Join Whatsapp Group

Join Telegram Group

Yavatmal Mahapareshan Recruitment 2024 यवतमाळ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये पदभरती

नोकरीची सुवर्णसंधी… यवतमाळ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Mahapareshan) (Mahatransco) (Yavatmal Mahapareshan Recruitment 2024) मध्ये पदभरती…!! येथे बघा संपूर्ण माहिती..!!

यवतमाळ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मध्ये Yavatmal Mahapareshan Recruitment 2024 (Mahapareshan) (Mahatransco)  Yavatmal Mahapareshan Career 2024 (Yavatmal Mahapareshan Job 2024) (Yavatmal Mahapareshan Vacancy 2024) (Mahatransco Job 2024) (Yavatmal Mahapareshan Bharti 2024)  (Mahatransco Recruitment 2024) ट्रेड अप्रेंटिस या पदाच्या एकुण 26 जागांची पदभरती करीता पात्र उमेदवारांकडून भारत सरकारच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून दिनांक 06 डिसेंबर, 2024 पासून ते दिनांक 05 जानेवारी, 2024 पर्यतच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 05 जानेवारी, 2024 आहे. सविस्तर माहितासाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पहा.  

Yavatmal Mahapareshan Recruitment 2024
Yavatmal Mahapareshan Recruitment 2024

📌 महत्वाचे दिनांक 📌 - Yavatmal Mahapareshan Recruitment 2024 
  • 💻ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दिनांक 13.12.2024 ते 05.01.2025.
  • 📃ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 05.01.2025.
  • 📃अर्ज/ कागदपत्रे पाठविण्याचा शेवटचा दिनांक – दिनांक 09.01.2025.
  • 📍नोकरी ठिकाण – यवतमाळ अंतर्गत उपकेंद्रे.

एकूण – 26 पदे Yavatmal Mahapareshan Recruitment 2024

अ.क्र. पदांचे नांव पदे
1 Electrician (ट्रेड अप्रेंटिस) 26

शैक्षणिक अर्हता व अनुभव- Yavatmal Mahapareshan Recruitment 2024

  • सदर पदांसाठी अर्ज करते वेळी पात्र उमेदवारांनी जाहीरात प्रसिध्दी दिनांकापर्यत शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • वरील पदासाठी अर्जदार हा भारताचा आणि महाराष्ट्राचा नागरीक असावा.
अ.क्र. पदांचे नांव शैक्षणिक अर्हता
1 Electrician

(ट्रेड अप्रेंटिस)

  • 10 वी पास
  • मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र

महत्वाची सूचना – वरील सर्व पदांसाठीच्या कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🔗 Important link 🔗
📑 जाहिरात (Notification) 📑 👉 येथे क्लिक करा
🔍 ऑनलाईन अर्ज 🔍 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ 🌐 👉 येथे क्लिक करा
📑 ऑफलाईन अर्ज – (प्रपत्र –अ) 📑 👉 येथे क्लिक करा

वयोमर्यादा- Yavatmal Mahapareshan Recruitment 2024

  • जाहिरातीत नमुद पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 05.01.2025 या दिनाकांस गणण्यात येणार आहे.
  • वरील पदासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सुट.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक आस्थापना नोंदणी क्रमांक – Yavatmal Mahapareshan Recruitment 2024

अ.क्र.
कार्यालयाचे नाव
आस्थापना नोंदणी (रजिस्टेशन) क्रमांक
ट्रेड नाव
(जागा)
कार्यक्षेत्र तथा एकुण जागा
1
असदा संवसू विभाग,
म.रा.वि. पारेषण कं. मर्या. यवतमाळ
E09172700008
विजतंत्री
Electrician
 (26)
असदा संवसू विभाग, यवतमाळ अंतर्गत उपकेंद्रे-26

 अशाच नवनवीन जाहीराती साठी आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या… 

वेतनश्रेणी (सैलरी) – Yavatmal Mahapareshan Recruitment 2024 Salary
अ.क्र. पदांचे नांव Stipend Monthly
1 Electrician

(ट्रेड अप्रेंटिस)

Rs.7700/-

(प्रचलित नियमानुसार)


अर्ज सादर करतांना आवश्यक कागदपत्रे- Yavatmal Mahapareshan Recruitment 2024
  • एस.एस.सी व ITI विजतंत्री (Electrician) चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची प्रत
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र-नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याचे प्रमाणपत्र
  • इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळपत्र.

अर्ज पाठविण्याचा पुर्ण पत्ता- 

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, 

अउदा संवसु विभाग, यवतमाळ, “ विद्युत भवन”, दुसरा मजला, आर्णि रोड, यवतमाळ – 445 001

अर्ज कसा सादर करावा- Yavatmal Mahapareshan Recruitment 2024 apply online Apprenticeship form
  • उमेदवारांनी NAPS अप्रेंटिसशिप पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in/  वर स्वतःची नोंदणी करावी. उमेदवारांनी त्यांच्या आधार क्रमांकासह सर्व डेटा योग्यरित्या भरावा. नोंदणी करताना उमेदवारांनी खालील मूळच्या स्कॅन केलेल्या प्रती देखील शिकाऊ पोर्टलवर अपलोड कराव्यात.
  •  * मध्ये चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.
  • पोर्टल वरच्या टूलबारवरील “नोंदणी” बटणावर क्लिक करा आणि “उमेदवार” हा पर्याय निवडा.
  • एक लहान नोंदणी फॉर्म उघडेल . त्यातील माहिती तुम्हाला भरणे आवश्यक आहे. तुमचे मूलभूत, कुटुंब आणि संपर्क तपशील आणि नंतर “सुरू ठेवा” क्लिक करा.
  • महत्वाची टीप: कृपया एक वैध ईमेल आयडी प्रविष्ट करा कारण activation link (सक्रियकरण दुवा) मेलद्वारे पाठविला जाईल. तो ईमेल आयडी तसेच पासवर्ड लक्षात ठेवा आणि तुम्ही तो अप्रेंटिसशिप पोर्टलच्या  तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी वापराल..
  • त्यानंतर नोंदणी क्रमांकासह डायलॉग बॉक्स तुमचे खाते तयार केल्यावर सूचित करेल, नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर तुम्हाला activation link सक्रियकरण ईमेल प्राप्त होईल. तुमच्या नोंदणीकृत ईमेलवर ‘सक्रिय करा’ बटणावर क्लिक करा.
  • एकदा तुम्ही active सक्रिय करा बटणावर क्लिक केल्यानंतर, स्क्रीन आपोआप तुम्हाला लॉग-इन पृष्ठ  वर पुनर्निर्देशित करेल, जिथे तुम्ही तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी/नोंदणी क्रमांक टाइप कराल आणि पासवर्ड (ईमेल आयडी आणि पासवर्ड सारखाच आहे, जो तुम्ही नोंदणी करते दरम्यान नमूद केला होता) लॉगिन करण्यासाठी.
  • एकदा लॉग इन केल्यावर, तुम्हाला ‘Complete Your Profile’ बटणावर क्लिक करावे लागेल. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही अप्रेंटिसशिप संधीसाठी अर्ज करू शकणार नाही.
  • तुमचे “माझ्याबद्दल” आणि संपर्क जोडण्यासाठी ‘संपादित करा’ बटणावर क्लिक करून प्रारंभ करा. ‘एडिट’ बटणावर क्लिक केल्यावर खालील स्क्रीन दिसेल. ‘*’ मध्ये चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.
  • नंतर Apply to Opportunities हे पाहण्यासाठी तुम्ही शीर्ष टूलबारवरील “प्रशिक्षण संधी” हा पर्याय वापरू शकता. तुमच्या संधीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त निवड केलेल्यावर Apply बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर कंपन्या तुमचे प्रोफाईल पाहू शकतात आणि तुम्हाला ॲप्रेंटिसशिपसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्यांनी पोस्ट केलेली संधी. तुम्ही डाव्या मेनूवर ‘आमंत्रणे’ पर्यायावर क्लिक करून ते पाहू शकता.
  • तुम्ही View’ बटणावर क्लिक करून संधीचे तपशील पाहू शकता संधी तुम्हाला स्वारस्य असल्यास, संधीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही Apply बटणावर क्लिक करू शकता
  • Apply वर क्लिक केल्यावर, तुम्हाला स्थान निवडण्याचा पर्याय दिला जाईल (ज्या प्रकरणांमध्ये कंपनीने अनेक ठिकाणी संधी दिली आहे). खालील एक बॉक्स दिसेल आणि तुम्ही तुमच्या पसंतीनुसार स्थान निवडू शकता.
  • तुम्ही तुमचे सर्व अर्ज ‘ Applications’ डावा मेनू टॅबवर पाहू शकता
  • नंतरचे पृष्ठ तुम्हाला तुमच्या सर्व Applications चा सारांश दर्शवेल.एका संधीनंतर कंपनी तुमच्या प्रोफाइलचे पुनरावलोकन करेल आणि तुम्हाला कॉल करण्यासाठी आमंत्रित करेल.मुलाखत कंपनीने तुमची निवड केल्यास, ते ‘ Contract ‘ जारी करतील आणि तुम्ही ते करू शकाल हे वरील ‘स्थिती’ स्तंभात पहा.
  • नंतर पुढे तुम्हाला करार पहा आणि स्वीकारा असा टॅब समोर दिसेल त्यात  कंपनी तुम्हाला ऑफर देऊ इच्छित असल्यास, ते तुम्हाला करार पाठवतील. करारांची यादी पाहण्यासाठी डाव्या मेनूमधील ‘Contract’ पर्यायावर क्लिक करा.
  • कराराचा तपशील पाहण्यासाठी, ‘View’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही संधीचे सर्व तपशील – स्टायपेंड तपशील, कामाचे दिवस, स्थान पाहण्यास सक्षम असाल आणि तुमच्या माहितीनुसार सर्व तपशील बरोबर असल्यास, तुम्ही स्वीकार करू शकता. ‘साइन’ पर्याय निवडून करार करा. कोणत्याही कारणास्तव, आपण संधी स्वीकारण्याची योजना नाकारु शकता त्यासाठी, तुम्ही ‘reject’  पर्याय निवडू शकता आणि करार संपुष्ट होईल.

उमेदवारांसाठी सर्व साधारण सुचना- Yavatmal Mahapareshan Recruitment 2024
  • भरती प्रकिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिका-यांकडून दबाव आणल्यास, वशिलेबाजी किंवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल./अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे. वरील कालावधील ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास त्या नंतरच्या कालावधीत आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • अपूर्ण, चुकीचे व अपु-या कागदपत्रासह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही. अथवा त्यांचा विचार केल्या जाणार नाही. तसेच अर्जामध्ये नमूद केलेली माहिती चूकीची अथवा खोटी आढळून आल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरेल.
  • एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री गुणपत्रिकेवरील नाव आधार कार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्विकारला जाणार नाही.
  • ऑनलाईन (Online) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित E-Mail Id व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक राहील.
  • शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी. व आय.टी.आय. परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या ५०% सरासरीच्या आधारे गुणवत्ते यादी नुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहुन प्रवर्गनिहाय केली जाईल.
  • प्रणाली मध्ये बदल झाल्यामुळे या आधी ज्या उमेदवारानी वरील आस्थापना नोंदणी/रजिस्टेशन क्रमांकावर ऑनलाईन (Online) अर्ज सादर केले असेल, त्यांनी पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
  • सदर भरती प्रकियेकरीता फक्त दि. 06.12.2024 ते 05.01.2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल. वर नमुद दिनांकाच्या पुर्वी किंवा नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती/निवड प्रकियेकरीता विचार केला जाणार नाही, याची सुध्दा नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र-अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत तसेच जाहिरातीमध्ये मुद्दा क. 02 मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत/स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे दि. 09.01.2025 सायं. 06.00 वाजे पर्यंत  कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, यवतमाळ, विद्युत भवन, दुसरा मजला, आर्णि रोड, यवतमाळ – 445 001 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.
  • सदर प्रपत्र आवश्यक कागदपत्र / प्रमाणपत्रांसह विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज भरती/ निवड प्रक्रीयेसाठी विचारात घेतला जाणार नाही, याची नोंद सुध्दा उमेदवारांनी घ्यावी.
  • सदर भरती करीता वेळोवेळी www.mahatransco.in या संकेतस्थळावर माहिती बघावी व त्याची वेळोवेळी पुर्तता करून निर्देशाचे पालन करावे.

Yavatmal Mahapareshan Recruitment 2024
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी, 2024 आहे.
  • ऑनलाईन अर्ज तसेच कागदपत्रे पाठविण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी, 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment