 25

महत्वाची सूचना – कृपया वरील संवर्गाचे सविस्तर पदे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


शैक्षणिक अर्हता व अनुभव- Gondiadccb Bank Bharti 2025 Qualification

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरातीत नमुद दिनांक 22.01.2025 पर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा तसेच महाराष्ट्राचा नागरीक असावा.
  • मराठी भाषेचे तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अ.क्र. पदांचे नांव

शैक्षणिक अर्हता

1 द्वितीय श्रेणी अधिकारी
  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • MS-CIT
  • 03 वर्षे अनुभव
2 लिपिक
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • MS-CIT
  • मराठी/इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
3 शिपाई
  • किमान 10वी उत्तीर्ण
  • इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Gondiadccb Bank Bharti 2025

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 22.01.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील पद क्र.01 या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षांपर्यंत असावे.
  • वरील पद क्र.02 व 03 या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षांपर्यंत असावे.

परीक्षा शुल्क (फी)- Gondiadccb Bank Bharti 2025

  • परीक्षा शुल्क (फी)- रु.  885/-
  • टिप- परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बॅकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी हि संपुणपणे उमेदवारांची राहील.

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – Gondiadccb Bank Bharti 2025 Salary
अ.क्र. पदांचे नाव

वेतनश्रेणी

1 द्वितीय श्रेणी अधिकारी 1600-125-2225-150-2975-175-3850-200-4850-225-5975-250-7225
2 लिपिक 1250-100-1750-125-2375-150-3125-175-4000-200-5000-225-6125
3 शिपाई 1050-75-1524-90-1875-105-2400-120-3000-135-3675-150-4425

निवड कार्यपद्धती : Gondiadccb Bank Bharti 2025

A.ऑनलाईन परीक्षा : Gondiadccb Bank Bharti 2025

  • द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपीक व शिपाई या पदांकरीता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेस येतांना उमेदवराने परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या ९० प्रश्नांच्या प्रत्येकी १ गुण याप्रमाणे ९० गुणांची राहील. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृतअभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल गणित, बैंकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धीमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल.

 B. कागदपत्र पडताळणी व मुलाखत : Gondiadccb Bank Bharti 2025

  • ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी (परीक्षेचा बैठक क्रमांक) बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. मुलाखतीसाठीचे मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराच्या login मध्ये उपलब्ध करुन दिले जाईल सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेत स्थळावरुन डाऊनलोड करावे. मुलाखत पत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास support@gondiadccb.co.in या मेल आयडीवर ई-मेलद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बैंक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.

C. मुलाखत : Gondiadccb Bank Bharti 2025

  • कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. शिपाई पदासाठी मुलाखत १० गुणांची राहील. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपीक पदासाठी गुणांचे भारांकन जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे असेल. त्यामध्ये १० पैकी ५ गुण संबंधित उमेदवारांच्या जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरीत ५ गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील.

उमेदवारांची अंतिम निवड सूची: Gondiadccb Bank Bharti 2025
  • उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता, अंतिम निवड सूची व प्रतिक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
  • गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशांना प्रथम प्राधान्यक्रम राहील.
  • द्वितीय श्रेणी अधिकारी या पदासाठी बँकींग अनुभव ०५ वर्षाचा अनुभव असल्यास उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम राहील.
  • लिपीक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • पदवी परीक्षा प्राप्त श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • वरील १ ते ४ मध्ये देखील समान पात्रता ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहीत असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम
  • गुण प्राप्त उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे / गुणवत्ता यादी प्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या द्वितीय श्रेणी, लिपीक, शिपाई पदी परिविक्षाधिन कालावधीकरीता नियुक्ती देण्यात येईल.

उमेदवारांना महत्वाच्या सुचना : Gondiadccb Bank Bharti 2025
  • दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, गोंदिया या बँकेकरीता द्वितीय श्रेणीतील ०५ रिक्त, तृतीय श्रेणीतील रिक्त ४७ व चतुर्थ श्रेणीतील रिक्त २५ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सुची तयार करणेसाठी विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेतस्थळ gondiadccb.co.in किंवा gondiadccb.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.
  • उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या gondiadccb.co.in किंवा gondiadecb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम रु. ७५०/- + १८ टक्के जी.एस.टी. रु. १३५/- अशी एकूण रक्कम रु. ८८५/-ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्विकारले जाणार नाहीत व हे अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
  • परीक्षा शुल्क रक्कम रु. ७५० + १८ टक्के जी.एस.टी. रु. १३५/- अशी एकूण रक्कम रु. ८८५/-ऑनलाईन भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • परीक्षा शुल्काची रक्कम रु. ७५० + १८ टक्के जी.एस.टी. रु. १३५/- अशी एकूण रक्कम रु. ८८५/-ऑनलाईन पद्धतीनेच भरणा करता येईल.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीता असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
  • सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास 7387371877 हा हेल्पलाईन क्रमांक आहे. अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@gondiadccb.co.in या मेल आयडीवर ईमेलद्वारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरतेवेळी, मुलाखत पत्र डाऊनलोड करतेवेळी इ.) निर्माण झाल्यास संपर्काकरीता आहे.

ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्वाच्या सुचना – Gondiadccb Bank Bharti 2025
  • निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती / कागदपत्रे तपासणीनंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी / नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करणेत येईल. त्याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार/ विनंती विचारात घेतली जाणार नाही.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा तो त्या पदासाठीची अर्हता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस कागदपत्र पडताळणीस बोलविण्याचा/नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
  • उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती अंतिम समजण्यात येईल.
  • उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांचेकडून शिफारस / दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करुन निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
  • ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मुळ कागदपत्रे घेवून हजर राहणे बंधनकारक राहील आणि यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद समजण्यात येईल.
  • उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  • यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदोपत्री किंवा मेलद्वारे अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत. त्यांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
  • भरती प्रक्रियेत / निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस राहील व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमान किंवा बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरुपात कळविले जाणार नाही.
  • त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेत स्थळावर सूचना पाहाव्यात. संकेत स्थळावरील सूचना पाहिल्या नाहीत यास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. या भरती प्रक्रिया अनुषंगाने कोणत्याही उमेदवाराशी स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा परिक्षार्थीची संख्या विचारात घेवून आवश्यकतेनुसार इतर जिल्हयातील, शहरातील केंद्रावरही घेतली जाईल. परिक्षार्थीची संख्या विचारात घेवून आवश्यकतेनुसार परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येईल. परीक्षा केंद्राबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल त्याबाबत कुठलाही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परिक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केलेली नाही. या संदर्भात कोणतीही जाहिरात अगर माहितीही बेकायदेशीर आहे असे समजण्यात यावे.
  • काही अपरिहार्य/ आपातकालीन कारणास्तव परीक्षा स्थगित करणे/पुढे ढकलणे, अर्शतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस राहतील.
  • भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद / तक्रारी बाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतेवेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करावयाची नसली तरी ज्या उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा.

Gondiadccb Bank Bharti 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30.01.2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment